agriculture news in marathi, Nine percent water stock decreased in fifty days | Agrowon

पन्नास दिवसांत नऊ टक्‍के पाणीसाठा घटला
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 डिसेंबर 2017

औरंगाबाद : मराठवाड्यातील ८६४ मोठ्या, मध्यम, लघू प्रकल्पांसह बंधाऱ्यांमधील उपयुक्‍त पाणीसाठा पन्नास दिवसांत जवळपास ९ टक्‍यांनी घटला आहे. १५ डिसेंबरअखेर मराठवाड्यातील सर्वच प्रकल्पांमध्ये ५६ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक असून, ७४३ लघू प्रकल्पांध्ये ४५ टक्‍केच उपयुक्‍त पाणी असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.

औरंगाबाद : मराठवाड्यातील ८६४ मोठ्या, मध्यम, लघू प्रकल्पांसह बंधाऱ्यांमधील उपयुक्‍त पाणीसाठा पन्नास दिवसांत जवळपास ९ टक्‍यांनी घटला आहे. १५ डिसेंबरअखेर मराठवाड्यातील सर्वच प्रकल्पांमध्ये ५६ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक असून, ७४३ लघू प्रकल्पांध्ये ४५ टक्‍केच उपयुक्‍त पाणी असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.

मराठवाड्यात ऑक्‍टोबरच्या मध्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे मराठवाड्यातील पाणीसाठ्यातील पाणीपातळीत वाढ झाली होती. खासकरून बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड आदी जिल्ह्यांत परतीच्या पावसाने पाणीसाठ्यातील पाणीपातळी वाढविण्यात विशेष हातभार लावला होता. २७ ऑक्‍टोबरनंतर मात्र सर्वच पाणीसाठ्यांमधील पाणीपातळी हळूहळू कमी होण्यास सुरवात झाली. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात संकल्पित साठ्याच्या तुलनेत ६४ टक्‍क्‍यांवर असलेला उपयुक्‍त पाणीसाठा डिसेंबरच्या सुरवातील ५९ टक्‍क्‍यांवर आला.

१५ डिसेंबरअखेर तो घटून पुन्हा ५६ टक्‍क्‍यांवरच आला आहे. मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या येलदरी व ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पात प्रत्येकी केवळ १३ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा आहे. तर निम्न मनारमध्येही १९ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा आहे. गतवर्षी १५ डिसेंबरअखेर ११ मोठ्या प्रकल्पांत ७० टक्‍के असलेला उपयुक्‍त पाणीसाठा यंदा मात्र याच तारखेअखेर ५९ टक्‍केच आहे.

उपयुक्‍त पाणीसाठ्याबाबत जालना, नांदेड, परभणी व हिंगोली या चारही जिल्ह्यांची स्थिती यंदा थोडी कमजोरच आहे. जालना जिल्ह्यातील ५७ लघू प्रकल्पांत १५ डिसेंबरअखेर केवळ ३१ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा आहे. नांदेड जिल्ह्यातील ८८ लघू प्रकल्पांत ३० टक्‍के, परभणी जिल्ह्यातील २२ लघू प्रकल्पांत २६ टक्‍के, तर हिंगोली जिल्ह्यातील २७ लघू प्रकल्पांत केवळ ३१ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.

८ मध्यम प्रकल्पांत उपयुक्‍त पाणीच नाही

औरंगाबाद जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांपैकी तब्बल आठ प्रकल्पांत उपयुक्‍त पाण्याचा थेंब नाही. यामधील काही प्रकल्पांमध्ये तर यंदा उपयुक्‍त काय पाण्याचा थेंबही साठला नाही. दुसरीकडे औरंगाबाद जिल्ह्यातील ९० लघू प्रकल्पांमध्येही केवळ २५ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे यंदा मराठवाड्यात सर्वाधिक टंचाईची झळ औरंगाबाद जिल्ह्यालाच बसणार हे जवळपास स्पष्ट आहे.

इतर ताज्या घडामोडी
ऊस गाळपात इंदापूर कारखान्याची आघाडी पुणे  : जिल्ह्यात सर्व १७ साखर कारखान्यांनी...
निवडणुकीमुळे चाराटंचाईकडे दुर्लक्ष;...पुणे  : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना...
नाशिक जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी...नाशिक  : जिल्ह्यातील टंचाईच्या झळा तीव्र होत...
सभा मोदींची; प्रशासनाने घेतली...नाशिक : लोकसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ २२ एप्रिल...
नगर : पशुधन वाचविण्यासाठी इतर...नगर : जिल्ह्यात २८ लाख लहान-मोठे जनावरे आहेत....
सौर कृषिपंप योजना खोळंबलीजळगाव : सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मराठवाड्यात पाणीपुरवठ्यासाठी २३५९ टँकरऔरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळामुळे होणारी...
नत्र ऱ्हास रोखण्यासोबत वाढवता येईल...शेतकरी आपल्या मक्याच्या उत्पादनांचा अंदाज...
खानदेशात पाणंद रस्त्यांची कामे ठप्पजळगाव : खानदेशात जानेवारीत मंजुरी मिळालेल्या,...
म्हैसाळची विस्तारित योजना पूर्ण करणार...जत, जि. सांगली : ‘‘जत तालुक्याच्या पूर्व भागाला...
पुणे विभागात रब्बी कांद्याचे ३६ लाख टन...पुणे   ः रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी...
गारपीट, वादळी पावसाने पुणे जिल्ह्याला...पुणे  : जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेल्या...
जळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ६५००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
अवकाळी पावसाने वऱ्हाडात दाणादाणअकोला   ः वऱ्हाडातील अनेक भागात...
नगर जिल्ह्यातील १२८ गावांत दूषित पाणीनगर  : ‘सर्वांना शुद्ध पाणी’ यासाठी सरकार...
आमच्या काळात एकही घोटाळा नाही :...सोलापूर : काँग्रेस आघाडी देशाला मजबूत करू...
सातारा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी...सातारा : जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून ढगाळ...
बहुपयोगी नत्रयुक्त खत `कॅल्शिअम...सावकाश उपलब्ध होण्याच्या क्षमतेमुळे कॅल्शियम...
जल, मृद्‌संधारणासाठी पूर्वमशागत...जमिनीमध्ये चांगले पीक उत्पादन येण्याकरिता भौतिक,...
कृषी सल्ला : भुईमूग, आंबा पीक भुईमूग शेंगा अवस्था भुईमूग पीक आऱ्या...