agriculture news in marathi, New policies of Annasaheb Patil federation declared | Agrowon

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या नवीन कर्ज योजनांना मान्यता
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 नोव्हेंबर 2017

मुंबई : आर्थिक मागास समाजातील तरुणांना व्यवसायासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत आखलेल्या कर्ज व्याज परताव्याच्या तीन योजनांना राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या संदर्भातील शासन निर्णयही काढण्यात आला असल्याची माहिती महसूलमंत्री तथा मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भातील उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. तसेच, मराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्ग आयोगाची पहिली बैठक येत्या २९ नोव्हेंबर रोजी पुण्यात होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबई : आर्थिक मागास समाजातील तरुणांना व्यवसायासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत आखलेल्या कर्ज व्याज परताव्याच्या तीन योजनांना राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या संदर्भातील शासन निर्णयही काढण्यात आला असल्याची माहिती महसूलमंत्री तथा मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भातील उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. तसेच, मराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्ग आयोगाची पहिली बैठक येत्या २९ नोव्हेंबर रोजी पुण्यात होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भातील उपसमितीची बैठक श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. या वेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, कामगारमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, समितीचे सदस्य सचिव दिनेश वाघमारे उपस्थित होते. श्री. पाटील म्हणाले, की मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यावर राज्य शासनाने योग्य कार्यवाही सुरू केली आहे. यापूर्वीच आर्थिक मागास शुल्कासाठी उत्पन्न मर्यादा एक लाखावरून सहा लाख करणे, या मर्यादेतील इतर मागास समाजातील विद्यार्थ्यांचे निम्मे शिक्षण शुल्क सरकारने भरणे, ६०५ अभ्यासक्रमांचा समावेश छत्रपती शाहू महाराज शुल्क प्रतिपूर्ती योजनेत करणे, असे निर्णय घेतले आहेत.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या सध्याच्या बीज भांडवल कर्ज योजना, गट प्रकल्प कर्ज योजना बंद करून नव्या योजनांना मान्यता देण्यात आली आहे. मराठा समाजातील तरुणांना उद्योगासाठी साह्य व्हावे, यासाठी या तीन योजना प्रस्तावित करण्यात आल्या होत्या. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा, गट कर्ज व्याज परतावा, शेतकरी उत्पादक गटासाठी गट प्रकल्प कर्ज योजना, अशा तीन योजनांचा शासन निर्णय काढण्यात आला आहे. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेत दहा लाखांपर्यंतचे कर्ज बँकेतून घेतल्यानंतर त्याचे व्याज महामंडळामार्फत लाभार्थीच्या खात्यात परत देण्यात येणार आहेत.

गट व्याज परतावा योजनेत एका गटास दहा लाख ते जास्तीत जास्त ५० लाखांपर्यंतचे कर्ज घेतल्यास त्याचे व्याज परत करण्यात येणार आहे. तर शेतकरी उत्पादक गटाने अर्ज केल्यास महामंडळामार्फत या गटास दहा लाखांपर्यंत कर्ज बिनव्याजी मिळणार आहे. तसेच या तीनही योजनांत दिव्यांगांसाठी चार टक्के निधी राखीव ठेवण्यात आला आहे. या तीनही योजना संपूर्ण ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार असल्याचेही श्री. पाटील यांनी या वेळी सांगितले.

डॉ. पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत या वर्षी आतापर्यंत एक लाख ३५ हजार विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्यासाठी संस्थांना दहा हजार रुपये प्रतिविद्यार्थी अशी रक्कम देण्यात येणार आहे. तर कायमस्वरूपी वसतिगृहासाठी पाच कोटी राज्य शासन देणार आहे. त्या संदर्भातही आखणी सुरू आहे, अशी माहितीही त्यांनी या वेळी दिली.

इतर ताज्या घडामोडी
भाजपत दोघांचीच मनमानी : यशवंत सिन्हापुणे : सध्या लोकशाही धोक्यात आणणा-या भाजपची घमेंड...
सरकार स्थापनेनंतर लगेचच शेतकऱ्यांना...नवी दिल्ली : छत्तीसगड, राजस्थानमध्ये कॉंग्रेसचे...
शाश्वत भविष्यासाठी अन्न पद्धतीमध्ये...सन २०५० पर्यंत जगाची लोकसंख्या सुमारे १० अब्ज...
परभणीत प्रतिटन २२०० रुपये ऊसदरासाठी ‘...परभणी ः गंगाखेड शुगर्स साखर कारखान्याने गेल्या...
नांदेड, परभणी, हिंगोलीत 'शेतीमाल तारण'...नांदेड ः शेतीमाल तारण योजनेअंतर्गत नांदेड, परभणी...
कोल्हापूर जिल्ह्यात लाळ्या खुरकूतचा...कोल्हापूर : जिल्ह्यात लाळ्या खुरकूत रोगाने थैमान...
औरंगाबादेत गटशेती संघाचे पहिले विभागीय...औरंगाबाद : ‘शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी...
शेतकरीप्रश्‍नी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा...टाकळी राजेराय, जि. औरंगाबाद ः सध्या असलेल्या...
जळगाव जिल्ह्यातील वाळूठेक्‍यांवरील बंदी...जळगाव : नागपूर खंडपीठाने स्थगिती उठविल्याने...
गाळपेराची कार्यवाही तात्काळ पूर्ण करा नाशिक : नाशिक जिल्ह्यात जूनपर्यंत पुरेल एवढा चारा...
निकम समितीचा अहवाल बाहेर निघण्याची...पुणे  : जलयुक्त शिवार योजनेत कृषी विभागाने...
मराठा जातप्रमाणपत्र वितरणातील संभ्रम...पुणे  : मराठा समाजाला शासकीय जातप्रमाणपत्र...
शेतकरी संघटना अधिवेशन : 'निसर्ग कमी, पण...शिर्डी, जि. नगर  : पोळ्यापासून पाऊस नाही,...
जमीन अधिग्रहणाविरोधात...कोल्हापूर  : रत्नागिरी-नागपूर व विजापूर-...
घटनादुरुस्तीनंतरचे कायदे शेतकऱ्यांसाठी...शिर्डी, जि. नगर  ः शेतकऱ्यांसंबंधी केलेले...
तीन हजार कोटी खर्चूनही बेंबळा प्रकल्प...यवतमाळ   ः चार तालुक्‍यांतील शेतीसाठी वरदान...
अकोट बाजारात कापसाला ५८०० रुपयांपर्यंत...अकोला  ः वऱ्हाडातील कापसाची प्रमुख बाजारपेठ...
नगर जिल्ह्यात ३८ हजार हेक्‍टरवर कांदा...नगर   ः जिल्ह्यातील बहुतांश भागात दुष्काळी...
फूल प्रक्रियेसाठी उद्योग उभारण्याची गरज...पुणे   ः पांरपरिक शेतीमधून शेतकऱ्यांचे...
कळमणा बाजारात गहू प्रतिक्‍विंटल २५०० ते...नागपूर ः नागपूर बाजार समितीत मंगळवारी (ता. ११)...