agriculture news in marathi, New year labour contract in crises due to crop payment delay | Agrowon

पाडव्याच्या वायद्यात शेतमालाच्या भावाचा वांदा
हरी तुगावकर
शनिवार, 17 मार्च 2018

लातूर : राज्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने गुढीपाडवा हा सर्वात महत्त्वाचा सण आहे. या निमित्ताने शेतकरी वर्षभरासाठी सालगड्यासोबत वायदे करतात, करार करून घेतात. यातूनच मोठ्या प्रमाणात तूर, हरभरा आदी शेतमाल विक्रीसाठी बाजारात येत आहे. पण याला हमीभावदेखील मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. याच शासनाने तूर, हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्याचा फार्स केला. यात गेल्या दीड महिन्यात एकट्या लातूर जिल्ह्यातील सात हजार शेतकऱ्यांना शासनाने एक रुपयाही पेमेंट केलेले नाही. या शेतकऱ्यांचे ४० कोटी रुपये थकले आहेत.

लातूर : राज्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने गुढीपाडवा हा सर्वात महत्त्वाचा सण आहे. या निमित्ताने शेतकरी वर्षभरासाठी सालगड्यासोबत वायदे करतात, करार करून घेतात. यातूनच मोठ्या प्रमाणात तूर, हरभरा आदी शेतमाल विक्रीसाठी बाजारात येत आहे. पण याला हमीभावदेखील मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. याच शासनाने तूर, हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्याचा फार्स केला. यात गेल्या दीड महिन्यात एकट्या लातूर जिल्ह्यातील सात हजार शेतकऱ्यांना शासनाने एक रुपयाही पेमेंट केलेले नाही. या शेतकऱ्यांचे ४० कोटी रुपये थकले आहेत. या वर्षी पाडव्याच्या वायद्यात शेतमालाच्या भावाचा वांदा राहिल्याने शेतकरी अडचणीत आहेत.

हजार ते बाराशेने भाव पडलेले
पाडव्याच्या तोंडावर अडत बाजारात तूर, हरभरा ही दोन महत्त्वाचे शेतमाल बाजारात येतात. सध्या या दोन्ही शेतमालांची मोठी आवक आहे. तुरीला शासनाचा क्विंटलला ५४५० तर हरभऱ्याला ४४०० रुपये प्रति क्विंटलला हमी भाव आहे. पण बाजारात मात्र हरभरा सरासरी ३४०० व तूर ४२०० रुपये प्रति क्विंटलने विकली जात आहे. हमी भावापेक्षा हजार ते बाराशे रुपये कमी भावाने तूर, हरभरा विक्री शेतकऱ्यांना हंगाम काढणीपासून करावी लागत आहे.

पैसेही वेळेवर मिळेनात
शासनाने दीड महिन्यापूर्वी हमी भावाप्रमाणे तूर खरेदी केंद्र सुरू केले आहेत. लातूर जिल्ह्यात यात ३६ हजार १२५ शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. आतापर्यंत सात हजार १०९ शेतकऱ्यांनी ७२ हजार १३९ क्विंटल तूर शासनाने खरेदी केली आहे. पण त्याचा एक रुपयाही शेतकऱ्य़ांना दिला गेला नाही. ४० कोटी रुपये शासनाकडे थकले आहेत. त्यात आणखी २९ हजार शेतकऱ्यांची तूर खरेदी केंद्रावर आलेली नाही ती आल्यानंतर तर हा आक़डा मोठा होणार आहे. पण पैसेच मिळत नसल्याने शेतकरी कमी भावाने आपला माल बाजारात विकत आहेत. हरभऱ्याचीदेखील एक हजार ७४७ शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. याची तर खरेदी सुरूच झालेली नाही. त्यामुळे शासनाकडून खरेदीचा केवळ फार्स केला जात असल्याचे चित्र आहे.

सालगड्याची मनधरणी करण्याची वेळ
गुढी पाडव्यादिवशी शेतकरी सालगड्यासोबत वर्षभरासाठी करार करतात. सध्या सालगड्याचे लाखावर दर आहेत. त्यांना पाडव्या दिवशी ७५ टक्के रक्कम अागावू दिली जाते. आज अनेक शेतकऱ्यांची ही रक्कमही देण्याची परिस्थिती नाही. पण करार तर करावा लागणार आहे. त्यामुळे सध्या तरी सालगड्याची खूप मनधरणी शेतकऱ्यास करावी लागत आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ७२ हजार क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे. पण अद्याप पेमेंट झालेले नाही. मुला मुलींचे लग्न, रुग्णालयासाठी शेतकरी पैसे मागत आहेत. एका शेतकऱ्याने तर मुलीचे लग्न मोडत आहे, मला आत्महत्येशिवाय पर्याय नाही असे मोबाईलवरून सांगितले आहे. याची सर्व माहिती संबंधीतांना कळविण्यात आली आहे.
- वाय. ई. सुमठाणे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी. 

तुरीसाठी आॅनलाइन नोंदणी केली. त्यानंतर बऱ्याच दिवसांनी नंबर आला. गेल्या दहा फेब्रुवारीला २४ क्विंटल तूर अहमदपूरच्या खरेदी केंद्रावर विक्री केली आहे. वारंवार चकरा मारूनही पैसे मिळत नाहीत. वरून आल्यानंतर तुमच्या खात्यावर जमा होतील, असे सांगितले जात आहे. पाडव्याला सालगडी ठेवावे लागतात. त्यांना ६० ते ७० टक्के रक्कम अगाऊ द्यावी लागते. पैसे वेळेवर मिळत नसल्याने अडचणी आहेत.
- भारत येरमे, शेतकरी, वळसंगी, ता. अहमदपूर

इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात रब्बीची केवळ १९ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा दुष्काळाची छाया किती...
केळीच्या आगारातून आखातात जाणार ४००...जळगाव ः केळीचे आगार असलेल्या जळगाव जिल्ह्यातून...
महाकॉट ब्रॅण्डची चमक पडली फिकीजळगाव ः पूर्व विदर्भ, उत्तर मराठवाडा व खानदेशातील...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथअंबाणी (जि. सातारा) येथील सौ. सुरेखा पांडुरंग...
दक्षिण कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात आज...पुणे : दक्षिण भारतामध्ये असलेल्या ‘गज’...
अभ्यास अन् नियोजनातून शेती देते समाधाननाशिक शहरातील प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध...
‘सीसीआय’ची कापूस खरेदी मंगळवारपासून...जळगाव : कापूस खरेदीसंबंधी जिनिंगमध्ये केंद्र...
दुष्काळ, मराठा आरक्षण अधिवेशनात गाजणारमुंबई : उद्यापासून (ता. १९) मुंबईत सुरू होत...
शेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...
बा सरकार, प्रश्न जगण्याचा आहे!‘‘ज रा कुठे दुष्काळ पडला, गारपीट झाली,  पूर...
विना `सहकार` नाही उद्धारग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत...
राज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे   : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...
महाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा  ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...
दुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...
ओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...
सोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...
राज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....
कापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...
चारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...
दुष्काळात २५ एकरांत शेवगा, रंगबिरंगी...मुंबई येथील ‘कोचिंग क्लास’चा व्यवसाय असलेले तपन...