agriculture news in marathi, no cut in development fund assures Minister Sudhir Mungantivar | Agrowon

तीस टक्‍के निधीकपातीचा निर्णय मागे
टीम अॅग्रोवन
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

औरंगाबाद : कर्जमाफीच्या घोषणेनंतर राज्य सरकारने विकासकामांवरील निधींमध्ये ३० टक्‍के कपातीचा निर्णय घेतला होता. तो निर्णय आता मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे डीपीडीसीचा शंभर टक्‍के निधी वितरित होणार असल्याची माहिती राज्याचे वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

औरंगाबाद : कर्जमाफीच्या घोषणेनंतर राज्य सरकारने विकासकामांवरील निधींमध्ये ३० टक्‍के कपातीचा निर्णय घेतला होता. तो निर्णय आता मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे डीपीडीसीचा शंभर टक्‍के निधी वितरित होणार असल्याची माहिती राज्याचे वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

मराठवाड्यातील जिल्हा नियोजनच्या (सर्वसाधारण) बैठकीसाठी सोमवारी (ता.५) औरंगाबादेत आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. श्री मुनगंटीवार म्हणाले, की राज्याचा अर्थसंकल्प येत्या ९ मार्च रोजी सादर केला जाणार आहे. त्यासाठीची तयारी म्हणून मराठवाड्यातील आठही जिल्हा नियोजन (सर्वसाधारण) बैठका सोमवारी औरंगाबादेतील विभागीय आयुक्‍तालयातील सभागृहात घेण्यात येत आहे. मागच्या वर्षी मराठवाड्याच्या डिपीडीसीसाठी १४६९ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यानंतर कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर शासनाने निधीमध्ये ३० टक्‍के कपातीचा निर्णय घेतला होता, परंतु निधी कपातीचा निर्णय मागे घेण्यात आल्याने आता हा पूर्ण निधी वितरित होणार आहे.

जिल्हानिहाय निधी नियोजनाचा आढावा घेतांना राज्याचा अर्थमंत्री म्हणून प्रत्येक जिल्ह्याने शिक्षण, पाणी, आरोग्य आणि रोजगार या विषयावर भर देण्याची सुचना प्रत्येक जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांना दिल्याचे मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले. मराठवाड्याच्या विकासासाठी रेशीम, दुग्धविकासाला चालना देण्याच्या मागण्या आमदार, खासदार, अधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आल्या. मराठवाड्यातील रोजगाराच्या प्रस्तावाला पूर्ण शक्‍तीनिशी मान्यता देईल, याची खात्री आपण बैठकीत दिली. भविष्यात सरकार रोजगारावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करणार आहे.

रोटी, कपडा, मकान, शिक्षण रोजगार, आरोग्याविषयीच्या गरजा सर्वांना सहज पूर्ण करता याव्या अशी व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे मराठवाड्यातील रोजगारासंदर्भातील उत्तम योजनांसाठी राज्य सरकार तातडीने निधी उपलब्ध करून देईल याविषयी आपण डीपीडीसीच्या बैठकीत आश्वस्त केल्याची माहितीही त्यांनी दिली. रेशीम विस्तार व दुग्धविकासाविषयी करावयाच्या उपाययोजनांचा सविस्तर आराखडा येत्या आठवडाभरात तयार करून सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे मंत्री मुनगंटीवार म्हणाले. 

तुरीची खरेदी अत्यल्प उत्पादकतेनुसार होत असल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले असता या संदर्भातील पत्र काढणाऱ्या शासनाच्या संबंधित अधिकाऱ्याला त्यांच्या पत्राचा प्रत्येक जिल्ह्याला स्पष्ट अर्थ कळावा, अशा पद्धतीने माहिती देण्याविषयी आपण सांगू, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...