नव्या सिम कार्डसाठी आधारसक्ती नाही

नव्या सिम कार्डसाठी आधारसक्ती नाही
नव्या सिम कार्डसाठी आधारसक्ती नाही

नवी दिल्ली : कोणत्याही कंपनीचे सिम कार्ड खरेदी करताना आधार कार्ड देणे बंधनकारक नसल्याचे परिपत्रक दूरसंचार विभागाने काढले आहे. आधार कार्डाऐवजी पर्यायी ओळखपत्रे उदा. वाहन परवाना, पासपोर्ट, मतदान ओळखपत्र आदी घेण्यात यावीत, असे सरकारने स्पष्ट केले आहे. ग्राहकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सिम कार्ड कंपन्यांना या निर्णयाची लगेचच अंमलबजावणी करण्याचे आदेश दूरसंचार विभागाच्या सचिव अरुणा सुंदरराजन यांनी दिले आहेत. यापूर्वी कोणतेही सिम कार्ड घेताना आधार कार्ड देणे बंधनकारक होते. आधार कार्डशिवाय कोणालाही सिम कार्ड खरेदी करता येणार नाही, अशी भूमिका सर्व टेलिकॉम कंपन्यांनी घेतली होती. मोबाईल जोडणासाठी आधार कार्डाचे बंधन नसल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिला होता; पण सिम कार्ड कंपन्यांकडून या निर्णयाची अंमलबजावणी झाली नव्हती, म्हणून दूरसंचार विभागाने तात्काळ या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व कंपन्यांना दिले आहेत. परदेशी नागरिक, अनिवासी भारतीयांना काही कालावधीसाठी सिम कार्ड घेण्याची गरज असते. मात्र, टेलिकॉम कंपन्यांच्या आधार सक्तीमुळे ते शक्‍य होत नव्हते. तसेच नवे सिम कार्ड घेतल्यानंतर पडताळणीसाठीही आधार कार्डाची मागणी कंपन्यांकडून करण्यात येत होती. त्यामुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे सरकारने यावर तोडगा काढत इतर अधिकृत ओळखपत्रे घेण्याचे आदेश कंपन्यांना दिले  आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com