जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (ज्वारी) आवक सुरू झाली असून, मागील आठवड्यात
ताज्या घडामोडी
सोलापूर : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क मिळाल्यानंतर नाशिक, सोलापूर व बार्शी बाजार समितीची निवडणूक या नवीन कायद्याप्रमाणे होत आहे. या निवडणुकीसाठी मतदानासाठी मतदारांना ‘नोटा’चा पर्याय देण्यात आला नाही. तसेच उमेदवारांनी निवडणुकीवर किती खर्च करावा, याचीही मर्यादा घालून देण्यात आलेली नाही.

राज्य निवडणूक आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या निवडणुकांमध्ये असणारे प्रमुख नियम बाजार समितीच्या निवडणुकीत दिसत नाही. दोन अपत्ये, स्वच्छतागृह याही अटी बाजार समिती निवडणुकीसाठी नाहीत. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या वतीने १५ मुद्द्यावर आधारित निवडणूक नियमावली आखून देण्यात आली आहे. या नियमावलीच्या माध्यमातून बाजार समितीच्या आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याची सूचना प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आली आहे. मतदानाच्या २४ तास अगोदर जाहिरात व प्रचाराला बंदी घालण्यात आली आहे. बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी निवडणूक प्रक्रियेत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभागी होऊ नये, बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात बाजार समितीच्या खर्चाने झालेल्या विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन करता येणार नाही.
- 1 of 348
- ››