जलवाहतूक स्वस्त होते, ती वाढविण्यावर भर- नितीन गडकरी

'मी मंत्री झाल्यापासून चांदणी चौकाच्या डिझाईनवर काम सुरू आहे. हे डिझाईन अवघड आहे. पुढील 25 वर्षांचे नियोजन असून, 14 हेक्टर जागेपैकी 4 हेक्टर जागा ताब्यात आली आहे. पालिका जागा देणार आहे. येथे वाहतूक कोंडी होते, ती कमी केली जाईल,' असे गडकरी यांनी सांगितले.
जलवाहतूक स्वस्त होते, ती वाढविण्यावर भर- नितीन गडकरी
जलवाहतूक स्वस्त होते, ती वाढविण्यावर भर- नितीन गडकरी

पुणे : देशात वाहनांच्या संख्येत वाढ होत आहे. पुण्यात ही वाढ जास्त होत आहे. वाहनांची वाढ जास्त होत असल्याने देशात 7500 समुद्र मार्ग, 111 नद्यांवर जलमार्ग सुरू करण्याचे नियोजन आहे. पाण्यावरून स्वस्त वाहतूक होते, त्यामुळे ती वाढविण्यावर भर आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. 

सरकारने राष्ट्रीय महामार्ग वाढविले. हवेतून चालणाऱ्या बसेस आणल्या. मुळा मुठा नदीत जलवाहतूक महामार्ग सुरू होऊ शकतील. जहाजातून 2000 च्या ऐवजी 4000 किलो टन माल जातो. कोळशापासून मिथेन वायू बनवून जहाज चालतील. ऑटो हब असलेल्या पुण्यातुन JNPT वरून मोठी निर्यात केली जाते. तसेच, नगर, सोलापूर, सांगली येथे ड्राय पोर्ट बांधणार आहोत, असे गडकरी यांनी सांगितले. 

पुण्यात हवाई वाहतूक सुरू करण्याची तयार आहे. पायलट प्रोजेक्ट करता येईल. इलेक्ट्रिक बस, डबल डेकर बस सुरू करता येतील. नागपूरला 200 टॅक्सी बस सुरू केल्या आहेत. 

रिंगरोड राज्य सरकारकडे आहेत. मी केंद्रात महाराष्ट्राचा अँबॅसेडर आहे. पालखी मार्ग करणार ते अधिक चांगले करणार आहोत. पुढील 3 महिन्यांत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे भूमिपूजन करणार आहोत. वाखरीला 10 हेक्टर जागा असून, भंडीशेगाव वेळापूर येथे पालखी तळ करण्यात येणार आहे.  पालखी पायी चालणाऱ्यांसाठी हिरवळ करणार आहे. यामध्ये परदेशी गुंतवणूक नाही. यासाठी बँकेपेक्षा जास्त व्याज देऊन पैसे उभे करणार, असे गडकरी यांनी सांगितले. 

चांदणी चौक रस्त्यावरील उड्डाणपुलाचे डिझाईन 'IIT मुंबई'कडून करून घेतले आहे, अशी माहिती NHAI चे अधिकारी डी.ओ. तावडे यांनी दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com