‘अटारी’चे कामकाज मनुष्यबळाअभावी रेंगाळले
गणेश कोरे
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

२० शास्त्रज्ञ आणि कर्मचारी मंजूर असतानादेखील पाच महिने झाले तरी कर्मचाऱ्यांची भरतीची प्रक्रिया अद्याप राबववेली नाही.

पुणे ः महाराष्ट्रासह गाेवा, गुजरात, दिव, दमण, दादरा नगर हवेली या राज्यांतील कृषी विज्ञान केंद्रांवर नियंत्रण ठेवणाऱ्या कृषी तंत्रज्ञान उपयाेजन संशाेधन संस्थेचे (अॅग्रिक्ल्चर टेक्नॉलॉजी अॅप्लिकेशन रिसर्च इन्स्टिट्यूट (अटारी)) कामकाज मनुष्यबळाअभावी कामकाज रेंगाळले आहे.

संस्थेचे मुख्यालय एप्रिल २०१६ मध्ये पुण्यात आले असून, कृषी महाविद्यालयात तात्पुरत्या स्वरूपात कामकाज सुरू केलेल्या या संस्थेच्या कामकाजाचा डाेलारा एकट्या संचालकांवर अवलंबून आहे. २० शास्त्रज्ञ आणि कर्मचारी मंजूर असतानादेखील पाच महिने झाले तरी कर्मचाऱ्यांची भरतीची प्रक्रिया अद्याप राबववेली नाही.

गेल्या दीड वर्षांपासून संस्थेचे कामकाज हाकण्याची जबाबदारी संस्थाप्रमुख असलेल्या संचालक डॉ. लखनसिंग यांच्यावर आहे. अटारीच्या अखत्यारीत ७८ कृषी विज्ञान केंद्र येतात. यामध्ये महाराष्ट्रातील ४५, गुजरातमधील ३० तर गाेव्यातील २ केंद्रांचा समावेश आहे.

संस्थेच्या मुख्यालयाच्या इमारतीसाठी पुणे कृषी महाविद्यालयातील राष्ट्रीय पुष्पसंशाेधन संचालनालयाची पाच एकर जागा देण्यात आली आहे. या इमारतीचा आराखडा येत्या दाेन महिन्यांत पूर्ण हाेऊन भूमिपूजन डिसेंबरअखेर केंद्रीय कृषिमंत्री राधामाेहनसिंह यांच्या हस्ते हाेईल, असा विश्‍वास अटारीचे संचालक डॉ. लखनसिंह यांनी व्यक्त केला. तर मनुष्यबळासाठी भारतीय कृषी संशाेधन संस्थेशी पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

आॅक्टाेबरमध्ये इनाेव्हेटर फार्मर्स मीट
महाराष्ट्रासह, तमिळनाडू आणि तेलंगण येथील इनाेव्हेटर्स फार्मर्सची बैठक बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात ७ आणि ८ आॅक्टाेबरदरम्यान घेण्यात येणार आहे. या बैठकीत शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीमध्ये केलेले नावीन्यपूर्ण प्रयाेग सादर करण्यात येणार आहेत, असे डॉ. लखनसिंग यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
सांगलीत ज्वारीच्या कणसांना दाणेच आले... सांगली : कृषी विभागाने शेतकऱ्यांना वाटप...
केळीवरील करपा निर्मूलनासाठी अनुदान... जळगाव : केळी पिकावर सातत्याने करप्याचा...
परतीच्या पावसाने रब्बी पेरणीचा खोळंबा परभणी : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...
शिरूर तालुक्यातील पिकांचे पावसामुळे... रांजणगाव सांडस, जि. पुणे : शिरूर तालुक्यातील...
जळगाव जिल्ह्यात हरभऱ्याचे क्षेत्र... जळगाव :  जिल्ह्यात मागील चार ते पाच...
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाचे सोधी...वाशीम : संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने राबविण्यात...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली, दर स्थिरपुणे : पावसामुळे मार्केट यार्ड येथील...
सिंचन प्रकल्पांसाठी ७१८० कोटींचे... मुंबई ः महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याग्रस्त...
आमचे पैसे दंडासह परत करा ः...अकोला ः कृषी व संलग्न विषयांमध्ये अाचार्य पदवी...
पुणे जिल्ह्यातील सोळा धरणे तुडुंबपुणे ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून परतीच्या...
वैद्यकीय महाविद्यालयांतील तज्ज्ञांचे... यवतमाळ : कपाशीवर कीटकनाशकांची फवारणी करताना...
कापूस उत्पादनात घटीसोबत दरातही दिवाळेऔरंगाबाद : सोयाबीनची सोंगणी व कापसाची पहिली वेचनी...
कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात ः...पुणे : कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली...
नाशिक विभागात कांदा चाळींसाठीचा निधी... नाशिक : कांदा साठवणुकीची सोय नसल्याने...
जळगाव जिल्ह्यात सोयाबीन, ज्वारीची कापणी... जळगाव : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
गावातील कारभाऱ्यांकडून हायटेक प्रचार सातारा ः जिल्ह्यातील २६० ग्रामपंचायतींच्या...
‘स्वाभिमानी’ने केले हंगामा अांदोलन बुलडाणा ः संग्रामपूर तालुक्यात या हंगामात तूर...
सांगली जिल्ह्यातून परदेश दौऱ्यांसाठी ४७...सांगली ः तीन वर्षांच्या खंडानंतर शेतकऱ्यांची...
औरंगाबाद, जालना , बीड जिल्ह्यांत रब्बी...औरंगाबाद  : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व...
अमरावती विभागातील महसूल कर्मचाऱ्यांचा... अकोला : महसूल कर्मचाऱ्यांनी पुकारलेले काम बंद...