agriculture news in marathi, nine gov staff were noticed for false survey of hailstorm | Agrowon

गारपीट सर्वेक्षणात दिरंगाई करणाऱ्या ९ जणांना नोटीस
टीम अॅग्रोवन
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

बुलडाणा ः जिल्ह्यात ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान झालेल्या गारपिटीचा सर्व्हे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले होते. यानुसार सर्व्हे न करता दिरंगाई करण्याचा प्रकार खामगाव तालुक्यात समोर आल्याने तीन मंडळ अधिकाऱ्यांसह सहा तलाठ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. कृषी, महसूल कर्मचाऱ्यांनी हा सर्व्हे करणे अपेक्षित होते.

खामगाव तालुक्यात गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्या नुकसानाची पाहणी करून विहित प्रपत्रामध्ये माहिती सादर करण्यासाठी तलाठ्यांसह मंडळ अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले होते.

बुलडाणा ः जिल्ह्यात ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान झालेल्या गारपिटीचा सर्व्हे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले होते. यानुसार सर्व्हे न करता दिरंगाई करण्याचा प्रकार खामगाव तालुक्यात समोर आल्याने तीन मंडळ अधिकाऱ्यांसह सहा तलाठ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. कृषी, महसूल कर्मचाऱ्यांनी हा सर्व्हे करणे अपेक्षित होते.

खामगाव तालुक्यात गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्या नुकसानाची पाहणी करून विहित प्रपत्रामध्ये माहिती सादर करण्यासाठी तलाठ्यांसह मंडळ अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले होते.

खामगाव विभागातील तीन मंडळ अधिकाऱ्यांसह सहा तलाठ्यांनी वेळेवर गारपीटग्रस्त भागाची पाहणी करून सर्व्हे अहवाल सादर न केल्याने त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये, अशी नोटीस देण्यात आली. खामगावचे तहसीलदार सुनील पाटील यांनी ही नोटीस देत खुलासा मागितला आहे. खामगाव हा कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचा तालुका असून, गारपीट होताच ते स्वतः तालुक्यात पाहणीसाठी गेले होते. दिवसभर दौरा करून त्यांनी तातडीने सर्व्हे करण्याचे आदेश यंत्रणांना दिले होते. मात्र खामगाव विभागातच मंडळ अधिकारी आणि सहा तलाठ्यांनी अहवाल सादर न केल्याने खुलासा मागण्यात आला आहे.

इतर ताज्या घडामोडी
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...