Agriculture News in Marathi, no confidence motion against Jalgaon agriculture produce market committee chairman | Agrowon

जळगाव कृषी बाजार समितीच्या सभापतींविरुद्ध अविश्‍वास प्रस्ताव
चंद्रकांत जाधव
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017
जळगाव ः जिल्ह्यातील सर्वात मोठी व राजकीयदृष्ट्या अनेक घडामोडींचा बिंदू असलेल्या जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश आनंदा नारखेडे यांच्याविरुद्ध १३ संचालकांनी अविश्‍वास प्रस्ताव आणला आहे. या संदर्भात सोमवारी (ता.२३) सकाळी जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांना पत्र देण्यात आले. 
 
या वेळी बाजार समितीचे उपसभापती कैलास चौधरी, संचालक सिंधूबाई पाटील, सरला मच्छिंद्र पाटील, प्रशांत अरविंद पाटील, शशिकांत बियाणी, नितीन बेहेडे, अनिल भोळे आदी उपस्थित होते.
 
जळगाव ः जिल्ह्यातील सर्वात मोठी व राजकीयदृष्ट्या अनेक घडामोडींचा बिंदू असलेल्या जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश आनंदा नारखेडे यांच्याविरुद्ध १३ संचालकांनी अविश्‍वास प्रस्ताव आणला आहे. या संदर्भात सोमवारी (ता.२३) सकाळी जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांना पत्र देण्यात आले. 
 
या वेळी बाजार समितीचे उपसभापती कैलास चौधरी, संचालक सिंधूबाई पाटील, सरला मच्छिंद्र पाटील, प्रशांत अरविंद पाटील, शशिकांत बियाणी, नितीन बेहेडे, अनिल भोळे आदी उपस्थित होते.
 
बाजार समितीमध्ये एकूण १८ संचालक निवडून आले असून, यातील भरत धनाजी पाटील यांचे निधन झाल्याने त्यांची जागा रिक्त आहे. आता १७ संचालक असून, ते अविश्‍वास प्रस्तावावर मतदान करतील. मतदान जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार होईल. या आठवड्यात मतदान होईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. 
 
बाजार समितीची निवडणूक १ सप्टेंबर २०१५ रोजी झाली होती. १५ सप्टेंबर २०१५ ला सभापती व उपसभापती यांची निवड झाली. सभापतिपदी भाजपचे प्रकाश आनंदा नारखेडे; तर उपसभापतिपदी कैलास चौधरी यांची निवड झाली होती. 
 
दोन वर्षे कारकीर्द पूर्ण होऊनही राजीनामा नाही
बाजार समितीमध्ये एक वर्षानंतर दुसऱ्या संचालकाला सभापतिपदाची संधी दिली जाईल, असा निर्णय झाला होता. भाजप, शिवसेना व कॉंग्रेसने एकत्र निवडणूक लढली होती. परंतु सभापती नारखेडे यांनी आपली कारकीर्द दोन वर्षे पूर्ण होऊनही राजीनामा दिला नाही. त्यामुळे काही संचालक नाराज झाले होते. या संचालकांनी अखेर सुरेश जैन व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात एकत्र येऊन हा अविश्‍वास प्रस्ताव दाखल केला. 
 
तेरा संचालकांच्या प्रस्तावावर सह्या
अविश्‍वास प्रस्तावार सह्या करणाऱ्या सदस्यांमध्ये उपसभापती कैलास चौधरी, भरत बोरसे, सुरेश श्‍यामराव पाटील, मनोहर पाटील, शशिकांत बियाणी, नितीन बेहेडे, लक्ष्मण पाटील, प्रशांत अरविंद पाटील, अनिल बारसू भोळे, सरला पाटील, सिंधूबाई पाटील, संगीता सपकाळे, वसंत भालेराव यांचा समावेश अाहे. 
 
लक्ष्मण पाटील होणार सभापती
बाजार समितीचे पुढचे सभापती लक्ष्मण गंगाराम पाटील हे असतील, असा निर्णय सुरेश जैन, राज्यमंत्री पाटील यांनी घेतला आहे; तर उपसभापती पुढील काळात दर सहा महिन्यांनी बदलले जातील, असे जैन गटाकडून कळते. 
 
जैन यांच्या बंगल्यावर एकत्र आले संचालक
बाजार समिती सभापतींविरुद्ध अविश्‍वास प्रस्ताव दाखल करण्यापूर्वी संचालक माजी मंत्री तथा शिवसेनेचे नेते सुरेशदादा जैन यांच्या जळगाव शहरातील बंगल्यावर एकत्र जमले. सुरेश जैन यांच्याशी चर्चा झाल्यानंतर संचालक अविश्‍वास प्रस्ताव दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोचले. या संचालकांसोबत महापौर ललित कोल्हेदेखील होते.

इतर ताज्या घडामोडी
अब आया उंट पहाड के निछे; राजू शेट्टींचा...सोलापूर : शेतकऱ्यांच्या दूध दराच्या प्रश्‍...
सरकार रिलायन्स, पतंजलीच्या दुधाची वाट...नागपूर : एकीकडे समाधानकारक पाऊस पडत असताना...
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस-...नागपूर : कधी देणार कधी देणार...कापूस, धानाला...
पीक सल्ला१६ जुलै ते ३१ जुलैपर्यंत पेरणी लांबल्यास संकरीत...
खानदेशात दूध आंदोलनास अल्प प्रतिसादजळगाव ः खानदेशात कुठेही दूध आंदोलनाला उग्र स्वरुप...
संत गजानन महाराज पालखीचे सोलापुरात...सोलापूर : पावसाच्या संततधार सरी झेलत ‘गण गण गणात...
रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेधसांगली ः दूध दरवाढीच्या स्वाभिमानी शेतकरी...
दूध दरप्रश्नी तारसा फाटा येथे आंदोलननागपूर  ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
पुणे जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलनपुणे  ः  दूध दरप्रश्‍नी स्वाभिमानी...
दूध दरप्रश्‍नी वऱ्हाडात आंदोलनअकोला   ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
मराठवाड्यात विविध ठिकाणी दूध संकलन बंदऔरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या आंदोलनाच्या...
नगर जिल्ह्यात दूध संकलन बंदनगर  : दूध दरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी...
केनियात आढळल्या पिवळ्या वटवाघळांच्या...केनियामध्ये पिवळ्या रंगाच्या वटवाघळांच्या जनुकीय...
सातारा जिल्ह्यात दूध दर आंदोलनास मोठा...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला...
झाडांच्या संवर्धनामध्ये हवामान बदलासोबत...तापमानवाढीमुळे अधिक उंचीकडे किंवा उत्तरेकडे...
नागपूर, गडचिरोलीत संततधारनागपूर  : हवामान विभागाने विदर्भात सोमवारी (...
मराठवाड्यातील २४५ मंडळांत पावसाची रिपरिपऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी जवळपास...
पुणे जिल्ह्यात दमदार पाऊसपुणे   : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली...
अकोले तालुक्यात पावसाचा जोर कायमनगर   ः अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील २६...नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६...