`ई-नाम`मध्ये `ई-पेमेंट` होईना

लातूर : येथील बाजार समितीत ई-लिलावाला शेतकरी, अडते, व्यापाऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
लातूर : येथील बाजार समितीत ई-लिलावाला शेतकरी, अडते, व्यापाऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

लातूर : राज्यातील तीस बाजार समित्यात शासनाच्या वतीने राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) सुरू करण्यात आला आहे. त्यात लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश आहे. बाजार समितीच्या पुढाकाराने ई-नाममध्ये ई-लिलाव सुरू करण्यात आला आहे. त्याला मोठा प्रतिसादही मिळत आहे. गुरुवारी तर ई-लिलावातून आठ हजार क्विंटल सोयाबीनची विक्री झाली आहे. ईनाममध्ये सध्या अकोल्यानंतर लातूर बाजार समितीचा क्रमांक आहे. पण `ई-नाम`मध्ये `ई-पेमेंट` होत नसल्याने शेतकऱ्याच्या पट्टीला विलंब होताना दिसत आहे. अशीच परिस्थिती राज्यातील `ई-नाम`मधील अनेक बाजार समित्यांची आहे.

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला भाव मिळावा, व्यवहारात पारदर्शकता यावी, व्यवहार गतीने व्हावा, याकरिता शासनाने राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) ही योजना सुरू केली आहे. राज्यातील तीस बाजार समित्यांची याकरिता निवड करण्यात आली. त्यात लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीचाही समावेश करण्यात आला आहे. या योजनेत अडते, व्यापारी, खरेदीदार, शेतकरी कसे सहभागी होतील याकरिता बाजार समितीचे सभापती ललितभाई शहा व सचिव मधुकर गुंजकर यांनी पुढाकार घेतला. सुरवातीला भुईमूग, करडी, सूर्यफूल, हरभऱ्याचे ई लिलाव करण्यात आले. सध्या सोयाबीन मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे गेल्या सात दिवसांपासून सोयाबीनचे ई लिलाव सुरू आहेत. त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. गुरुवारी तर साडे सात हजार क्विंटल सोयाबीनची यातून विक्री झाली आहे. या पद्धतीमुळे कमी वेळेत जास्त शेतीमाल विकला जात आहे, सौदे गतीने होत आहेत. पारदर्शकता येत आहे. ई लिलावात राज्यात अकोल्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर ही बाजार समिती आहे.

येथील अडत बाजारात अडते शेतकऱ्यांना शेतमाल खरेदी केल्यानंतर पेमेंट करण्याची पद्धत आहे. दोन टक्के अडत देत असल्याने खरेदीदार आठ दिवसांनंतर अडत्यांना पेमेंट करतात. ई लिलावात ई पेमेंट करावे अशा सूचना पणन संचालकांच्या आहेत. पण ई-नामच्या पोर्टलवर खरेदीदारांनी शेतकऱ्यांना ई पेमेंट करण्याची सुविधा आहे. पण अडत्यांनी शेतकऱ्यांना ई पेमेंट करण्याचे प्रावधानच नाही. त्यामुळे ई लिलाव होऊनही ई पेमेंट मात्र होतच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बिलाला विलंब होताना दिसत आहे. त्यामुळे ईनामच्या पोर्टलवर अडत्यांनी पेमेंट करण्याचे प्रावधान दिले गेले तर या ई लिलावाला अधिक गती येण्य़ास मदत होणार आहे.

ई- लिलावातून पारदर्शकता येत आहे. शेतकऱ्यांनी ईलिलावातच शेतीमाल विकावा. पोटलीत माल विकण्याची गरज नाही. पण ई-नामच्या पोर्टलवर शासनाने अडत्यांनी शेतकऱ्यांना पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. तरच शेतकऱ्यांना तातडीने पेमेंट मिळेल. व्यवहारही वाढतील. - ललितभाई शहा , सभापती, बाजार समिती, लातूर.

ई-लिलावाला आडते, शेतकरी, खरेदीदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. ई लिलावातून आणखी व्यवहार वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. या व्यवहार ई-पेमेंटही व्हावे, याकरिता प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचा पाठपुरावा सुरू आहे. - मधुकर गुंजकर , सचिव, बाजार समिती, लातूर

लातूर बाजार समितीत सोयाबीनचा ई लिलावातून झालेला व्यवहार
तारीख लॉट सोयाबीनची क्विंटलमध्ये खरेदी किंमत
२१.१२.२०१७ ७४२ १,८०,५२७
२२.१२.२०१७ १९९३ ५४,०३,५४२
२३.१२.२०१७ १७ २१२३ ७२,७४,७७८
२५.१२.२०१७ २७ २७ १,५०,२४,०५७
२६.१२.२०१७ २२ ३१०३ ८३,५०,१९४
२७.१२.२०१७ ३६ ५५८० १,५८,०६,२१६
२८.१२.२०१७ ५४ ८७६२ २,३७,५८,२००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com