भाजपविरोधात मोट बांधण्याचे प्रयत्न

भाजपविरोधात मोट बांधण्याचे प्रयत्न
भाजपविरोधात मोट बांधण्याचे प्रयत्न

मुंबई - राज्य सरकारला तीन वर्षे पूर्ण होत असताना एकहाती सत्ता राबविणाऱ्या भाजपला घेरण्यासाठी विरोधी पक्षांची मोट बांधली जात असल्याचे सूचित होत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 

अशी भेट झाल्याच्या वृत्ताला शरद पवार यांनी दुजोरा दिला. भाजपसोबत सत्तेत राहण्याची उद्धव ठाकरे यांची मानसिकता नसल्याचे या भेटीत जाणवल्याचे मतही पवार यांनी व्यक्त केले. मात्र इतर राजकीय भूमिकेबाबत चर्चा झाली नाही, असा खुलासाही त्यांनी केला. 

शरद पवार यांच्या "सिल्व्हर ओक' या निवासस्थानी गेल्या आठवड्यात ही भेट झाली. उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत हे दोघेजण पवार यांना भेटले. ठाकरे यांनी सतत भाजपवर टीकेचा भडिमार सुरू ठेवला असून, नुकतीच त्यांनी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीही भेट घेतली होती. या पार्श्वभूमीवर देशभरात भाजप विरोधकांची मोट बांधली जात असल्याचे सूचित होत आहे. 

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट गुप्त होती. सुमारे दोन तासांच्या या भेटीत राज्यातील राजकीय परिस्थिती व भाजपच्या सत्ता राबविण्याच्या अनेक घटनांवर दोघांत सखोल चर्चा झाल्याचे समजते. 

या बाबत शरद पवार यांना विचारले असता ते म्हणाले, की ठाकरे व माझे संबध पूर्वीपासूनचे आहेत. बाळासाहेब असताना आम्ही नेहमी एकमेकांच्या भेटी घेत होतो. या अगोदरही उद्धव ठाकरे मला भेटले आहेत. त्यामुळे ही भेट राजकीय होती असे मानू नये. भाजप व शिवसेनेत सतत ताणले जाणारे संबध पाहता ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. 

शिवसेनेचे मौन  शरद पवार यांना भेटल्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी मौन स्वीकारले आहे. दहा दिवसांपूर्वी पवार-ठाकरे यांची भेट झाल्याची चर्चा उघड झाली असताना शिवसेनेने या विषयावर पूर्णपणे मौन बाळगले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com