agriculture news in marathi, At the nine places in the district, finally start online registration | Agrowon

नगर जिल्ह्यात नऊ ठिकाणी अखेर ऑनलाइन नोंदणी सुरू
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018

नगर ः मूग, उडीद, सोयाबीनची शेतकऱ्यांना हमी दराने विक्री करता यावी यासाठी नगर जिल्ह्यामध्ये नऊ ठिकाणी खरेदी केंद्रे सुरू होत असून तेथे बुधवार (ता. ३) ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. शासनाने ठरवल्याप्रमाणे सूर न होता उशिराने ऑनलाइन नोंदणी सुरू झालेली आहे. मात्र, सध्या तरी ९ आक्‍टोबरपर्यंतच नोंदणी सुरू राहणार आहे. नऊ केंद्राशिवाय अजून पाच ठिकाणी केंद्रे सुरू करण्याचे प्रस्तावित आहे.

नगर ः मूग, उडीद, सोयाबीनची शेतकऱ्यांना हमी दराने विक्री करता यावी यासाठी नगर जिल्ह्यामध्ये नऊ ठिकाणी खरेदी केंद्रे सुरू होत असून तेथे बुधवार (ता. ३) ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. शासनाने ठरवल्याप्रमाणे सूर न होता उशिराने ऑनलाइन नोंदणी सुरू झालेली आहे. मात्र, सध्या तरी ९ आक्‍टोबरपर्यंतच नोंदणी सुरू राहणार आहे. नऊ केंद्राशिवाय अजून पाच ठिकाणी केंद्रे सुरू करण्याचे प्रस्तावित आहे.

खरिपातील मूग, उडदाचे पीक हाती आले आहे. सोयाबीनला अजून काही दिवस अवधी आहे. मात्र, यंदा सोयाबीनचेही बऱ्यापैकी उत्पादन हाती आले आहे. नगरसह जिल्हाभरातील बाजार समित्यात मात्र मालाचा दर्जा चांगला नसल्याचे कारण पुढे करत हमी दरापेक्षा कमी दराने मूग, उडीद, सोयाबीनची सर्रास खरेदी केली जात आहे. हमीदरापेक्षा कमी दराने शेतमालाची खरेदी झाली तर त्या व्यापाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश आहेत. मात्र, कोणत्याही बाजार समितीने आत्तापर्यंत एकही कारवाई केलेली नाही.

जिल्हा उपनिबंधक कार्यालयही ‘तक्रार नसल्याचे कारण पुढे केले जात आहे. जिल्ह्यामध्ये सोयाबीन, मूग, उडीद याचे किती उत्पादन निघेल याचा अंदाज घेऊन जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने हमी केंद्रे सुरू करण्याची गरजेबाबत वरिष्ठ कार्यालयाला कळवले होते. खरेदी केंद्रे सुरू होण्याआधी शासनाने शेतकऱ्यांनी सोयाबीन, मूग, उडीद विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी करण्याचे सांगितले होते. त्यानुसार बुधवार (ता. ३) पासून नगरमध्ये नऊ ठिकाणी ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे.

शासनाने २५ सप्टेंबरपासून मूग, उडदाची तर १ आक्‍टोबरपासून सोयाबीनची नोंदणी सुरू असल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र नऊ दिवस उशिरा नोंदणी सुरू झालेली असली तरी सध्यातरी ९ आक्‍टोबरपर्यंतच नोंदणी सुरू राहणार आहे.

ऑनलाइन नोंदणीचे केंद्रे
श्रीगोंदा
ः तालुका खरेदी विक्री संघ
कर्जत ः बापूसाहेब देशमुख विविध कार्यकारी सोसायटी, राशीन
जामखेड ः पुणश्‍लोक अहल्यादेवी होळकर कृषी प्रक्रिया उद्योग
शेवगाव ः जगदंबा महिला ग्राहक सहकारी सोसायटी
नगर ः तालुका खरेदी विक्री संघ
पारनेर ः अमरसिंह फर्मा प्रोड्युसर कंपनी
राहुरी ः तालुका खरेदी विक्री संघ
श्रीरामपूर ः मुळा-प्रवरा फर्मा प्रोड्युसर कंपनी
राहाता ः साईकृपा फर्मा प्रोड्युसर कंपनी, कोल्हार

इतर बातम्या
भारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
व्यवस्थेनेच शेतकऱ्यांना ओरबडले : राजू...कोल्हापूर ः ‘देशात अनेक राजवटी आल्या; पण या...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...
चारा छावण्या सुरू न केल्यास आंदोलन :...नगर : दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकाने...
साखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...
कांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...
देशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...
आंबा मोहर सल्ल्यासाठी तज्ज्ञ बांधावर जालना : हवामानाचा बदलता अंदाज पाहता फळ संशोधन...
मापाडींच्या प्रश्नांबाबत सरकार...सोलापूर  : राज्यातील बाजार समित्यातील हमाल-...
तीन वर्षांपूर्वीचा हरभरा बियाणे घोळाचा...अकोला ः २०१६-१७ च्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना...