agriculture news in marathi, Nitin Gadkari appeals farmers not to take sugarcane | Agrowon

'आणखी साखर तयार कराल, तर खड्ड्यात जाल'
टीम अॅग्रोवन
सोमवार, 22 एप्रिल 2019

विटा, जि सांगली : पाणी आले म्हणून साखरेचे उत्पादन न घेता इथेनॉल निर्मिती करा, तरच पश्‍चिम महाराष्ट्र वाचेल. साखरेचे उत्पादन घेत बसला तर तुम्हाला वाचवण्याची ताकद सरकारमध्ये नाही. आणखी खड्ड्यात जाल, असा इशारा केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी दिला. 

सांगली लोकसभा मतदारसंघातील प्रचाराचा समारोप रविवारी (ता. २१) झाला. भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार संजय पाटील यांची विट्यात प्रचार सांगता सभा महात्मा गांधी मैदानावर झाली. या वेळी श्री. गडकरी बोलत होते. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, उमेदवार संजय पाटील उपस्थित होते.

विटा, जि सांगली : पाणी आले म्हणून साखरेचे उत्पादन न घेता इथेनॉल निर्मिती करा, तरच पश्‍चिम महाराष्ट्र वाचेल. साखरेचे उत्पादन घेत बसला तर तुम्हाला वाचवण्याची ताकद सरकारमध्ये नाही. आणखी खड्ड्यात जाल, असा इशारा केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी दिला. 

सांगली लोकसभा मतदारसंघातील प्रचाराचा समारोप रविवारी (ता. २१) झाला. भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार संजय पाटील यांची विट्यात प्रचार सांगता सभा महात्मा गांधी मैदानावर झाली. या वेळी श्री. गडकरी बोलत होते. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, उमेदवार संजय पाटील उपस्थित होते.

मंत्री नितीन गडकरी म्हणाले, की टेंभू योजनेचे पाणी आलेले पाहून आनंद वाटला. यामुळे पिकांना पाणी उपलब्ध असेल. पण पाणी आले म्हणून ऊस लावून साखरेचे उत्पादन घेऊ नका. ब्राझीलमध्ये साखरेचे भाव २० रुपये असताना आम्ही ३४ रुपये धरून उसाला दर दिला आहे. पीक पद्धतीत लक्ष घातले नाही तर पुढच्या काळात आणखी फजिती झाल्याशिवाय राहणार नाही. ऊसापासून मळीचे उत्पादन वाढवून इथेनॉलचे उत्पादन घ्या. जेवढे इथेनॉल कराल तेवढे सरकार विकत घेईल. साखरेचे उत्पादन वाढवून आपण खड्ड्यात जाऊ.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्‌टी यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, की प्रश्‍न समजून न घेता आंदोलन कराल तर साखर कारखाने बंद पडतील. मग शेतकरी कुणाला ऊस विकणार? कारखानदारांनी किती चुका केल्या, भ्रष्टाचार केला त्यावर कारवाई करायला हरकत नाही. पण, साखर कारखानदारी किफायतशीर नाही. कारखानदारांचे प्रश्‍न समजून घ्या. शेतकऱ्यांचे कल्याण झाले पाहिजे, त्यांना पैसे मिळाले पाहिजेत. 
ते म्हणाले, की इथेनॉलचे अर्थकारण मजबूत केले पाहिजे. बायोडिझेल, बायोप्लॅस्टिकचे उत्पादन घेतल्यास शेतकऱ्यांची गरिबी हटल्याशिवाय राहणार नाही. शेतकरी समृद्ध, संपन्न झाला पाहिजे. तरुणांना रोजगार मिळेल. हे करण्यासाठी केंद्रात नरेंद्र मोदी सरकार योग्य आहे. 

..तेव्हा माझे वाक्‍य आठवेल
श्री. गडकरी म्हणाले, की मला माहिती आहे पाणी आले की ऊस लावाल. माझे ऐकणार नाही. पण साखर समुद्रात फेकावी लागेल इतके उत्पादन होईल, तेव्हा माझे वाक्‍य आठवेल.

इतर ताज्या घडामोडी
सेंद्रिय पशुपालन पक्ष्यांच्या...फिनलँड येथील युनिव्हर्सिटी ऑफ हेलसिंकी येथील...
सावळी मोहितकर ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून...नागपूर ः शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी स्तरावर...
हळदीला १० हजार रुपये क्विंटल हमीभाव...नांदेड : राज्य आणि केंद्र सरकारने हमीभावाच्या...
चिखलीतील तेल्हारा धरणाच्या गेटदुरुस्तीस...बुलडाणा ः पाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या चिखली...
गंगापुरात बनावट खतसाठा जप्तऔरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर येथील एका खत...
सहकार आयुक्तालयातील नियुक्त्यांचे घोळ...पुणे  : दुष्काळ, कर्जमाफी आणि घसरलेले...
संत्रा बाग वाळल्याने नयाखेडा येथील...अमरावती ः चार बोअरवेल घेतले, इतरांच्या...
नाशिकमध्ये टरबूज प्रतिक्विंटल ७०० ते...नाशिक : नाशिकमध्ये टरबुजाची आवक ९६० क्विंटल झाली...
झाडावर नाही, काळजावर घाव पडतात नगर ः ‘‘दहा वर्षांपूर्वी संत्र्याची लागवड केली...
सातारा जिल्ह्यात २५४ टँकरद्वारे...सातारा  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळाची...
नगरमधील शेतकऱ्यांना साडेचाळीस कोटींचे...नगर  ः सरकारने कांद्याला प्रतिक्विंटल २००...
सांगलीत शेतकऱ्यांचा जनावरांसह मोर्चासांगली  : जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता...
वऱ्हाडात बाजी कुणाची?अकोला ः  लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही...
पुणे विभागात ‘जलयुक्त’ची आठ हजारांवर...पुणे : भूजल पातळी वाढविण्याच्या उद्देशाने...
नेता निवडीचा अधिकार राहुल गांधींनामुंबई  ः काँग्रेस पक्षाचा विधिमंडळ नेता...
लोकसभेच्या निकालावर ठरेल विधानसभेची...नगर ः लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून...
उष्णतावाढीमुळे यावर्षीही साताऱ्यात आले...सातारा  ः मागील तीन ते चार वर्षांपासून मे...
नांदेड जिल्ह्यात १२१ टॅंकरने पाणीपुरवठानांदेड  ः नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईचे...
जलसंधारण कामांसाठी पुणे जिल्ह्याला ११...शेटफळगढे, जि. पुणे  : जिल्ह्यातील जलयुक्त...
पाणीप्रश्नी किनगाव ग्रामपंचायतीवर...रोहिलागड, जि. जालना  : किनगाव येथील महिलांनी...