शेती विकासासाठी प्रांतभेद असू नये : नितीन गडकरी

नितीन गडकरी
नितीन गडकरी

वरुड, अमरावती ः आजवर विदर्भाच्या अनुशेषाची चर्चा होत होती. निधीची उपलब्धता करीत हा  अनुशेष अवघ्या तीन वर्षांत दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि अनेक कामे सुरू आहेत. मात्र कोणत्याही सरकारने शेती आणि शेतकऱ्यांसाठी असा प्रांतभेद न करता त्यांच्या सर्वांगीण विकासासाठीच प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.  वरुड तालुक्‍यातील गव्हाणकुंड येथे बळिराजा जलसंजीवनी योजना, तसेच सौरऊर्जा फीडरच्या कामाचे कार्यान्वयन रविवारी (ता. २४) करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. मंत्री गडकरी म्हणाले, की कापूस, सोयाबीन आणि धान ही पीकपद्धती विदर्भातील शेतकऱ्यांचे भवितव्य बदलू शकणार नाही. शेतकऱ्यांनी व्यवसायिक पीकपद्धतीचा अंगीकार करीत आर्थिक सक्षमतेचे मार्ग धुंडाळले पाहिजे. अमरावती जिल्ह्यात कार्यान्वित झालेल्या प्रकल्पासोबतच नव्या प्रकल्पाकरिता निधीची उपलब्धता केली जाईल. त्यातून एक लाख ३० हजार हेक्‍टर जमिनी सिंचनाखाली आणण्याचा विचार आहे. रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ८०० कोटी रुपयांची तरतूद असून, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात, याकरिता सामूहिक प्रयत्न होण्याची अपेक्षा गडकरींनी या वेळी व्यक्‍त केली.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री प्रवीण पोटे, आमदार डॉ. अनिल बोंडे, आमदार रवी राणा, रमेश बुंदीले, प्रा. दिनेश सूर्यवंशी, खासदार आनंद आडसूळ, आमदार रवी राणा, आमदार रमेश बुंदीले यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. १०५ प्रकल्पांकरिता २० हजार कोटींची उपलब्धता कॉँग्रेस-राष्ट्रवादी काॅँग्रेसने सिंचनाच्या बाबतीत विदर्भावर अन्याय केला. निधीअभावी विदर्भातील जीवनदायी प्रकल्प रखडले आहेत. बळिराजा जलसंजीवनी योजनेतून १०५ प्रकल्पांकरिता २० हजार कोटींची उपलब्धता केली आहे. अमरावती जिल्ह्यात सिंचन क्षमता पूर्ण करण्याचा मानस आहे. २५ हजारपैकी १२ हजार गावे दुष्काळमुक्‍त झाली. मोर्शी येथे मत्स्य विज्ञान महाविद्यालय सुरू करणार आहे, तसेच २०१९ पर्यंत सगळी गावे दुष्काळमुक्‍त होणार आहेत, अशी माहिती या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com