agriculture news in marathi, No political parties, Government and Judiciary give justice to farmers says raghunatdada patil | Agrowon

कोणताही पक्ष, सरकार, शेतकऱ्यांना न्याय देत नाही
टीम अॅग्रोवन
रविवार, 10 डिसेंबर 2017

शेतकरी प्रश्‍नांबाबत रघुनाथदादांची खंत
आजपासून पुण्यात ‘राष्ट्रीय शेतकरी परिषद’ 

पुणे : कोणताही पक्ष असो, सरकार असो अथवा न्यायालय असो आम्हाला न्याय देण्यात यशस्वी झालेले नाहीत. यावर देशभरातील शेतकरी चळवळीतील सर्वांचे एकमत झाले आहे. यासंदर्भात पुढील धोरण ठरविण्यासंदर्भात पुण्यात होणाऱ्या तीनदिवसीय राष्ट्रीय परिषदेत चर्चा होणार आहे. देशभरातील शेतकरी प्रतिनिधी यास उपस्थित राहून, परिषदेत चळवळीची पुढील भूमिका ठरविण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी दिली. 

शेतकरी प्रश्‍नांबाबत रघुनाथदादांची खंत
आजपासून पुण्यात ‘राष्ट्रीय शेतकरी परिषद’ 

पुणे : कोणताही पक्ष असो, सरकार असो अथवा न्यायालय असो आम्हाला न्याय देण्यात यशस्वी झालेले नाहीत. यावर देशभरातील शेतकरी चळवळीतील सर्वांचे एकमत झाले आहे. यासंदर्भात पुढील धोरण ठरविण्यासंदर्भात पुण्यात होणाऱ्या तीनदिवसीय राष्ट्रीय परिषदेत चर्चा होणार आहे. देशभरातील शेतकरी प्रतिनिधी यास उपस्थित राहून, परिषदेत चळवळीची पुढील भूमिका ठरविण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी दिली. 

पुण्यात आज (ता. १०) होत असलेल्या ‘राष्ट्रीय शेतकरी परिषदे’निमित्त श्री. पाटील यांनी शनिवारी (ता. ९) सकाळ-ॲग्रोवन कार्यालयास भेट दिली. या वेळी झालेल्या सविस्तर मुलाखतीदरम्यान श्री. पाटील बोलत होते. समवेत शेतकरी नेते कालिदास आपेट आदी उपस्थित होते. विविध विषयांवर मत मांडताना श्री. पाटील म्हणाले, की गेल्या ६० वर्षांत शेतकऱ्यांचे एवढे बलिदान जाऊनही परिस्थितीत सुधारणा होत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या त्यांना उत्पादन खर्चावर अाधारित भाव मिळत नसल्याने होत आहे, हे केवळ आम्हीच सांगितले नाही, तर टाटा सामाजिक संस्थेने आपल्या अभ्यास अहवालात मांडले. वजा सबसिडी जे शरद जोशींनी सांगितले, तेच या संस्थेनेही सांगितले. पुढे डॉ. स्वामिनाथन यांचा अहवालही तेच सांगत आहे.

यातही शेतकरी आत्महत्यांवर उपाय सांगताना उत्पादन खर्चावर ५० टक्क्यांचा नफ्याची शिफारस करण्यात अाली आहे. २००६ ला अहवाल सरकारला मिळाला. तेव्हापासून ते २०११ पर्यंत आम्ही वाट पाहिली, की हे मनमोहनसिंग सरकार काही तरी करेल. परंतु सरकारने काहीही केले नाही. या विरोधात आम्ही २०११ मध्ये सर्व्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली, परंतु तरीही सरकारने काहीही केले नाही. सरकारने फक्त तारखा घेतल्या. पुढे २०१४ला जेव्हा लोकसभा निवडणुका अाल्या तेव्हा नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले, की आम्ही सत्तेत येताच शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर अाधारित भाव देऊ. त्याच्यावर त्यांनी निवडणुका जिंकल्या. सरकारमध्ये येताच त्यांनी आम्ही उत्पादन खर्चावर आधारित भाव देऊ शकत नाही, असं जाहीर केले.

मग आम्ही सर्वोच्च न्यायालयाला असे सांगितले, की शेतकरी आत्महत्या होत आहेत, तर तुम्ही सरकारला यासंदर्भात निर्देश द्यालया हवेत. मात्र सर्वोच्च न्यायालयाने सांगितले, की हा विषय सरकारच्या धोरणाचा आहे, आम्ही काही त्यात हस्तक्षेप करणार नाही. इथे आम्हाला खटकलंय. बारीक सारीक गोष्टी हाताळल्या जातात. मात्र रोज शेतकरी आत्महत्या करत असताना काहीही केले जात नाही. मग आम्हाला हाच प्रश्‍न पडतो, की या देशात शेतकऱ्यांचे कोणी आहे की नाही, हे ठरविण्यासाठीच आम्ही आता पुण्यात एकत्र आलो आहोत.

श्री. पाटील यांनी याशिवाय शेतकरी विरोधी सिलिंग कायदा, घटनेचे ९वे परिच्छद, जीवनावश्‍यक वस्तू कायदा, शेतकरी संघटनेची शकले अादींवर अापली मत मांडली. पुण्यात नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात आज (ता.१०) पासून राष्ट्रीय शेतकरी परिषद होत आहे. यास आंध्र प्रदेश, पंजाब, राजस्थान, हरियाना, बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, ओडिशा, कर्नाटक, तमिळनाडू आदी राज्यांतील शेतकरी प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

इतर अॅग्रो विशेष
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...
नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप...
नगरची लढत राहणार लक्षवेधीनगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (...
रब्बी पीकविम्याला बोगस प्रकरणांचे ग्रहणमुंबई ः २०१८-१९ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान...
सहा कारखान्यांची धुराडी थंडावलीऔरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची...
आनंदाचा उतरता आलेखजगभरातील आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस...
आदित्यात् जायते वृष्टि:जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती,...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...
रसदार उन्हाळी काकडी अर्थकारणाला देतेय...जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, यावल, जळगाव आदी...