agriculture news in marathi, no heavy rain in pune district, maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर वाढेना
टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 जुलै 2018

पुणे  : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत असल्या तरी पावसाचा जोर अपेक्षित प्रमाणात वाढलेला नाही. या पावसामुळे पेरणी झालेल्या पिकांना, भात रोपांना जीवदान मिळाले आहे. पूर्व भागातील दुष्काळी पट्ट्यात पावसाची उघडीप असल्याचे चित्र आहे. पावसाचा जोर कमी असला तरी आहे त्या स्थितीत पेरण्या करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे.

पुणे  : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत असल्या तरी पावसाचा जोर अपेक्षित प्रमाणात वाढलेला नाही. या पावसामुळे पेरणी झालेल्या पिकांना, भात रोपांना जीवदान मिळाले आहे. पूर्व भागातील दुष्काळी पट्ट्यात पावसाची उघडीप असल्याचे चित्र आहे. पावसाचा जोर कमी असला तरी आहे त्या स्थितीत पेरण्या करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे.

मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये हवेली, मुळशी, मावळ, जुन्नर, खेड, आंबेगाव या तालुक्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. उर्वरित तालुक्यांमध्ये तुरळक पाऊस पडत आहे. बहुतांशी भागात ढगाळ हवामानासह ऊन सावल्यांचा खेळ सुरू आहे. पेरणी झालेल्या पिकांच्या वाढीसाठी तसेच भाताची लागवड करण्यासाठी जोरदार पावसाची आवश्‍यकता आहे.

जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पाऊस पडत असल्याने धरणांच्या पाणलोट क्षेत्रातून धरणांमध्ये हळूहळ पाणी जमा होत अाहे. मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत टेमघर परिसरात १४, वरसगाव परिसरात १९, पानेशत परिसरात १७, पवना परिसरात १८, मुळशी परिसरात १३, गुंजवणी परिसरात २० तर डिंभे धरण क्षेत्रात १२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात मंगळवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पडलेला पाऊस (मिमीमध्ये - स्रोत कृषी विभाग) : पौड ११, माले १३, मुठे १४, भोलावडे १०, काले १८, कार्ला १२, लोणावळा २१, वेल्हा २६, पानशेत १७, जुन्नर १४, बेल्हा १०, राजूर २१, कुडे १२, चाकण १२, आंबेगाव १२, पाबळ १३, केडगाव १२.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...