agriculture news in marathi, Need of rain in Pune resion | Agrowon

पुणे विभागात पाणीटंचाई दूर होण्यासाठी जोरदार पावसाची आवश्‍यकता
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 12 जून 2018

पुणे  : पुणे भागातील दुष्काळी पट्ट्यात पूर्वमोसमी पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. मात्र, अद्यापही पाणीटंचाईची तीव्रता कायम आहे. ती दूर होण्यासाठी आणखी जोरदार पावासची आवश्‍यकता आहे. विभागातील २० तालुक्यांमधील ८९ गावांना आणि ३४३ वाड्यांना ७५ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आली.

पुणे  : पुणे भागातील दुष्काळी पट्ट्यात पूर्वमोसमी पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. मात्र, अद्यापही पाणीटंचाईची तीव्रता कायम आहे. ती दूर होण्यासाठी आणखी जोरदार पावासची आवश्‍यकता आहे. विभागातील २० तालुक्यांमधील ८९ गावांना आणि ३४३ वाड्यांना ७५ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आली.

विभागात यंदा सातारा जिल्ह्यात सर्वाधिक ४१ टॅंकर सुरू अाहेत. खटाव, माण, कोरेगाव, पाटण, महाबळेश्‍वर, खंडाळा तालुक्‍यांसह ११ गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा कायम आहेत. जिल्ह्यातील ५३ गावे १३२ वाड्यांमधील ६१ हजार लोकसंख्या आणि १३ हजार जनावरांना टॅंकरने पाणीपुरवठा पुरवावा लागत आहे. मान तालुक्यातील १ आणि महाबळेश्‍वर तालुक्यातील २ टॅंकर बंद झाले आहेत.

पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईत थोडी वाढ झाली असून, आंबेगाव, जुन्नर, खेड, भोरसह नऊ तालुक्‍यांतील ३१ गावे २०८ वाड्यांना ३१ टॅंकरने पाणी द्यावे लागत आहे, तर सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्‍यातील ५ गावे  एका वाडीला तीन टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कोल्हापूरच्या दुर्गम भागात पाणीपुरवठा करण्यासाठी दोन स्राेत अधिग्रहित करण्यात आले आहेत, तर सोलापूर जिल्ह्यात यंदा पाणीटंचाई भासली नाही.

विभागातील टॅंकरद्वारा पाणीपुरवठ्याची स्थिती

  • सातारा : जावळी १२, माण ९, खटाव ६, कोरेगाव ७, महाबळेश्‍वर १, पाटण २, वाई २, कराड १, खंडाळा १
  • पुणे : आंबेगाव ७, जुन्नर ६, खेड ५, भोर ३, बारामती ३, पुरंदर ३, वेल्हा २ दौंड १, मुळशी १.
  • सांगली : खानापूर ३

विभागातील पाणीटंचाईची स्थिती

जिल्हा    गावे वाड्या लोकसंख्या पशुधन टॅंकर
पुणे   ३१ २०८  ५९९७४ ०  ३१
सातारा ५३  १३२ ६१६४८ १३१२३   ४१
सांगली ५  ६७८२ ० 
कोल्हापूर  ०    २ ६७१   २९०  ०

 

 

इतर ताज्या घडामोडी
शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा,...मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी...
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
केळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...
नाशिक जिल्हा बँकेने रेणुकादेवी संस्थेचा...नाशिक : जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळासमोर...
शेतकऱ्यांचा 'वसाका' प्रशासनाला घेरावनाशिक  : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी...
मीटर रीडिंगची पूर्वसूचना संदेशाद्वारे...सोलापूर  : ग्राहकांची गैरसोय होऊ नये, मीटर...
दिव्यांग मतदारांना सुविधा द्या :डॉ....सोलापूर : दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी...
कोल्हापुरात २३०० हेक्टरवर उन्हाळी पेरणीकोल्हापूर  : जिल्ह्यात उन्हाळी हंगामाची...
जळगावात गवारीला प्रतिक्विंटल ७५०० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (...
नंदुरबार जिल्ह्यात पाणीटंचाई गंभीरनंदुरबार  : जिल्ह्यातील पाणीटंचाई वाढत आहे....
पुणे विभागात ४१५ टॅंकरने पाणीपुरवठापुणे : विभागात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र...
रणजितसिंहाच्या भाजप प्रवेशाने खरच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यातील विशेषतः पश्चिम...
काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रत्येकी बारा...मुंबई ः आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील...
आचारसंहिता भंगाच्या ७१७ तक्रारीमुंबई : नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी...
भाजपकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी...नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी तर...
एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....
इतिहासकालीन जलसंधारण अन् त्यामागचे...दरवर्षी पिढ्यानपिढ्या पावसाचे पाणी वेगवेगळे उपाय...
अभ्यासक्रमात हवा भूसूक्ष्मजीवशास्त्राचा...महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे असून, तिथे १२...