संत्रा, मोसंबी बागांचे नव्याने सर्वेक्षण

संत्रा, मोसंबी बागांचे नव्याने सर्वेक्षण
संत्रा, मोसंबी बागांचे नव्याने सर्वेक्षण

नागपूर : जिल्ह्यातील काटोल, नरखेड व कळमेश्‍वर तालुक्‍यातील संत्रा-मोसंबी पिकांचे नव्याने सर्व्हेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले. या तीनही तालुक्‍यातील २३ हजारांहून अधिक बागायतदारांना यांचा फायदा होणार आहे. तीन तालुक्‍यांत सुमारे १८ हजार ५५१ हेक्‍टरवरील पिकांच्या नुकसानीचा अंदाज आहे. 

काटोल तालुक्‍यात ९ हजार १२० हेक्‍टरपैकी ६ हजार ३९४ हेक्‍टर, नरखेड तालुक्‍यात १२ हजार ६७३ हेक्‍टरपैकी ८ हजार ५४९ हेक्‍टरमधील पिकांचे नुकसान झाले. कळमेश्‍वर तालुक्‍यात ३ हजार ६०८ हेक्‍टरमधील संपूर्ण संत्रा-मोसंबी पीक वाया गेले. नरखेडमधील ७ हजार २५४ शेतकऱ्यांचा नुकसानग्रस्तांमध्ये समावेश आहे. मात्र बहुवार्षिक पिकाच्या यादीतून संत्रा, मोसंबी पिकांना वगळण्यात आले. शेतकऱ्यांवर नुकसानभरपाईपासून वंचित राहण्याची वेळ आली.

कृषी विभागाने बहुवार्षिक फळपीक योजनेमध्ये संत्रा व मोसंबी पिकांचे नुकसान झाले नसल्याचा अहवाल राज्य सरकारला दिला होता. त्यामुळे संत्रा-मोसंबी बागायतदारांवर दुष्काळी मदतीपासून वंचित राहण्याची वेळ आली होती. संत्रा व मोसबी उत्पदकांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी काटोल पंचायती समितीचे सभापती संदीप सरोदे, नरखेड पंचायत समितीचे सभापती राजू हरणे व काटोल नगरपालिकेचे सत्तापक्ष गटनेते चरणसिंग ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com