agriculture news in marathi, nitin gadkari visit to state bank, mumbai, maharashtra | Agrowon

साखर कारखान्यांनी सह-उत्पादनांवर सक्षम व्हावे
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

मुंबई  ः देशांतर्गत साखर उद्योग संकटात आहे. सातत्याने साखरेचे दर कमी-अधिक होत असतात. भविष्यात साखर उद्योगाला तारण्यासाठी कारखान्यांनी साखरेसोबत इथेनॉल, बायो-सीएनजी आदी सह-उत्पादने घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे. राज्य सहकारी बँकेने पूरक उद्योगांच्या उभारणीसाठी कारखान्यांना अर्थसाह्य द्यावे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

मुंबई  ः देशांतर्गत साखर उद्योग संकटात आहे. सातत्याने साखरेचे दर कमी-अधिक होत असतात. भविष्यात साखर उद्योगाला तारण्यासाठी कारखान्यांनी साखरेसोबत इथेनॉल, बायो-सीएनजी आदी सह-उत्पादने घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे. राज्य सहकारी बँकेने पूरक उद्योगांच्या उभारणीसाठी कारखान्यांना अर्थसाह्य द्यावे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

मंत्री गडकरी यांनी राज्य सहकारी बँकेच्या येथील मुख्य कार्यालयाला गुरुवारी (ता. १५) भेट दिली. त्यानंतर ते बोलत होते. या वेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, खासदार संजयकाका पाटील, धनंजय महाडिक, बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर आदी उपस्थित होते.

या वेळी श्री. गडकरी म्हणाले, की सध्या साखर उद्योगाची स्थिती चांगली नाही. तीच स्थिती सूतगिरण्यांचीही आहे. जागतिक बाजारात साखरेला २२ ते २३ रुपये किलो असा दर आहे. केंद्र सरकार प्रति किलो ११ रुपये अनुदान देते. पण शेतकऱ्यांना एफआरपीचे पैसे देण्यासाठी हे पुरेसे ठरत नाही. कारखान्यांनी साखरेच्या उत्पादनासोबतच इथेनॉल, बायो-सीएनजी आदी सह-उत्पादने घेणे ही काळाची गरज आहे. भविष्यात साखर उद्योग टिकवायचा असेल तर त्याला पर्याय नाही.

येत्या काळात आम्ही विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली हे चार जिल्हे डिझेलमुक्त करणार आहोत. या चारही जिल्ह्यातील सर्व ट्रॅक्टर्स बायो-सीएनजीवर चालतील असा प्रयत्न आहे. देशाच्या विकासात कृषी विकास दर महत्त्वाचा ठरत असतो. त्यादृष्टीने शेतीमालाच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

केंद्र शासनाने राज्यातील सिंचन प्रकल्पांना मोठा निधी दिला आहे. त्यामुळे राज्याची सिंचन क्षमता वाढण्यास मदत होणार आहे.  राज्य बँक विदर्भातील आर्थिक अडचणीतील वर्धा, बुलडाणा आणि नागपूर या तीन जिल्हा बँका ताब्यात घेणार आहे. त्यानंतर पुढील दीड- दोन वर्षांत या बँकांचा कारभार सुरळीत होईल, असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला. या वेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी राज्य बँकेने पतसंस्था, विकास सोसायट्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीककर्ज, शेती कर्जपुरवठा करावा अशी सूचना केली.

इतर अॅग्रो विशेष
उद्योगाला साखर कडूचमहाराष्ट्रातील गळीत हंगामाची सांगता नुकतीच झाली...
‘एफआरपी'साठी शेतकरी संघटना पुन्हा...सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदाच्या...
विदर्भात उत्कृष्ट व्यवस्थापन असलेली २३...वर्धा जिल्ह्यात केळी पिकाला पुन्हा गतवैभव प्राप्त...
भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांची पुनर्वसन...पुणे : भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांसाठी पुनर्वसनाची...
वर्षभरात पाच हंगामात दर्जेदार कोथिंबीरपाणी व हवामान यांचा विचार करून वर्षभरात सुमारे...
राज्यात आता पीकविमा शेतकरी सहभाग अभियानपुणे: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी यंदा...
छावण्यातील जनावरांची आठवड्यातून एकदा...मुंबई ः दुष्काळी भागातील चारा छावण्यांमधील...
आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला मागणीकोल्हापूर: निर्यातीच्या बाबतीत पिछाडलेल्या...
शुक्रवारपर्यंत उष्ण लाटेचा इशारापुणे : राज्यात उन्हाचा ताप वाढल्याने चटका असह्य...
आखातात १८ हजार टन केळी निर्यातजळगाव ः मागील दोन महिन्यांत राज्यातून प्रतिदिन १५...
मॉन्सून एक्सप्रेसची गती मंदावली;...पुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शनिवारी (...
कृषी विभागाच्या बदल्या यंदाही...पुणे : कृषी विभागातील बदल्यांचा घोडेबाजार...
एकनाथ डवलेंकडे कृषी सचिवपदाचा पूर्णवेळ...मुंबई : मृद व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले...
परभणी : दुष्काळाच्या फेऱ्यात फळबागा...परभणी ः जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढल्यामुळे...
पूरक धोरणानेच वाढेल निर्यातकें द्रातील मोदी सरकारच्या सुरवातीच्या काळात...
निवडणूक आयोगाला घरचा आहेर! सतरावी लोकसभा निवडण्यासाठीची मतदान प्रक्रिया कालच...
विरोधी पक्षनेता आज ठरणार; पृथ्वीराज...नागपूर ः राधाकृष्ण विखे पाटील यांच्या...
कृषी निविष्ठांमध्ये हवी मधमाशीपुणे : पीक उत्पादनात अत्यंत मोठा हातभार असलेल्या...
विषबाधा नियंत्रणाची जबाबदारी आता...यवतमाळ : जिल्ह्यात फवारणीदरम्यान झालेल्या विषबाधा...
उन्हाचा चटका अन् उकाड्यातही वाढपुणे : विदर्भातील चंद्रपूर, ब्रह्मपुरीसह मध्य...