agriculture news in marathi, no orders to remove non-insure people from PANCHAMA, pune | Agrowon

पंचनाम्यातून बिगरविमाधारकांना वगळण्याचे आदेश नाहीत
टीम अॅग्रोवन
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

पुणे : राज्यात अवकाळी पाऊस़़; तसेच पीकनुकसानीनंतर नैसर्गिक आपत्तीच्या मदतीसाठी केल्या जाणाऱ्या पंचनाम्यांमधून बिगरविमाधारक शेतकऱ्यांना वगळण्याचे कोणतेही शासकीय आदेश निघालेले नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

राज्यात अलीकडेच झालेल्या परतीच्या पावसामुळे काही तालुक्यांमध्ये पिकांची हानी झाली आहे. मात्र, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे अजून झालेले नाहीत. ‘पंतप्रधान कृषी पीकविमा’ योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचेच पंचनामे करण्याचे आदेश दिल्याचे महसूल विभागाचे कर्मचारी सांगत आहेत. मात्र, पंचनामे सरसकट केले जात असून त्यात बदल झालेला नाही, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

पुणे : राज्यात अवकाळी पाऊस़़; तसेच पीकनुकसानीनंतर नैसर्गिक आपत्तीच्या मदतीसाठी केल्या जाणाऱ्या पंचनाम्यांमधून बिगरविमाधारक शेतकऱ्यांना वगळण्याचे कोणतेही शासकीय आदेश निघालेले नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

राज्यात अलीकडेच झालेल्या परतीच्या पावसामुळे काही तालुक्यांमध्ये पिकांची हानी झाली आहे. मात्र, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे अजून झालेले नाहीत. ‘पंतप्रधान कृषी पीकविमा’ योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचेच पंचनामे करण्याचे आदेश दिल्याचे महसूल विभागाचे कर्मचारी सांगत आहेत. मात्र, पंचनामे सरसकट केले जात असून त्यात बदल झालेला नाही, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

पंचनामे करताना तलाठ्याला गावाचे एकूण भौगोलिक क्षेत्र आणि खातेदार शेतकऱ्याचा विचार करावा लागतो. या शेतकऱ्याच्या शेतात जाऊन तलाठ्याने पंचनामा करणे अपेक्षित आहे. कोणताही शेतकरी विमाधारक असो अथवा नसो पंचनामा करणे बंधनकार असून मदतीचा निर्णय मात्र शासनाकडून घेतला जातो. त्यामुळे कोणत्याही बिगरविमाधारक शेतकऱ्याचा पंचनामा करणे महसूल विभागाला टाळता येणार नाही, असे कृषी विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले.

नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्याला शासनाच्या सुधारित नियमांनुसार जिरायती पिकांसाठी हेक्टरी ६८०० रुपये मदत दिली जाते; तसेच बागायती पिकांसाठी १३५०० रुपये, तर फळपिकांसाठी १८ हजाराची मदत मिळते. ‘संबधित शेतकरी जर विमाधारक असल्यास पीकनुकसानीची भरपाई विम्यापोटीच जास्त मिळते. विमाधारक शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याचा संबंध पंचनाम्याशी नसून पीककापणी प्रयोगाशी आहे. पीककापणी प्रयोगाचे नियोजन आधीच झालेले असून राज्यभर प्रयोग घेतले जाणार आहेत. प्रयोगातील निष्कर्ष पाहून विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांच्या खात्यात विमाभरपाई जमा होणार आहे.

वेगळे नियम लावून पंचनाम्याचे आदेश नाहीत
पुणे भागात काही गावांमध्ये फक्त विमाधारक शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले गेले आहेत काय, असा प्रश्न कृषी विभागाला विचारला असता, ‘मुळात नैसर्गिक आपत्तीसारखी स्थिती यंदा कुठेही नसल्यामुळे पंचनाम्याचा प्रश्न उद्भवत नाही,' असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. भोर, मावळ, मुळशी भागात भातपिकाचे झालेले नुकसान नैसर्गिक आपत्तीचे नसून कीडरोगामुळे झालेले आहे. नैसर्गिक आपत्तीच्या व्यतिरिक्त जर नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करायचे असल्यास शासनाकडून स्वतंत्र आदेश काढले जातात, असेही कृषी विभागाचे म्हणणे आहे.

इतर बातम्या
राज्यात ग्रामीण घरकुल योजनेला मिळणार गतीमुंबई : राज्यात ग्रामीण घरकुल योजनेंतर्गत...
बुलडाण्यात पिकांची उत्पादकता...अकोला : खरीप हंगामात पिकांची प्रत्यक्ष उत्पादकता...
थंडीची तीव्रता वाढेल, हवामान कोरडे राहीलमहाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होऊन तो १०१२...
साताऱ्यात ७ हजार क्विंटल सोयाबीन खरेदीसातारा : शेतकऱ्यांच्या सोयाबीनला आधारभूत किंमत...
रब्बी पेरणीत बीडची आघाडीऔरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना आणि बीड...
सांगली बाजार समितीत नोकर भरतीला हिरवा...सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सहा...
केळी कटतीचा प्रश्‍न सोडविण्यास...जळगाव : जिल्ह्यातील महत्त्वाच्या जळगाव बाजार...
नाशिकला कर्जमाफी याद्या पडताळणीचे ९९...नाशिक : राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी...
मिरची उत्पादनात घटीची शक्यता मुंबई ः गेल्या वर्षी मिरचीला चांगला दर मिळाला...
परभणी, हिंगोलीत दीड लाख क्विंटल कापूस...परभणी : राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन...
छत्तीसगडमध्ये दुष्काळस्थितीरायपूर, छत्तीसगड ः छत्तीसगडमधील अनेक भागांत...
जकराया शुगरकडून एकरकमी २५०० रुपये दर सोलापूर ः ऊसदराच्या प्रश्‍नावरून सोलापूर...
शेतकऱ्यांसाठी सत्तेलाही लाथ मारू ः...गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : शिवसेनेवर दुतोंडी...
रोग-किडींमुळे कापूस उत्पादकांना १५ हजार...शेतकरी मेटाकुटीस, नुकसानीचा पंचनामा आणि मदतीची...
ऊसदरप्रश्नी वांबोरीला काटा बंद अांदोलनराहुरी, जि. नगर : ऊसदरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी...
जैवइंधनातून नवीन अर्थनीती निर्माण होणारपुणे : इथेनॉलचा वापर आणि जैवइंधनाच्या...
बोंडअळीच्या प्रादुर्भावप्रकरणी सहा...अकोला ः जिल्ह्यात कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव...
साखरेच्या किमती सहा महिन्यांत २००...कोल्हापूर : साखरेच्या दरात गेल्या सहा महिन्यांत...
नाशिक ११.४ अंश; गारठा वाढलापुणे : अंदमान निकाेबार समुद्रालगत तयार...
राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी...मुंबई: राज्यमंत्री आणि शिवसेनेचे आमदार अर्जुन...