agriculture news in marathi, new works include in employment guarantee scheme, nagpur, maharashtra | Agrowon

‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेश
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 24 जानेवारी 2019

नागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. त्यानुसार आता या योजनेत नव्याने २८ कामांचा समावेश करण्यात आला आहे. 

ग्रामीण भागात मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्धतेत महत्त्वाची भूमिका बजावण्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा वाटा आहे. या योजनेत आता नव्याने २८ कामांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे रोजगार उपलब्धतेच्या कक्षाही रुंदावण्यास मदत होणार आहे.

नागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. त्यानुसार आता या योजनेत नव्याने २८ कामांचा समावेश करण्यात आला आहे. 

ग्रामीण भागात मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्धतेत महत्त्वाची भूमिका बजावण्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा वाटा आहे. या योजनेत आता नव्याने २८ कामांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे रोजगार उपलब्धतेच्या कक्षाही रुंदावण्यास मदत होणार आहे.

नव्याने समावेश करण्यात आलेल्या कामांमध्ये शालेय स्वयंपाक निवारा, नाला-मोरी बांधकाम, सिमेंट रस्ता, पेव्हिंग ब्लॉक, डांबर रस्ता, शाळेसाठी, खेळाच्या मैदानासाठी साखळी कुंपण, अंगणवाडी बांधकाम, ग्रामपंचायत भवन, सामूहिक मत्स्यतळे, सार्वजनिक जागेवरील शेततळे, कॉँक्रीट नाला बांधकाम, आरसीसी मुख्य निचरा प्रणाली, भूमिगत बंधारे, सिमेंट नाला बांध, कॉम्पोझिट गॅबियन बंधारा, बचत गटांच्या जनावरांसाठी सामूहिक गोठे, स्मशानभूमी शेड बांधकाम, नाडेप कंपोस्ट मैदानासाठी संरक्षक भिंत, बाजार ओटा बांधणे आदी कामांचा समावेश आहे.

पूर्वी बहुतांश कामे जिल्हा परिषदेचा जलसंधारण विभाग, राज्य शासनाचा लघू पाटबंधारे विभाग, बांधकाम विभागाच्या माध्यमातून केली जात होती. पूर्वी मर्यादित स्वरूपातच कामे होत असत. आता नव्या कामांमुळे रोजगार उपलब्धतेचीदेखील व्याप्ती वाढण्यास मदत होणार आहे. 

‘जलयुक्‍त शिवार’ला मिळणार बळ
रोजगार हमी योजनेत नव्याने २८ कामांचा समावेश करण्यात आला आहे. यातील बहुतांश कामे जलयुक्‍त शिवार योजनेशी संबंधित आहेत. सिमेंट नालाबांध, भूमिगत बंधारा, आरसीसी निचरा प्रणाली, शेततळे, सामूहिक मत्स्यतळे यांचा त्यामध्ये समावेश आहे. पावसाळ्यापूर्वी ती करावी लागतील.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...