बचत गट आणि महिलांसाठी दुधाळ जनावर वाटप योजना

बचत गट आणि महिलांसाठी दुधाळ जनावर वाटप योजना
बचत गट आणि महिलांसाठी दुधाळ जनावर वाटप योजना

पुणे : महिला व बालकल्याण आणि पशुसंवर्धन मंत्रालयाच्या वतीने प्रत्येक महिलेला आणि बचत गटांना दुधाळ पशुधनाचे वाटप करणाऱ्या योजनेची घोषणा महिला व बालविकास आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी येथे केली. 

पशुसंवर्धन विभागाच्या वतीने आयाेजित १२७ व्या पशुसंवर्धन दिनानिमित्त रविवारी (ता. २०) आयाेजित पशुपालक मेळावा व राज्यस्तरीय आभासी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्‍घाटन ग्रामविकास व महिला बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार विजय काळे, महेश लांडगे, पशुसंवर्धन विभागाचे सचिव किरण कुरुंदकर, आयुक्त कांतिलाल उमाप आदी उपस्थित हाेते.  मंत्री जानकर म्हणाले, ‘‘पशुसंधर्वन विभागाच्या विविध याेजनांतून शेतकरी आणि पशुपालकांना शाश्‍वत उत्पन्न मिळत आहे. मातंग समाजातील नागरिकांसाठी शेळी-मेंढी पालनाची नवीन याेजना आॅगस्टमध्ये सादर करणार आहाेत. प्रत्येक महिलेला आणि बचत गटांना दुधाळ पशुधनाचे वाटप आणि शेळी-मेंढी योजनांना मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता घेण्यात येईल. महिला बालकल्याण विभागाच्या वतीने स्थापन बचत गटांसाठी शेळी-मेंढी व कुक्कुटपालन याेजना आखण्यात येत आहे. विभागाच्या सहकार्याने ग्रामीण भागातील प्रत्येक महिलेच्या नावाने दुधाळ पशुधन वाटप करण्यात येणार आहे. हे पशुधन सांभाळण्यासाठी उत्तर प्रदेशच्या धर्तीवर हाेस्टेल उभारण्यात येणार आहे. मंत्री मुंडे म्हणाल्या, ‘‘शेतीकडे बघण्याचा नकारात्मक दृष्टिकाेन बदलण्याची गरज आहे. यासाठी ‘इंटरेस्टिंग’ शेतीसाठी प्राेत्साहन देणे आवश्‍यक असून, यासाठी महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने घरातील प्रत्येक महिलेच्या नावावर एक दुधाळ पशुधन देण्याचा विचार आहे. तसेच या पशुधनाचा एकत्रित सांभाळ करण्यासाठी गाेशाळेच्या धर्तीवर हाेस्टेल उभारण्यात येणार आहे.’’ मंत्री कांबळे म्हणाले, ‘‘मातंग समाजातील प्रत्येक घटकासाठी शेळी-मेंढी याेजना अण्णा भाऊ साठे महामंडळाच्या आर्थिक सहकार्याने पशुसंवर्धन विभागाच्या समन्वयाने राबविण्यात येणार आहे, ही याेजना आॅगस्ट महिन्यापासून अमलात येईल.’’  यावेळी पशुपालनामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या पशुपालक आणि शेतकऱ्यांचा गाैरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सचिव किरण कुरुंदकर यांनी मनाेगत व्यक्त केले. प्रास्ताविक पशुसंवर्धन आयुक्त उमाप यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. धनंजय परकाळे यांनी केले.  हा...जी, हा...जी करावी लागते  मी ४० वर्ष पक्षात काम करत असून, मला आजही हा..जी...हा..जी करावी लागत आहे. त्यामुळे २-४ एकर जमीन करून निवांत शेती करावीशी वाटते. यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या याेजना असतील तर मला मदत करा, असे वक्तव्य समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी केले. माझे खाते अर्थमंत्री मागतात ‘‘पशुसंवर्धन मंत्री अडगळीचा मंत्री अशी या खात्याची आेळख हाेती. मात्र, जेव्हा मी या खात्याची जबाबदारी घेतली तेव्हा हे खाते मिळविण्यासाठी मारामारी हाेईल असे काम करून दाखविले, असे मी म्हणालाे हाेताे. त्यानुसार मी काम करत असून, पशुसंवर्धन आयुक्तालयाला आयएसाे प्रमाणपत्र मिळाले आहे. तर एक हजारपेक्षा जास्त पशुवैद्यकीय दवाखान्यांना आयएसाे प्रमाणपत्र मिळालेले आहे. यामुळे या खात्याचा दबदबा आणि निधी वाढत असून, हे खाते मला द्यावे,’’ अशी मागणी अर्थमंत्र्यांकडून हाेत असल्याचे मंत्री जानकर यांनी सांगितले.  मंत्री जानकर म्हणाले...

  • उत्तर प्रदेशच्या धर्तीवर पशुधनाचा सामूहिक सांभाळ करण्यासाठी ‘हाेस्टेल’
  • ‘एसएमएस’द्वारे पशुवैद्यकीय अधिकारी गाेठ्यावर उपलब्ध हाेणार 
  • सात राज्यांचे केंद्र असणारी महत्त्वपूर्ण प्रयाेगशाळा पुण्यात उभारणार 
  • दीड हजार पदे भरून पशुसंवर्धन विभागाला नवचैतन्य आणणार 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com