agriculture news in marathi, The need to unite fort the farmers' rights | Agrowon

शेतकऱ्यांवरील अन्यायाविरोधात संघटित होण्याची गरज ः घनवट
टीम अॅग्रोवन
बुधवार, 29 नोव्हेंबर 2017

नागपूर : शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतीधंदा उद्‍ध्वस्त झाला आहे. शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढते आहे. कर्जमाफीसाठी तारखांवर तारखा दिल्या जात आहेत. वीज कनेक्‍शन तोडणीसाठी मोहीम राबविली जाते. अशा अन्यायाविरोधात आता संघटित होण्याची गरज अाहे, असे मत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी व्यक्‍त केले.

नागपूर : शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतीधंदा उद्‍ध्वस्त झाला आहे. शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढते आहे. कर्जमाफीसाठी तारखांवर तारखा दिल्या जात आहेत. वीज कनेक्‍शन तोडणीसाठी मोहीम राबविली जाते. अशा अन्यायाविरोधात आता संघटित होण्याची गरज अाहे, असे मत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी व्यक्‍त केले.

नागपूर येथे कार्यकारिणी बैठकीत ते बोलत होते. या वेळी श्री. घनवट पुढे म्हणाले, की शासन शेतीमालाच्या आधारभूत किमती जाहीर करते, मात्र आधारभूत किमतीनुसार शेतमाल खरेदी करण्यासाठी शासनाकडे पुरेशी व्यवस्था व पैसा नाही. छत्तीसगड राज्याचा पॅटर्न यावर प्रभावी ठरणार असल्याने त्याच्या अनुकरणाची गरज आहे.

छत्तीसगडमध्ये आधारभूत किमतीमधील फरक सरकारकडून दिला जातो. महाराष्ट्रात मात्र सरकारच्या लुटीच्या धोरणामुळे शेती तोट्यात गेली आहे. भारतीय शेती व्यवसायाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी शेतीला स्वातंत्र्य देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी महिला आघाडी अध्यक्षा गीता खांदेभराड, युवा आघाडी अध्यक्ष सतीश दाणी, सीमा नरोडे, राम नेवले, वामनराव चटप, पुखराज रेवतकर, सरोजताई काशीकर, अशोक भेदे अादी उपस्थित होते.
 

१२ डिसेंबरला शेतकरी मेळावा
शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चेकरिता १२ डिसेंबर रोजी शेगाव येथे शेतकरी स्वातंत्र्य मेळावा आयोजित केला अाहे. राज्यभरातून पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचे घनवट यांनी सांगितले.

 

इतर बातम्या
देशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये...पुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी...
स्थानिकीकरणातही मका टिकवून आहे काही मूळ...जंगली मका प्रजातीपासून स्थानिकीकरण होण्याच्या...
परभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार...परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या...
करवीर तालुक्‍यात लघुपाटबंधारे विभागात...कोल्हापूर : करवीर तालुक्‍यातील लघू...
`जलयुक्त`ची कामे गतीने पूर्ण करा : डवलेबुलडाणा : जलयुक्‍त शिवार अभियानातंर्गत भूजल...
नगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्‍टर...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीच्या सरासरी...
सांगलीतील मध्यम, लघू प्रकल्पांत २३...सांगली ः जिल्ह्यातील ८४ मध्यम आणि लघू प्रकल्पांत...
नगर जिल्हा परिषदेत दलालांचा सुळसुळाटनगर ः जिल्हा परिषदेत आता पहिल्यासारखी स्थिती नाही...
महामार्ग सुरू होण्यापूर्वीच वाळूमाफिया...जळगाव ः जळगाव शहरातील वाढते अपघात आणि...
शेतकऱ्यांनी जाणले कृषी तंत्रज्ञानभंडारा : परंपरागत कृषी विकास योजनेतून तालुका कृषी...
रेशीम शेतकऱ्यांना सरकारचे अर्थसाह्य :...नागपूर : नव्याने रेशीम शेतीकडे वळणाऱ्या...
गाळपेर क्षेत्रातून मिळणार ४८ हजार टन... नाशिक : दुष्काळात जिल्ह्यात चाराटंचाई...
नाशिक जिल्हा बॅँकेच्या संचालकांच्या...नाशिक : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती...
सोलापुरातील रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी...सोलापूर : सोलापूर-विजापूर राष्ट्रीय...
उजनी धरणातील पाणी प्रदूषितच :...सोलापूर  : उजनी धरणामुळे सोलापूर, पुणे आणि...
कर्नाटकसाठीची ऊसतोडणी मंदावलीकोल्हापूर: दक्षिण महाराष्ट्रात उसाची रक्कम...
अवैध एचटीबीटी बियाणे एसआयटीला मुदतवाढमुंबई: परवानगी नसलेले तणनाशकाला सहनशील जनूक...
बाजारात डाळिंबाचे दर दबावातसांगली ः देशात डाळिंबाच्या उत्पादनात अंदाजे २० ते...
समृद्धी महामार्ग : साडेतीनशे कोटींच्या...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम...
विदर्भात पाऊस; मध्य महाराष्ट्राला...पुणे : बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘पेथाई’...