agriculture news in marathi, In neighboring countries Nepal have priority stand for India says PM Modi | Agrowon

शेजाऱ्यांमध्ये नेपाळला सर्वोच्च स्थान : पंतप्रधान मोदी
वृत्तसेवा
शनिवार, 12 मे 2018

जनकपूर, नेपाळ : ‘शेजारी सर्वप्रथम’ या भारताच्या धोरणामध्ये नेपाळला सर्वांत वरचे स्थान आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (ता.११) नेपाळ सरकारला आश्‍वस्त केले. जनकपूर या शहराच्या विकासासाठी शंभर कोटी रुपयांची मदतही मोदींनी जाहीर केली.

जनकपूर, नेपाळ : ‘शेजारी सर्वप्रथम’ या भारताच्या धोरणामध्ये नेपाळला सर्वांत वरचे स्थान आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (ता.११) नेपाळ सरकारला आश्‍वस्त केले. जनकपूर या शहराच्या विकासासाठी शंभर कोटी रुपयांची मदतही मोदींनी जाहीर केली.

पंतप्रधान मोदी हे दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी नेपाळमध्ये आले आहेत. जनकपूर येथे स्वागत झाल्यानंतर मोदींनी ‘जय सीयाराम’चा घोष करत येथील नागरिकांशी संवाद साधला. आपण येथे भारताचे पंतप्रधान म्हणून नव्हे, तर प्रधान यात्रेकरू म्हणून आलो आहोत, असे त्यांनी सांगितले. मैत्रीबद्दलचा रामचरितमानसमधील श्‍लोक उद्‌धृत करत मोदींनी नेपाळ सरकारला भारताचा भक्कम पाठिंबा असल्याचे सूचित केले. जनकपूर हे ठिकाण श्रीरामपत्नी देवी सीतेचे जन्मस्थान मानले जात असल्याने हिंदूचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे मोदी यांनी जनकपूर आणि परिसरातील पायाभूत विकासासाठी शंभर कोटी रुपयांची मदत जाहीर केली. २०१४ मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून मोदींचा हा तिसरा नेपाळ दौरा आहे.

ट्रॅडिशन (परंपरा), टुरिझम (पर्यटन), ट्रेड (व्यापार), टेक्‍नॉलॉजी (तंत्रज्ञान) आणि ट्रान्सपोर्ट (वाहतूक) या पाच "टी''वर भर दिल्यास दोन्ही देशांना त्याचा प्रचंड फायदा होऊ शकतो, असे प्रतिपादन मोदींनी केले. भारत आणि नेपाळला हाय-वे, आय-वे (इन्फॉर्मेशन), रेल्वे, ट्रान्सवे (इलेक्‍ट्रॉनिक संपर्क), वॉटर-वे (जलमार्ग) आणि एअर-वे (हवाई मार्ग) या सर्व मार्गांनी जोडण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

नेपाळमध्ये उतरताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट प्रसिद्ध जानकी मंदिराला भेट दिली. नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी त्यांचे स्वागत केले. मोदींनी मंदिरात षोडशोपचार पूजा केली. या पूजेवेळी तांत्रिक मंत्र, राम-सीतेच्या भजनांसह सोळा धार्मिक विधी केले जातात, अशी पूजा करणारे ते भारताचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. नीलम संजीव रेड्डी, ग्यानी झैलसिंग आणि प्रणव मुखर्जी या माजी राष्ट्रपतींनी ही पूजा केली होती.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...