agriculture news in marathi, New technologies being used for fast implementation of schemes: Agri Minister | Agrowon

दीडपट हमीभावासाठी स्वतंत्र सूत्र : राधामोहनसिंह
वृत्तसेवा
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

नवी दिल्ली : उत्पादन खर्चाच्या तुलनेत दीडपट हमीभावाचे नियोजन करण्यात येत आहे. याकरिता राज्य सरकार अाणि निती अायोगाच्या मदतीने स्वतंत्र सूत्र ठरविण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी येथे दिली. 

लोकसभेत प्रश्‍नोत्तराच्या तासात एका प्रश्‍नाला उत्तर देताना कृषी अाणि शेतकरी कल्याण मंत्री श्री. सिंह बोलत होते. ते म्हणाले, की देशातील शेती उत्पादनवाढीकरिता शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान मिळण्यासाठी केंद्र सरकारने विविध योजनांखालील निधी सर्व राज्य सरकारांना वर्ग केला आहे.  

नवी दिल्ली : उत्पादन खर्चाच्या तुलनेत दीडपट हमीभावाचे नियोजन करण्यात येत आहे. याकरिता राज्य सरकार अाणि निती अायोगाच्या मदतीने स्वतंत्र सूत्र ठरविण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी येथे दिली. 

लोकसभेत प्रश्‍नोत्तराच्या तासात एका प्रश्‍नाला उत्तर देताना कृषी अाणि शेतकरी कल्याण मंत्री श्री. सिंह बोलत होते. ते म्हणाले, की देशातील शेती उत्पादनवाढीकरिता शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान मिळण्यासाठी केंद्र सरकारने विविध योजनांखालील निधी सर्व राज्य सरकारांना वर्ग केला आहे.  

केंद्र सरकारपुरस्कृत ‘आत्मा’ प्रकल्प देशातील २९ राज्यांतील ६७६ जिल्ह्यांत राबविला जातो. याकरिताचा निधी राज्य सरकारांना देण्याच्या सूचना करण्यात आल्याची माहिती मंत्री सिंह यांनी सभागृहास दिली. ते पुढे म्हणाले, की आत्माअंतर्गत शेतकरी प्रशिक्षण, प्रत्यक्ष पाहणी, प्रक्षेत्र भेटी, शेतकरी मेळावे, शेतकरी गटांचे निर्माण अाणि शेतीशाळांचे आयोजन करण्यात येते.

देशातील खरीप आणि रब्बी पिकांची उत्पादकता अाणि उत्पादनवाढीकरिता केंद्र सरकार राज्यांच्या माध्यमातून विविध पीक विकास योजनांची अंमलबजावणी करते. यात राष्ट्रीय कृषी विकास योजना, पंतप्रधान सिंचन योजना अाणि राष्ट्रीय शाश्‍वत शेती अभियान यांचा समावेश आहे. पीकविमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे दावे येत्या तीन आठवड्यांत निकाली काढले जातील.

इतर अॅग्रो विशेष
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...
रसदार उन्हाळी काकडी अर्थकारणाला देतेय...जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, यावल, जळगाव आदी...
बॅंक अधिकारी झाला पूर्णवेळ प्रयोगशील...विशाखापट्टण व त्यानंतर हैद्रराबाद येथे खासगी...
स्मार्ट प्रकल्पाचा केंद्रबिंदू शेतमाल ‘...पुणे : राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांना आता पिकवायचे...
पूर्व विदर्भात गारपीटपुणे  ः दोन दिवसांपूर्वी मध्य भारतात तयार...
जनावराच्या आहारात पाणी महत्त्वाचेजनावरांचे योग्य पोषण होण्यासाठी तसेच दुग्धोत्पादन...
राज्यात १७८ तालुक्यांत भूजल चिंताजनकपुणे ः कमी झालेला पाऊस, वाढत असलेला पाण्याचा उपसा...
दरामुळे साखरेचा रंग फिकाकोल्हापूर : साखरेचे विक्री मूल्य वाढविल्यानंतरही...
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...