agriculture news in marathi, no notification of ban on sale of sugarcane in other state, pune | Agrowon

परराज्यांत ऊस विक्री बंदीची अद्याप सूचना नाही
मनोज कापडे
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीने परराज्यांत ऊस नेण्यावर बंदी घातली असली, तरी ही समिती कायदेशीर नसल्यामुळे वाहतूक अजूनही सुरू आहे,’ असे साखर कारखानदार सूत्रांचे म्हणणे आहे.

पुणे : परराज्यांत ऊस विकण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तरी अद्याप राज्य शासनाने अद्याप अधिसूचना काढलेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. या संदर्भात राज्य शासनाकडून अधिसूचना निघण्यासाठी सहकार विभागाने शासनाने प्रस्ताव पाठविला आहे. पुढील काही दिवसांत कायदेशीर बाबी पडताळून अधिसूचना निघू शकते, असे सहकार विभागाचे म्हणणे आहे.

‘महाराष्ट्राचा गाळप हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. मात्र, कर्नाटकचा हंगाम सुरू झाल्यामुळे परराज्यांत ऊस जात आहे. परराज्यांतील ऊस वाहतूक वेळीच न थांबविल्यास पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांना फटका बसू शकतो. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीने परराज्यांत ऊस नेण्यावर बंदी घातली असली, तरी ही समिती कायदेशीर नसल्यामुळे वाहतूक अजूनही सुरू आहे,’ असे साखर कारखानदार सूत्रांचे म्हणणे आहे.

राज्यात यंदा 9 लाख हेक्टरवरून 650 लाख टन ऊस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. 175 कारखान्यांकडून यंदा 73 लाख क्विंटलपेक्षा जादा साखर तयार केली जाण्याचा अंदाज आहे. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत उसाची हेक्टरी उत्पादकता 65 टनांऐवजी 80 टन मिळण्याची शक्यता आहे. मात्र, परराज्यांत ऊस किती जातो याचा उपलब्धतेवर परिणाम होईल, असे कारखान्यांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्रात उसावरील झोनबंदी हटविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी आपला ऊस कोणालाही विकू शकतो. त्यामुळे ऊसबंदी कशी करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, ऊस नियंत्रण कायदा 1966 च्या कलम सहामधील ‘फ’ या पोटकलमाचा आधार घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

गेल्या सात वर्षांत तिसऱ्यांदा उसावर बंदी
‘ऊस नियंत्रण कायद्यानुसार कोणत्याही विशिष्ठ भागातील ऊस वाहतूक व वितरणावर प्रतिबंध करता येतो. यापूर्वी 2009-10 व 2012-13 च्या हंगामात परराज्यांतील उसावर बंदी घालण्यात आली होती. हंगाम संपेपर्यंत सक्षम अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय राज्याबाहेर ऊस नेण्यास प्रतिबंध करणारी अधिसूचना काढण्यात आली होती. त्याचाच आधार घेत आता तिसऱ्यांदा ऊसबंदीची अधिसूचना काढण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली.

इतर अॅग्रो विशेष
चढ्या दराचा फायदा कोणाला?मागील दोन दिवसांपासून सोयाबीनचे दर वाढत आहेत....
अतिखोल भूजलाचा उपसा घातकचपर्यावरणाचा नाश कोणी केला? या एका प्रश्नाला अनेक...
निफाड तालुक्‍यात द्राक्ष काढणीला सुरवातनिफाड, जि. नाशिक  ः तालुक्‍यातील उगाव,...
पशुगणनेकरिता आता महिनाअखेरपर्यंत मुदतनागपूर   ः पशुगणनेसाठी पूरक साहित्याचा...
ट्रायकोकार्ड निर्मिती प्रशिक्षण प्रकल्प...नागपूर ः कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठातील...
राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षांनी जाणून...औरंगाबाद :  राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष व्ही...
दराअभावी कांदापट्टा सुन्ननाशिक : कांद्याला अगदी मोड फुटेस्तोवर वाट...
वनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...
अर्थसंकल्पीय कृषी कर्ज तरतूदीत १० टक्के...नवी दिल्ली : आगामी २०१९-२०च्या अर्थसंकल्पात शेती...
राज्यात शुक्रवारपासून पावसाचा अंदाजपुणे : वायव्य भारतातील पश्चिमी चक्रावाताची...
औरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय सुक्ष्म...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित नवव्या...
शेतीपूरक उद्योगातून बचत गट झाले सक्षमचिखली (जि. बुलडाणा) येथील हिरकणी महिला उत्कर्ष...
गोरक्षणासोबतच जपला व्यसनमुक्‍तीचा वसालाठी (ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) येथील दिलीप बाबा...
अप्रमाणित रोपांमुळे ‘फेल' बागांवर...पुणे : दुष्काळात जीवापाड जपलेल्या बागा अप्रमाणित...
सोयाबीन दराचा आलेख चढताच; लातूरला ३८११...लातूर : येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...
धान उत्पादकांना बोनस कधी?नागपूर : लगतच्या छत्तीसगड राज्याच्या तुलनेत...
उत्तर भारतात थंडी कायमश्रीनगर : जम्मू-काश्‍मीर, पंजाब, हरियाना व हिमाचल...
राज्यात थंडी झाली कमीपुणे : राज्यात अपवाद वगळता सर्वच ठिकाणच्या किमान...
बांधावर फुलवा ‘हिरवं सोनं’ण्याचा अभाव, मजूरटंचाई, मजूर व निविष्ठांचे...
आधुनिक सेवेसोबत ग्राहकांना हवा विश्‍वास संपूर्ण जगात अग्रेसर असलेल्या आधुनिक बॅंकिंग...