agriculture news in marathi, The need to repair every drop in the ground: Gutte | Agrowon

जमिनीवर पडणारा प्रत्येक थेंब मुरविण्याची गरज ः गुट्टे
टीम अॅग्रोवन
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

अंबाजोगाई, जि. बीड ः दरवर्षीचा पावसाचा खंड, पर्जन्यमानाचे कमी झालेले दिवस, वीज पडण्याचे वाढलेले प्रमाण तसेच जागतिक पातळीवर सरसरी तापमानामध्ये झालेली वाढ, यावर उपाययोजना करण्यासाठी गावाच्या शिवारात पडणारा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविण्यासाठी काम करणे आवश्यक आहे. तसेच नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन गावोगावी होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषी विस्तार विद्यावेत्ता अरुण गुट्टे यांनी केले.

अंबाजोगाई, जि. बीड ः दरवर्षीचा पावसाचा खंड, पर्जन्यमानाचे कमी झालेले दिवस, वीज पडण्याचे वाढलेले प्रमाण तसेच जागतिक पातळीवर सरसरी तापमानामध्ये झालेली वाढ, यावर उपाययोजना करण्यासाठी गावाच्या शिवारात पडणारा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविण्यासाठी काम करणे आवश्यक आहे. तसेच नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन गावोगावी होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषी विस्तार विद्यावेत्ता अरुण गुट्टे यांनी केले.

दिनदयाल शोध संस्थान, कृषी विज्ञान केंद्र अंबाजोगाई येथे राष्ट्रऋषी नानाजी देशमुख यांची १०२ वी जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी कृषी विज्ञान केंद्राचे प्रभारी जयवंतराव ईटकुरकर, दिनदयाल शोध संस्थांनचे सदस्य डॉ. नितीन धर्मराव, केंद्राचे प्रभारी वरिष्ठ शात्रज्ञ -प्रमुख राजेसाहेब हारे यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून राजेसाहेब हारे यांनी नानाजीच्या कार्याची माहिती देऊन; नवीन कामासाठी त्यांच्या जीवनचरित्रातून प्रेरणा घेण्यासाठी जयंती समारोहाचे आयोजन केले असल्याचे सांगितले.

श्री. गुट्टे म्हणाले, प्राप्त परिस्थितीत जास्त पाणी लागणारे पिके घेऊ नयेत किंवा सूक्ष्म सिंचनाचा वापर कटाक्षाने करावा. तंत्रज्ञानाचा प्रसार होत आहे पण अंमलबजावणी होत नाही. आंतरपीक पद्धतीचा अवलंब करत पाण्याचा ताण सहन करणाऱ्या वाणाचा वापर करण्याची आवश्यकता आहे. वॉटर बँक ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या जमिनीचा १० व्या भागात शेततळे निर्माण करणे गरजेचे आहे. शेतीला जोडधंद्याची सांगड घालणे आवश्यक आहे. डॉ. धर्मराव म्हणाले, नानाजीचा जीवन प्रवास ध्येयाने प्ररित झालेला होता. लोकसंग्रह नानाजीच्या जीवनाचा अविभाज्य घटक होता.

जयवंतराव ईटकुरकर यांनी अध्यक्षीय भाषणात नानाजीच्या सामाजिक कार्याची माहिती देऊन त्यांनी आखून दिलेल्या मार्गाने कार्य करण्याची संधी मिळाल्याचे सांगितले. सूत्रसंचालन कृषी विस्तार शास्त्रज्ञ सुहास पंके यांनी केले. तर कृषी विद्या शास्त्रज्ञ कृष्णा कर्डिले यांनी आभार मानलेे. परिसरातील विविध गावांतून पुरुष-महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इतर बातम्या
हतबलतेतून फळबागांवर कुऱ्हाड अन्‌...जालना : जीवापाड जपलेली बाग वाचविण्यासाठी रानोमाळ...
विषाणूंद्वारे खोल मातीतही पोचविता येतील...मातीमध्ये खोलवर पिकाच्या मुळावर एखाद्या बुरशी...
मराठवाड्यात महायुतीचा करिष्मा कायमनांदेड : मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांतील...
पुण्यात गिरीश बापट, बारामतीत सुप्रिया...पुणे  : देशभर मोदी लाट असतानाही राष्ट्रवादी...
राजू शेट्टी यांचा धक्कादायक पराभवकोल्हापूर : गेल्या दहा वर्षांपासून...
नगरमध्ये डॉ. सुजय विखे, शिर्डीत...नगर  : विसाव्या फेरीअखेर नगर लोकसभा...
साताऱ्यात उदयनराजे यांची हॅटट्रिक सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे...
जळगाव : शिवारात पाणीबाणी, शेतकरीराजा...जळगाव ः गावात तीन वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाने...
राज्यात महायुतीची त्सुनामी...मुंबई  ः सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत देशभर...
उन्हाचा चटका ‘ताप’दायकपुणे : सूर्य चांगलाच तळपल्याने उन्हाचा चटका...
राजू शेट्टींच्या पराभवाने शेतकरी...कोल्हापूर ः शेतीविषयक विविध प्रश्‍नांबाबत देश...
मोदीच आजच्या महाविजयाचे महानायक : अमित...नवी दिल्ली : देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या...
पुन्हा मोदी लाट, काँग्रेस भुईसपाट नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...
ये नया हिंदुस्थान है' : पंतप्रधानआज देशातील नागरिकांनी आम्हाला कौल दिला. मी...
...आवाज कुणाचा? लोकसभा २०१९चा आज निकालनवी दिल्ली : संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या...
कृषी विद्यापीठांना नकोय शिक्षण परिषदेचे...नागपूर : भारतीय कृषी संशोधन परिषदेने तयार...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : उन्हाचा चटका वाढल्याने राज्यातील...
राज्यात कृत्रिम पावसाची तयारी सुरूमुंबई : राज्यातील यंदाच्या भीषण दुष्काळाची...
फळबाग लागवड योजनेवर ग्रामसेवकांचा...चिपळूण, जि. रत्नागिरी ः महाराष्ट्र ग्रामसेवक...
‘रिसॅट-२ बी'चे उपग्रहाचे यशस्वी...श्रीहरीकोट : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो...