agriculture news in marathi, Netherland's smart dairy farms to be developed in maharashtra | Agrowon

नेदरलँड्स तंत्राचे स्मार्ट गोठे उभे राहणार
ज्ञानेश्र्वर रायते
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

बारामती, जि. पुणे : दुधाळ गाईंमध्ये उष्णतेच्या ताणामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी नेदरलँड्समधील व्हॅन हॉल लारेन्स्टाइन विद्यापीठ व अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामतीदरम्यान नव्याने करार करण्यात आला आहे. यामध्ये स्मार्ट गोठे उभारण्याबरोबर उच्च प्रतीच्या गाईंच्या प्रजननाचे प्रयोग केले जाणार आहेत.

बारामती, जि. पुणे : दुधाळ गाईंमध्ये उष्णतेच्या ताणामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी नेदरलँड्समधील व्हॅन हॉल लारेन्स्टाइन विद्यापीठ व अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामतीदरम्यान नव्याने करार करण्यात आला आहे. यामध्ये स्मार्ट गोठे उभारण्याबरोबर उच्च प्रतीच्या गाईंच्या प्रजननाचे प्रयोग केले जाणार आहेत.

भारतीय भाजीपाल्याची गुणवत्ता, प्रत व उत्पादन वाढण्यासाठी नेदरलँड्सने तंत्रज्ञान पुरविल्यानंतर आता दुधाच्या उत्पादनासंदर्भात नेदरलँड्स लिव्हिंग लॅब कराराच्या दुसऱ्या टप्प्याची सुरवात २ नोव्हेंबर रोजी करण्यात आली. ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, नेदरलँड्सच्या विद्यापीठाचे कुलपती व्हॅनडोझेन यांच्यात सामंजस्य करार झाला.

या करारावर माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी भारताच्या वतीने तर नेदरलँड्सचे कृषिमंत्री अल्ड्रेक खिअरवेल्ड यांनी नेदरलँड्सच्या वतीने स्वाक्षऱ्या केल्या. या वेळी बारामती कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य निलेश नलावडे, डॉ. डी. पी. भोईटे यांच्यासह नेदरलँड्स व बारामती कृषी महाविद्यालयाचे शिष्टमंडळ उपस्थित होते.

या प्रकल्पांतर्गत दुधाळ गाईंमध्ये उष्णतेच्या ताणामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी उष्णतारोधक स्मार्ट गोठे उभारले जाणार आहेत. गाई -म्हशींमधील उत्पादनाच्या नोंदी ठेवण्यासाठी सहज उपयोग करता येऊ शकेल अशा मोबाईलवरील सॉफ्टवेअरची निर्मिती केली जाणार आहे. उच्च प्रतीच्या गाईंची निर्मिती करण्याकरिता प्रजननामध्ये सिद्ध वळू वापरून गुणवत्ता व दर्जा वाढविण्यावर भर दिला जाणार आहे,

त्यामध्ये भ्रूणप्रत्यारोपणासारखे पर्याय वापरले जाणार आहेत. उच्च दर्जाची दूधनिर्मिती व विक्री व्यवस्था वाढविण्यासाठी भारतीय गाईंचा वंशसुधार, प्रजजन व संवर्धन कार्यक्रम राबविला जाणार आहे. याखेरीज मुरघास तंत्रज्ञानाचा सहजासहजी वापर करण्याबाबत प्रत्यक्ष उपक्रम राबविला जाणार आहे.

इतर अॅग्रो विशेष
कर्जमाफीची कूर्मगतीराज्यात दोन आठवड्याने उशिरा मॉन्सून दाखल झाला...
सोयीनुसार निवडणूक घेण्याचे ढोंग कशाला?देशापुढील वास्तव संकटे, समस्या अग्रक्रमाने...
मराठवाड्यातील ५८ तालुक्यांत पाऊसऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यामध्ये रविवारी (...
पीकविम्यातील हलगर्जीपणा; कृषी...पुणे : प्रधानमंत्री पीकविमा योजनेची कामे करताना...
मॉन्सूनने निम्मा महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
तुरळक ठिकाणी मुसळधारेची शक्यतापुणे : राज्याच्या दक्षिण भागात मॉन्सूनने आगमन...
औरंगाबाद, कोपरगाव, येवल्यात धोधो पाऊसपुणे : कोकणानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील...
`गुणनियंत्रण`चा चेंडू आता ‘एसीबी’च्या...पुणे : राज्याच्या कृषी विभागातील गुणनियंत्रण...
आटपाडीत पावसाने पाणीपातळीत वाढसांगली : आटपाडी तालुक्याच्या पश्चिम भागात दोन...
मराठवाड्यात सर्वदूर पावसाच्या सरीऔरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...
नाशिक येथे बुधवारी पाणी व्यवस्थापन परिषदनाशिक ः सातत्याने उद्भवणाऱ्या दुष्काळी स्थितीमुळे...
राज्यात चार वर्षांत १२ हजार...मुंबई  : शेतकऱ्यांना सुखी करण्याचे...
योग्य ओलाव्यावर करा पेरणी बाजरी बाजरी पिकाकरिता पाण्याचा उत्तम निचरा...
प्रक्रिया उद्योगातून बनविली ओळखअमरावती येथील जयश्री रवींद्र गुंबळे यांनी गेल्या...
ग्रामविकास, आरोग्य अन् शिक्षणासाठी ‘खोज...मेळघाट परिसरातील आदिवासी लोकांच्या विकासासाठी...
मॉन्सून मंगळवारपर्यंत संपूर्ण राज्य...पुणे  : राज्यात दाखल होताच नैर्ऋत्य मोसमी...
मराठवाडा, विदर्भातील दक्षिण भागात...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) वेगाने...
पाणीवापर संस्थांनी वाढवावी कार्यक्षमता सहकारी उपसा जलसिंचन योजनेच्या इतिहासाची माहिती...
पत्रास कारण की ...पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व...
दुग्धव्यवसाय, प्रक्रियेने दिला शेताीला...बुलडाणा शहरापासून सुमारे दहा किलोमीटरवरील अजिसपूर...