पाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः मुख्यमंत्री फडणवीस

पाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः मुख्यमंत्री फडणवीस
पाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः मुख्यमंत्री फडणवीस

पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य लोकांना पाण्‍यासाठी एकत्र आणून पाणी चळवळ उभारण्‍याचे काम पाणी फाउंडेशनने केले. यापुढेही हे काम चालू ठेवण्यासाठी `जिथे पाणी, तिथे सर्व पक्ष एकत्रित येतील. यात कोणतेही पक्षीय राजकारण करणार नाही, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.   पाणी फाउंडेशनतर्फे आयोजित ‘वॉटर कप २०१८’ या स्पर्धेचा पारितोषिक वितरण रविवारी (ता. १२) पार पडला. या वेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंधारण मंत्री राम शिंदे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, अभिनेता आमीर खान, किरण राव, पोपटराव पवार आणि पाणी फाउंडेशनचे सत्यजित भटकळ उपस्थित होते.  श्री. फडणवीस म्हणाले, की ज्या गतीने पाणी फाउंडेशनचे काम होत आहे, त्यातून नक्कीच राज्य लवकरच दुष्काळमुक्त होईल. या चळवळीला बळ देण्‍यासाठी वॉटर कप स्‍पर्धेतील विजेत्‍या गावांना शासनाच्‍या वतीने प्रोत्‍साहनपर अनुक्रमे पंचवीस लाख, पंधरा लाख आणि दहा लाखांचे बक्षीस देण्यात येईल.  अजित पवार म्हणाले, की पिकांना पाणी देण्यासाठी पाण्याचा वापर वाढला आहे. त्यामुळे भूजलपातळी खोल जात आहे. पाणीपातळी वाढविण्यासाठी श्रमदान, लोकवर्गणी आणि लोकसहभाग यांना महत्त्व द्यावे लागणार आहे. काहीजण बोलघेवडे असतात. फक्त बोलून सभा गाजवतात आणि निघून जातात. त्यांना काही काम करायचे नसते. अभिनेता आमीर खान म्हणाले, की तीन वर्षांपूर्वी पाणी फाउंडेशनचा जन्म झाला, तोच मुळी राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी. या स्वप्नपूर्तीच्या प्रवासातील प्रत्येक क्षण आयुष्यभर माझ्यासोबत राहील. मी या प्रवासाला नव्हे तर हा प्रवास मला पूर्ण करत आहे. ‘‘इतकी वर्षे सिंचनाचा पैसा गेला कुठे? पाणी फाउंडेशनच्या कामासाठी शासकीय अधिकारी मदत करतात. तर शासनाच्या काम का करत नाही,’’ असे प्रश्न राज ठाकरे यांनी या वेळी उपस्थित केले. ‘‘पाणी फाउंडेशनच्या कामासाठी आम्ही सर्व पाठिंबा देत आहोत,’’ अशी ग्वाही राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. जलसंपा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी जलसंधारणामध्ये केलेल्या कामाबद्दल मुख्यमंंत्र्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक सत्‍यजित भटकळ यांनी केले. तर जितेंद्र जोशी, स्‍पृहा जोशी यांनी सूत्रसंचालन केले.  पाणी फाउंडेशनचे राज्‍यस्‍तरीय पुरस्‍कार पुढीलप्रमाणे    प्रथम क्रमांक  टाकेवाडी, ता. माण, जि. सातारा (७५ लाख व सन्‍माचिन्‍ह )  द्वितीय क्रमांक - विभागून  १) भांडवली, ता. माण, जि. सातारा  ,  २) सिंदखेडा ता. मोताळा, जि. बुलडाणा (प्रत्‍येकी २५ लाख रुपये व मानचिन्‍ह)  तृतीय क्रमांक - विभागून  १) आनंदवाडी, ता. आष्‍टी, जि. बीड,  २) उमठा, ता. नरखेड, जि. नागपूर.   (प्रत्‍येक २० लाख व मानचिन्‍ह)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com