agriculture news in marathi, new seed varieties extension stoped | Agrowon

बियाण्यांच्या नव्या वाणांचा प्रसार रोखला
टीम अॅग्रोवन
शनिवार, 5 मे 2018

पुणे : बियाणे विक्रीतील बनवेगिरी रोखण्यासाठी बियाण्यांतील अंतर्गत गुणधर्मांचा ‘डीएनए’ चाचणीचा चांगला निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र, नव्या वाणांचा प्रसार रोखल्यामुळे बियाणे उद्योग संतप्त झाला आहे. 

पुणे : बियाणे विक्रीतील बनवेगिरी रोखण्यासाठी बियाण्यांतील अंतर्गत गुणधर्मांचा ‘डीएनए’ चाचणीचा चांगला निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र, नव्या वाणांचा प्रसार रोखल्यामुळे बियाणे उद्योग संतप्त झाला आहे. 

राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी नवी नियमावली लागू केली आहे. त्यामुळे बियाणे कंपन्यांना डस (बियाणे भिन्नता-समानता-स्थिरता गुणधर्म) चाचणी व डीएनए फिंगर प्रिंट (डायरायबो न्यूक्लिक अॅसिडचे ठसे) प्रमाणपत्र सक्तीचे केले आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला कृषी विद्यापीठांनी चाचण्या पूर्ण केलेल्या चांगल्या वाणांनादेखील कृषी विभागाने मान्यता रोखल्यामुळे बियाणे उद्योगातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. 
"नवीन व जादा उत्पादन देणाऱ्या संशोधित वाणांपासून राज्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाने का वंचित ठेवले आहे, हा प्रश्न अनुत्तरित आहे. राज्याच्या कृषी उत्पादनाची भरभराट होण्यात संशोधित व नव्या बियाण्यांचा वाटा मोठा आहे. मात्र, शासनाची सध्याची भूमिका बुचकळ्यात टाकणारी आहे, असे बियाणे उद्योगातील सूत्रांचे म्हणणे आहे. 

शेतकऱ्यांसाठी नवीन वाण तयार करण्यात राज्यातील कृषी विद्यापीठे, संशोधन संस्था तसेच खासगी बियाणे कंपन्यांचे योगदान आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत नवीन वाण शेतकऱ्यांना उपलब्ध होण्याचे प्रमाण घटले आहे. अशा स्थितीत खासगी संशोधनातून तयार झालेल्या वाणांना परवानगी न देण्याची भूमिका कृषी विभागाने घेतल्यामुळे शेतकऱ्यांचाही तोटा होत असल्याचे दिसून येते.

बियाणे उद्योगाच्या म्हणण्यानुसार, “खासगी कंपनीने परिश्रमपूर्वक नवे वाण शोधल्यानंतर कोणालाही थेट बाजारात आणता येत नाही. त्यासाठी कृषी विद्यापीठात दीड लाख रुपये शुल्क भरून चाचण्या कराव्या लागतात. अशा चाचण्यांमध्ये उत्तम कामगिरी बजावणारे वाण पुन्हा कृषी विभागाच्या छाननी समितीपुढे ठेवले जाते. या समितीत कृषी विभागाबरोबरच विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांचाही समावेश असतो. त्यामुळे कोणत्याही कंपनीला मनमानी करता येत नाही. मात्र, या समितीने शिफारस करूनदेखील मान्यता मिळत नाही. कृषी विभागाचे नेमके कोणते ‘हेतू’ या मागे आहेत हे कळत नाही.”

परराज्यांत मान्यता
 महाराष्ट्रात बियाण्यांच्या नव्या वाणांचा प्रसार रोखला असला तरी याच वाणांना परराज्यांतील कृषी विभागांची मान्यता मिळाली आहे. त्यामुळे नव्या वाणांचे उत्पादन होऊन शेतकऱ्यांना या वाणांची उपलब्धतादेखील करून देण्यात आलेली आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना नव्या वाणांपासून वंचित ठेवले जात आहे काय, याचे आत्मपरीक्षण सरकारी यंत्रणेने करावे. नव्या वाणांना मान्यता न मिळाल्यास नाईलास्तव न्यायव्यवस्थेकडे आम्हाला दाद मागावी लागेल, असेही बियाणे उद्योगाने स्पष्ट केले आहे. 
 

इतर अॅग्रो विशेष
आरोग्यदायी ड्रॅगन फ्रूटशरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि...
वनस्पतीच्या ताण स्थितीतील संदेश यंत्रणा...वनस्पतीतील ताणाच्या स्थितीमध्ये कार्यरत होणाऱ्या...
आर्थिक, सामाजिक, कृषिसंपन्न राजुरीचा...आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत व...
नाला खोलीकरणात गेलेे शेत; न्यायासाठी...अकोला ः उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी यंत्रणा...
पावणेतीन हजार कोटींची ‘वसुंधरा’त...पुणे : कृषिविस्तार व सल्ला देण्याचे काम सोडून...
कांदा संचालनालयाला राष्ट्रीय संस्थेचा...पुणे : राजगुरुनगर भागात असलेल्या कांदा, लसूण...
शेतकऱ्यांना मिळणार तालुकानिहाय हवामान...दिल्ली : देशातील सुमारे साडेनऊ कोटी शेतकऱ्यांना...
राज्यात उष्णतेची लाट येणारपुणे : सूर्य आग ओकायला लागल्याने विदर्भात उन्हाचा...
हमीभाव वाढीचा बागुलबुवा आणि वास्तवलोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांच्या...
‘कॅप्सूल’ सुधारणार मातीचे आरोग्यमहाराष्ट्र राज्यासाठी या वर्षी रासायनिक खतांची...
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...
दक्षिण आशियात यंदा सर्वसामान्य मॉन्सून...पुणे  : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या...
कृषिउद्योग महामंडळाकडून ‘बायोकॅप्सूल’चा...पुणे : सेंद्रिय शेतीकडे वळालेल्या शेतकऱ्यांच्या...
शासन दरबारी रब्बी हंगामात नागपूर...नागपूर  : खरिपानंतर पाण्याअभावी रब्बी...
बीटी बियाणे १५ मेपूर्वी विक्रीस मनाईपुणे : राज्यातील बियाणे उत्पादक कंपन्यांनी १५...
जमिनीचे जैविक पृथक्करणआजकाल शेतकऱ्यांना मातीचा पृथक्करण अहवाल करून...
सांगलीतून १२ टन द्राक्षे निर्यातसांगली ः यंदा प्रतिकूल परिस्थतीतही जिल्ह्यातील...
काळजी घ्या : उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : उन्हाच्या झळा वाढल्याने विदर्भ,...