agriculture news in marathi, The neglect of agricultural workers in collecting soil samples | Agrowon

माती नमुने गोळा करण्याकडे कृषी कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 12 जून 2018

पुणे  ः पुणे जिल्ह्यात गेल्या महिन्यात १५ मेपर्यंत माती नमुने काढण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेकडे कृषी विभागाच्या अनेक कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सुमारे ३७ हजार ९२२ माती नमुने घेण्याचे प्रलंबित राहिल्याचे चित्र आहे. 

पुणे  ः पुणे जिल्ह्यात गेल्या महिन्यात १५ मेपर्यंत माती नमुने काढण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेकडे कृषी विभागाच्या अनेक कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सुमारे ३७ हजार ९२२ माती नमुने घेण्याचे प्रलंबित राहिल्याचे चित्र आहे. 

शेतकऱ्यांना शेतजमिनीतील मातीपरीक्षणाद्वारे जमिनीतील अन्नद्रव्याचे प्रमाण जाणून घेऊन त्यानुसार पुढील हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी खतमात्रांची  शिफारस करण्यात येते. त्यासाठी मागील दोन वर्षांपासून मृद आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात येते. त्यानुसार दरवर्षी माती नमुने घेतले जातात.  त्याची पू्र्वतयारी म्हणून लक्षांकाप्रमाणे निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. निवडलेल्या गावातील लागवडीयोग्य असलेल्या क्षेत्रामधून बागायत क्षेत्रासाठी अडीच हेक्टर व जिरायत क्षेत्रासाठी दहा हेक्टरमधून एक माती नमुना काढण्यात येतो.

क्षेत्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या कृषी विभागाच्या यंत्रणेमार्फत माती नमुने काढले जातात. त्यानंतर ते विश्लेषणासाठी माती चाचणी प्रयोगशाळेत पाठविण्यात  येतात. माती चाचणी प्रयोगशाळेत नमुना प्राप्त झाल्यानंतर विश्लेषणासाठी माती नमुना तयार करण्यात येतो. त्यानंतर पुढील घटकांसाठी प्रयोगशाळेत या नमुन्याची तपासणी केली जाते. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार एकूण बारा घटकांची विहीत पद्धतीने तपासणी करण्यात येते.  कृषी सहायकांनी माती नमुने गोळा करण्यासाठी प्रशिक्षित, माहितीगार तज्ज्ञ, शेतकरी किवा गावातील आत्माअंतर्गत नियुक्त केलेल्या कृषीमित्रांची मदत घेण्याच्या सूचना होत्या. तसेच संबंधित कृषी सहायकांनी गावातील माती नमुने काढण्यापूर्वी कालावधी निश्चित करून दवंडी देणे किवा सूचना लिहून सहभाग वाढविणे गरजेचे होते. परंतु तसे झाले नाही.

इतर ताज्या घडामोडी
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...
कापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव  ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...
पुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे  ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...