agriculture news in marathi, NHM application deadline extented till 30th june | Agrowon

‘एनएचएम’च्या अर्जासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 जून 2018

पुणे : एकात्मिक फलोत्पादन अभियानातील (एनएचएम) घटकासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी १९ जून रोजी दहा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना आता ३० जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. तसेच राज्यातील सर्व तालुका व जिल्हास्तरीय सोडत दहा जुलै या एकाच दिवशी होणार असल्याची माहिती राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाचे संचालक प्रल्हाद पोकळे यांनी दिली. 

पुणे : एकात्मिक फलोत्पादन अभियानातील (एनएचएम) घटकासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी १९ जून रोजी दहा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना आता ३० जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. तसेच राज्यातील सर्व तालुका व जिल्हास्तरीय सोडत दहा जुलै या एकाच दिवशी होणार असल्याची माहिती राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाचे संचालक प्रल्हाद पोकळे यांनी दिली. 

या योजनेअंतर्गत हरितगृह, शेडनेट, शेततळे अस्तरीकरण, हरितगृहातील उच्च दर्जाचे लागवड साहित्य, फुले व भाजीपाला, ट्रँकर, पाॅवर टिलर, शीतगृह, रायपनिग चेंबर, रेफर व्हँन, पीक संरक्षणे, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, कांदा चाळ उभारणी, मधुमक्षिकापालन या घटकाकरिता आँनलाईन अर्ज करता येणार आहे. सामूहिक शेततळे या घटकाकरिता फक्त अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहे.

शेतकऱ्यांनी www.hortnet.gov.in या संकेतस्थळावर आॅनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. शेतकऱ्यांना या घटकाअंतर्गत सहाशे ते एक लाख रुपयापर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी नोंदणीकरिता सात बारा उतारा, आठ अ, आधार कार्ड, आधारकार्ड लिक बँक खाते, पासबुक झेराॅक्स, हमीपत्र, जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. 
अधिक माहितीसाठी जवळच्या तालुका कृषी अधिकारी, मंडळकृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. पोकळे यांनी केले. 

योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत २० जून ठेवण्यात आली होती. या योजनेस शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला असून आतापर्यंत एक लाख पंचवीस हजार अर्ज दाखल झाले आहेत. अजूनही अनेक शेतकरी अर्ज करण्याचे शिल्लक असून अर्जासाठी मुदतवाढ करण्याची मागणीचे संदेश येत होते. त्यामुळे दहा दिवस म्हणजेच ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 
- प्रल्हाद पोकळे, संचालक, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान 
 

इतर ताज्या घडामोडी
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...