agriculture news in marathi, nitin gadkari press, pune, maharashtra | Agrowon

राज्याची सिंचन क्षमता ४० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा प्रयत्न : गडकरी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 2 जून 2018

राज्यात यंदा तुरीच्या उत्पादनाबराेबरच तूर डाळ देखील माेठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. ही तूर डाळ केंद्राने खरेदी करावी यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख माझ्याकडे आले हाेते. ही डाळ केंद्राने खरेदी करावी यासाठी प्रयत्नशील आहे.
- नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री.
 

पुणे ः राज्याची सिंचन क्षमता १८ टक्क्यांवरून ४० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा प्रयत्न असून, त्यासाठी १०८ नवीन आणि २६ जुने सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येत आहेत. यासाठी ४० हजार काेटींचा निधी मंजूर असून, २६ अपूर्ण प्रकल्पांचे काम दीड वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी दिली. 

केंद्र सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सरकारने केलेल्या कामगिरीची माहिती देण्यासाठी पुणे येथे शुक्रवारी (ता. १) आयोजित पत्रकार परिषदेत श्री. गडकरी बोलत होते. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट उपस्थित हाेते. 

श्री. गडकरी म्हणाले, की शेतकऱ्यांचे उत्पन्न २०१४ पर्यंत दुप्पट करण्याचे धाेरण केंद्र शासनाने अवलंबले अाहे. त्यासाठी सिंचन क्षेत्र वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. पंतप्रधान सिंचन याेजनेंतर्गत दुष्काळग्रस्त आणि आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी विशेष लक्ष्य देण्यात आले आहे. यासाठी महाराष्ट्रात १०८ नवीन सिंचन प्रकल्प सुरू केले असून, २६ रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. यासाठी सुमारे ४० हजार काेटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ५० टक्क्यांपर्यंत पूर्ण झालेले २६ सिंचन प्रकल्प येत्या दीड वर्षात पूर्ण केले जातील.

यामुळे राज्याची सिंचन क्षमता ४० टक्क्यांपर्यंत पाेचेल. तसेच, सिंचनासाठीचे पाणी आता कालव्याद्वारे देणे बंद करण्यात येणार असून, यापुढे केवळ पाइपद्वारेच पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे. कालव्यांसाठी भूमिअधिग्रहण करावे लागत होते. सध्या सुरू असलेल्या पाइप प्रकल्पामुळे ६ हजार काेटी रुपयांची थेट बचत झाली आहे. ठिबक सिंचनाला प्राेत्साहन देण्यासाठीच्या अनुदान याेजनेला ५ हजार काेटींची देखील तरतूद करण्यात आल्याचे श्री. गडकरी यांनी या वेळी सांगितले.

शेतीशिवाय कुक्कुटपालन, मत्स्यपालन, बांबू लागवडीतून देखील उत्पन्नाचे स्राेत वाढविण्याच्या विविध याेजना आणल्या अाहेत. बांबू मिशनसाठी १ हजार ३०० काेटींची तरतूद करण्यात आली आहे. सागरी आणि गाेड्या पाण्यातील मत्स्यपालनातून ‘ब्ल्यू इकाेनाॅमी’ अधिक बळकट करण्यासाठी सागरमाला याेजनेतून साडेसात हजार किलाेमीटरचे सागरी किनारे आणि २० हजार किलाेमीटरच्या नदीपात्रांमध्ये मत्‍स्यपालनाला प्राेत्साहन दिले जात आहे. यासाठी १० हजार काेटींची तरतूद करण्यात आली आहे. समुद्रातील मासेमारीसाठी मच्छीमारांना ट्राॅलर देण्यात येणार आहेत. यामाध्यामातून पाच पटींनी मासेमारी वाढणार आहे, असे श्री. गडकरी म्हणाले.

 

इतर ताज्या घडामोडी
समुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई  : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...
‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
पुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे   ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...
पुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे  : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...
गोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...
सातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा  ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...
महालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे  ग्रामीण...मुंबई   ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...
सहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर  ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...