agriculture news in marathi, New soybean market has increased in Nagpur | Agrowon

नागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक वाढली
विनोद इंगोले
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली तरी दर अवघ्या २९०० रुपयांवर स्थिरावल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. गेल्या आठवड्यात सोयाबीनची आवक २५०० क्‍विंटलच्या घरात होती. ती या आठवड्यात दुपटीने वाढत पाच हजार ७०० क्‍विंटलपर्यंत पोचली आहे.

नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली तरी दर अवघ्या २९०० रुपयांवर स्थिरावल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. गेल्या आठवड्यात सोयाबीनची आवक २५०० क्‍विंटलच्या घरात होती. ती या आठवड्यात दुपटीने वाढत पाच हजार ७०० क्‍विंटलपर्यंत पोचली आहे.

बाजारात महिन्याच्या सुरवातीला २५८३ क्‍विंटलची आवक होती. २७५० ते ३१३१ रुपये क्‍विंटल असा दर त्या वेळी शेतकऱ्यांना मिळाला. त्यानंतर हंगामातील नवे सोयाबीन बाजारात दाखल होत आवक पाच हजार क्‍विंटलपेक्षा अधिकची होऊ लागली. परिणामी, सोयाबीनच्या दरात घसरण होत ते २५०० ते २९५८ रुपये क्‍विंटलपर्यंत खाली आल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.

भुईमूग शेंगाची देखील बाजारात आवक होत आहे. सरासरी ५० क्‍विंटल इतकी ही आवक असून गेल्या आठवड्यात शेंगाचे दर  ३००० ते ४००० रुपये क्‍विंटल होते. त्यात किंचितशी वाढ नोंदविण्यात आली आहे. भुईमूग शेंगाचे दर ३२०० ते ४२०० रुपये क्‍विंटलवर पोचले. तुरीची बाजारातील आवक मंदावली आहे. ३३५० ते ३५०० रुपये क्‍विंटल असा तुरीचा गेल्या आठवड्यात दर होता. हे दर या आठवड्यात ३२०० ते ३४७१ रुपये क्‍विंटलपर्यंत खाली आला.

तुरीची सरासरी आवकदेखील ५० क्‍विंटल इतकी अत्यल्प आहे. बाजारात मुगाची १५ क्‍विंटल इतकी अत्यल्प आवक आहे. ३७०० ते ४००० रुपये क्‍विंटलचा मुगाचा दर होता. त्यात अल्पशी वाढ होत हे दर ३९०० ते ४१०० रुपये क्‍विंटलवर पोचले. हरभऱ्याचे दर गेल्या आठवड्यात ३५०० ते ४०२५ रुपये क्‍विंटलवर होते. ते कमी होत या आठवड्यात दर ३५०० ते ३९०० रुपये क्‍विंटलवर आले. हरभऱ्याची आवक १५० क्‍विंटलच्या घरात आहे. ज्वारीची देखील बाजारात ८८ क्‍विंटल इतकी आवक असून १८०० ते २००० रुपये क्‍विंटलने ज्वारीचे व्यवहार होत आहेत. सरबती गहूदेखील बाजारात दाखल झाला आहे. ३०० क्‍विंटल इतकी गव्हाची आवक असून २५०० ते २९०० रुपये क्‍विंटलवर गव्हाचे दर स्थिरावले आहेत. लुचई तांदूळ २२०० ते २५०० रुपयांवर गेल्या पंधरवाड्यापासून स्थिर आहे. तांदूळाची आवक १०० क्‍विंटलच्या घरात आहे.

इतर ताज्या घडामोडी
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...
कांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर   ः कांद्याचे दर घसरल्याने...