agriculture news in Marathi, No impact of Al nino on monsoon, Maharashtra | Agrowon

‘एल निनो’चा यंदा माॅन्सूनला धोका नाही
टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 मार्च 2018

हवामानाच्या निरीक्षणानुसार सध्या असलेली ‘ला निना’ स्थिती माॅन्सून हंगामाच्या अखेरच्या टप्प्यामध्ये सर्वसाधारण होण्याचे संकेत आहेत. त्यानंतर ‘एल निनो’ स्थिती तयार होणार असून, तोपर्यंत देशातील माॅन्सूनचा हंगाम पूर्ण होईल. त्यामुळे माॅन्सून हंगामाबद्दल आताच बोलणे घाईचे ठरेल. 
- माधवन नायर राजीवन, वरिष्ठ अधिकारी, भारतीय पृथ्वी विज्ञान मंत्रालय.

पुणे ः प्रशांत महासागरातील ‘एल निनो’ सप्टेंबर महिन्यानंतर तयार होण्याचे संकेत आहेत. तोपर्यंत देशातील मान्सून हंगाम पूर्ण होत असतो. त्यामुळे यंदाच्या माॅन्सूनवर ‘एल निनो’चा परिणाम होणार नसल्याचे भारतीय हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. 

एल निनोच्या प्रभावामुळे यंदा भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज अमेरिकेतील हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. मात्र भारतीय हवामान तज्ज्ञांनी ही शक्यता फेटाळून लावल्याने पावसाच्या प्रमाणावरील अनिश्‍चितता दूर होणार अाहे. देशात साधारणत: जून महिन्याच्या सुरवातीला माॅन्सून वारे केरळमधून देशात प्रवेश करतात. तर सप्टेंबर महिन्यात वायव्य भागातील राजस्थामधून परतीचा प्रवास सुरू करतात.

गेल्या ५० वर्षाच्या सरसरीनुसार माॅन्सून काळात देशात सरासरी ८९ सेंटिमीटर पाऊस पडतो. त्यात चार टक्के वाढ, घट (९६ ते १०४ टक्के पाऊस) झाली तरी हंगामातील पाऊस सरासरी एवढा मानला जातो. देशात वर्षभरात पडणाऱ्या पावसापैकी सुमारे ७० टक्के पाऊस माॅन्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) पडतो. त्यामुळे देशाच्या २ लाख कोटी डाॅलरच्या अर्थव्यवस्थेत १५ टक्के वाटा असलेल्या शेती क्षेत्रावर, तर दोन तृतीयांश लोकसंख्येवर थेट परिणाम होतो.  

मॉन्सूनचा समाधानकारक पाऊस शेती आणि संपूर्ण अर्थव्यवस्था वाढीसाठी उपयुक्त ठरणार आहे. पूर्व-मध्य प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वाढल्याने एल निनो स्थिती तयार होते. ठराविक वर्षांनंतर ही स्थिती सातत्याने येत असते. शाश्वत जलसिंचनाची सुविधा नसलेल्या देशातील ५० टक्के शेतकऱ्यांना माॅन्सूनचा पाऊस भात, ऊस, मका, कापूस आणि सोयाबीन पिकांच्या लागवडसाठी उपयुक्त ठरतो. २०१४ आणि २०१५ मध्ये सलग दोन वर्षे दुष्काळ पडला होता. शतकात चौथ्यांदा आलेल्या या स्थितीमुळे देशाच्या उत्पन्नावर परिणाम झाला होता. तर शेतकरी आत्महत्याही वाढल्या होत्या. त्यानंतर २०१६ मध्ये सरासरी पाऊस पडला होता. तर २०१७ हवामान विभागाने ९८ टक्के पावसाचा अंदाज दिला असताना, देशात सरासरी ९५ टक्के पाऊस पडला होता. 

 

इतर अॅग्रो विशेष
शेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...
बा सरकार, प्रश्न जगण्याचा आहे!‘‘ज रा कुठे दुष्काळ पडला, गारपीट झाली,  पूर...
विना `सहकार` नाही उद्धारग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत...
राज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे   : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...
महाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा  ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...
दुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...
ओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...
सोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...
राज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....
कापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...
चारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...
दुष्काळात २५ एकरांत शेवगा, रंगबिरंगी...मुंबई येथील ‘कोचिंग क्लास’चा व्यवसाय असलेले तपन...
प्रतिकूलतेतून प्रगती घडवत आले पिकात...वांगी (जि. सांगली) येथील एडके कुटुंबाने अत्यंत...
दूध का दूध... देशातील दूध न दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८ टक्के...
पीककर्ज वितरणातील दोष व्हावे दूर पूर्वी जेमतेम तग धरून चालणाऱ्या शेती व्यवसायाने...
पाऊस बरा, मात्र दीर्घ खंड अन् कीडरोगाने...जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास पाऊस पडला खरा; मात्र...
अन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी...औरंगाबाद : शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या...
मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात थंडी वाढलीपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडीने...
साखर कारखान्यांनी सह-उत्पादनांवर सक्षम...मुंबई  ः देशांतर्गत साखर उद्योग संकटात आहे....
राज्यात ९१ कारखान्यांची धुराडी पेटली;...पुणे : राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत ९१...