agriculture news in marathi, No El_Nino effect in Monsoon season says IMD | Agrowon

येत्या पावसाळ्यात ‘एल निनो’ची भीती नाही : हवामान विभाग
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

पुणे : येत्या पावसाळ्यात प्रशांत महासागरातील उष्ण पाण्याचा प्रवाह (एल निनो) हा अडथळा राहणार नाही, अशी दुष्काळाशी सामना करणाऱ्या महाराष्ट्राला दिलासा देणारी माहिती हवामान खात्याने गुरुवारी येथे दिली आहे.

पुणे : येत्या पावसाळ्यात प्रशांत महासागरातील उष्ण पाण्याचा प्रवाह (एल निनो) हा अडथळा राहणार नाही, अशी दुष्काळाशी सामना करणाऱ्या महाराष्ट्राला दिलासा देणारी माहिती हवामान खात्याने गुरुवारी येथे दिली आहे.

या वर्षी राज्यात पावसाने ओढ दिली. त्यामुळे डिसेंबरअखेरपासूनच राज्याच्या वेगवेगळ्या भागात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर होत आहे. या पार्श्‍वभूमीवर एका कार्यक्रमासाठी पुण्यात आलेल्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. माधवन नायर राजीवन यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले, ‘‘आत्तापर्यंत ‘एल निनो’ विकसित झालेला नाही. त्यामुळे येत्या पावसाळ्यामध्ये ‘एल निनो’ हा अडथळा असणार नाही. याच्या प्रगतीवर आम्ही बारकाईने नजर ठेवून आहोत. त्यामुळे त्याचा विकास कसा होतोय, यावर आमचे लक्ष आहे.’’

या वर्षी थंडीचा कडाका वाढला आहे, याबद्दल बोलताना डॉ. राजीवन म्हणाले, ‘‘या वर्षी संपूर्ण जगात थंडीची तीव्रता वाढली आहे. पृथ्वीच्या ध्रुवांवरही मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी झाली आहे. भारतात हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये हिमवृष्टी होत आहे. तसेच, युरोपमध्येही यंदा बर्फ पडण्याचे प्रमाण वाढले आहे. भारतात ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ प्रमाणही या वर्षी वाढले आहे. पण, यातून भारतातील सपाट मैदानात पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे उत्तर प्रदेश, हरियाना, पंजाब, दिल्ली या प्रदेशात तेथील सरासरीच्या तुलनेत आत्ता कमी प्रमाणात पाऊस नोंदला गेला आहे. पण, त्या जम्मू आणि काश्‍मीर, हिमाचल प्रदेश या भागात हिमवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा हिमवृष्टी जास्त होत आहे.’’

निसर्ग समतोल साधतो...
जागतिक वातावरणातील बदलांमुळे हिवाळा कमी होत असल्याच्या जोरदार चर्चा सर्वत्र होतात. पण, निसर्ग समतोल साधत असल्याचे यंदाच्या थंडीने स्पष्टपणे दाखवून दिले आहे. या निसर्गाचे संवर्धन आपण केले पाहिजे, अशी अपेक्षाही डॉ. राजीवन यांनी व्यक्त केली.

उत्तरेकडून थंडीची लाट आहे. तेथून दक्षिणेच्या दिशेने थंड आणि कोरडे वारे वाहत आहेत. त्यामुळे मध्य भारत आणि दक्षिण भारताच्या काही भागात दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान नोंदले गेले आहे. पुढील चार ते पाच दिवस ही थंडी कायम राहील, असा अंदाज आहे.
- डॉ. के. एल. रमेश, महासंचालक, 
भारतीय हवामान विभाग

 

इतर बातम्या
मॉन्सूनने अलिबाग, मालेगावपर्यंतचा भाग...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी...
‘म्हैसाळ’पासून जतचा पूर्व भाग वंचितसांगली : जत तालुक्याच्या पूर्व भागातील ६४ गावाला...
विकासकामांचे सूक्ष्म नियोजन करा :...परभणी : जिल्ह्यतील विविध विकास कामांचे सूक्ष्म...
पूर्व विदर्भात दमदार पाऊसनागपूर : पश्चिम आणि दक्षिणेकडून मॉन्सून येणे...
मराठवाड्यात दूध संकलनात ९८ हजार लिटरने...औरंगाबाद : मराठवाड्यातील दुग्धोत्पादनाला घरघर...
ऊस बिलावरून शेतकरी आक्रमकनाशिक  : वसंतदादा सहकारी साखर कारखाना...
येवला, देवळा, मालेगाव, सटाणा तालुक्यात...नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (ता. २२) पावसाला सुरवात...
संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे...देहू, जि. पुणे  ः आषाढी वारीसाठी संत श्री...
कोल्हापूरच्या पश्‍चिमेकडे पाऊसकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात...
पृथ्वीराज चव्हाण यांनी केली...कऱ्हाड, जि. सातारा  ः माजी मुख्यमंत्री आमदार...
अकोट तालुक्यातील केळी बागांना वादळी...अकोला  ः आधीच नैसर्गिक संकटांनी त्रस्त...
नगर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळात...नगर  ः जिल्ह्यातील सर्वच भागांत पावसाने...
मराठवाड्यातील ५८ तालुक्यांत पाऊसऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यामध्ये रविवारी (...
शेतकऱ्यांना अडवणाऱ्यांना शिवसेना...नगर   ः विमा योजनेत घोटाळा झाला...
पीकविम्यातील हलगर्जीपणा; कृषी...पुणे : प्रधानमंत्री पीकविमा योजनेची कामे करताना...
मॉन्सूनने निम्मा महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
तुरळक ठिकाणी मुसळधारेची शक्यतापुणे : राज्याच्या दक्षिण भागात मॉन्सूनने आगमन...
औरंगाबाद, कोपरगाव, येवल्यात धोधो पाऊसपुणे : कोकणानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील...
`गुणनियंत्रण`चा चेंडू आता ‘एसीबी’च्या...पुणे : राज्याच्या कृषी विभागातील गुणनियंत्रण...
फिरत्या पशुचिकित्सालयामार्फत पशूंवर...बुलडाणा  : महाराष्ट्र विधानसभेत काल सादर...