नव्या कीटकनाशकांना अँटिडोटच नाही
विनोद इंगोले
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

कृषी विभाग आणि संशोधन संस्थांवरचा विश्‍वास उडाल्यामुळेच शेतकरी कृषी सेवा केंद्राच्या भरवशावर आहे. या दोन्ही यंत्रणांकडून पुरेसे मार्गदर्शन झाले असते, तर शेतकऱ्यांवर ही वेळ आलीच नसती.
- डॉ. शरदराव निंबाळकर, माजी कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

शेती झाली विषारी... भाग ६

यवतमाळ  ः कृषी सेवा केंद्रांवरील अवलंबित्व आणि नव्याने बाजारात आलेल्या कीटकनाशकांना अँटिडोटची उपलब्धताच नसणे ही कारणेदेखील विषबाधा प्रकरणाशी जोडली गेली आहेत. परिणामी सरसकट कीटकनाशकांकरिता एकाच प्रकारची उपचार पद्धती यामुळे अंगीकारली जात असल्याचा दावादेखील या क्षेत्रातील तज्ज्ञांनी केला आहे.

 ‘‘देशभरात केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणीकरण समिती (सीआयबीआरसी)च्या मान्यतेनंतर कीटकनाशकांना लेबल क्‍लेम जारी केले जाते. कोणत्या पिकाकरिता कोणते कीटकनाशक किंवा त्यातील घटक उपयोगी आहेत त्यानुसार वापरण्यास मान्यता दिली जाते,’’ अशी माहिती नागपूर येथील डॉ. पंजाबराव देशमुख कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राम गावंडे यांनी दिली. 

‘सीआयबीआरसी’ने मान्यता दिलेल्या काही कीटकनाशकांच्या पॅकिंगवर अँटिडोटच नसल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे विषबाधा झालेल्या रुग्णांकरिता सरसकट एकाच प्रकारची उपचारपद्धती अवलंबिली जाते. यवतमाळमधील प्रकरणातदेखील असेच घडल्याची शक्‍यता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरदराव निंबाळकर यांनी व्यक्‍त केली.             (समाप्त)

प्रतिक्रिया
कृषी विभाग आणि संशोधन संस्थांवरचा विश्‍वास उडाल्यामुळेच शेतकरी कृषी सेवा केंद्राच्या भरवशावर आहे. या दोन्ही यंत्रणांकडून पुरेसे मार्गदर्शन झाले असते, तर शेतकऱ्यांवर ही वेळ आलीच नसती. बाजारात नव्याने फिप्रोनील, इमीडाक्‍लोप्रीड, ऍझोक्सीस्ट्रोबीन यांसह अनेक रसायने आली आहेत; ज्यांच्या पॅकिंगवर अँटिडोटचाच उल्लेख नाही. शासनाने याची गंभीर दखल घेणे अपेक्षित होते; परंतु यात दुर्लक्षच झाल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध होत आहे. त्यासोबतच कृषी विभाग आणि सोबतच कृषी विद्यापीठानेदेखील आपली विस्तार यंत्रणा अधिक विस्तारित करण्याची गरज आहे.
- डॉ. शरदराव निंबाळकर, माजी कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

इतर ताज्या घडामोडी
संत गजानन महाराज संस्थान करतेय...शेगाव, जि. बुलडाणा : शिस्त, सेवा अाणि समाज...
परभणीतील शेतकऱ्यांना कर्जमाफी... परभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
राज्यातील बहुतांशी भागांत उकाडा वाढलापुणे : परतीचा पाऊस राज्यातून गेल्याने बहुतांशी...
कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक ः सदाभाऊ खोत कोल्हापूर : शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नयेत...
कर्जमाफी शेतकऱ्यांना ताकद देणारी ः... बुलडाणा : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज...
अपयश लपविण्यासाठी भाजपकडून खोटी...मुंबई: दुसऱ्या टप्प्यातील ३७०० ग्रामपंचायतींच्या...
औरंगाबादेत २९ ऑक्‍टोबरला 'मराठा महासभा' औरंगाबाद : मराठा समाजातर्फे राज्यभर 57 मोर्चे...
नागपुरात सोयाबीन प्रतिक्‍विंटल २७५०...नागपूर ः बाजारात सोयाबीनच्या दरात होणाऱ्या किरकोळ...
केवळ अमळनेरलाच कडधान्य खरेदी केंद्र सुरू जळगाव  ः जिल्ह्यात मंगळवारपर्यंत (ता. १७)...
परभणीत प्रतिक्विंटल टोमॅटो १२०० ते १८००...परभणी ः येथील कृषी उत्पन्न बाजार...
आयुर्वेदिक रेसिपींच्या आस्वादासाठी...पुणे ः आयुर्वेदात उल्लेख असलेल्या...
परभणी जिल्ह्यात कृषी विभागातील ३१ टक्के...परभणी ः परभणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी...
वाटाणा लागवड कधी करावी?वाटाणा लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगल्या...
नागपूर ३६.४ अंशांवरपुणे : राज्यातील काही भागांत कमाल तापमानात वाढ...
कोल्हापुरात भाजीपाल्याचे दर वधारलेकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
जळगावात उडदाची आवक घटलीजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवड्यात...
नाशिकला टोमॅटोची आवक निम्म्याने घटलीनाशिक : नाशिक जिल्ह्यात ऑक्‍टोबरच्या पहिल्या...
उत्पादकता घटल्याने फूल मार्केटमध्ये...नागपूर : परतीच्या पावसाचा फटका बसल्याने या वर्षी...
मंचर बाजार समितीत कटतीद्वारे लूटपुणे : पालेभाज्यांसाठी आणि विशेषतः काेथिंबीरीसाठी...
नांदेड विभागात ३३ कारखान्यांच्या...परभणी : नांदेड विभागातील ५ जिल्ह्यांतील ३३ साखर...