agriculture news in marathi, No relief to sugar industry in pricefall | Agrowon

साखर उद्योगाला दिलासा नाही
वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

साखरेचे भाव गडगडल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी थेट ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसाह्य करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन होता; परंतु तो आता बारगळल्यातच जमा आहे. अशा प्रकारचे अनुदान देण्याचा तूर्तास तरी सरकारचा विचार नाही, असे केंद्रीय अन्न मंत्रालयातील अधिकाऱ्याने सांगितले. तसेच साखरेचा देशातील साठा कमी व्हावा आणि स्थानिक बाजारपेठेत साखरेच्या दरात सुधारणा व्हावी म्हणून साखर निर्यात करण्याच्या मुद्यावर सरकार ठाम आहे.

साखरेचे भाव गडगडल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी थेट ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसाह्य करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन होता; परंतु तो आता बारगळल्यातच जमा आहे. अशा प्रकारचे अनुदान देण्याचा तूर्तास तरी सरकारचा विचार नाही, असे केंद्रीय अन्न मंत्रालयातील अधिकाऱ्याने सांगितले. तसेच साखरेचा देशातील साठा कमी व्हावा आणि स्थानिक बाजारपेठेत साखरेच्या दरात सुधारणा व्हावी म्हणून साखर निर्यात करण्याच्या मुद्यावर सरकार ठाम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेचे दर पाहता कारखान्यांसाठी आता साखर निर्यात करणे तोट्याचे ठरणार असले तरी ही निर्यात केलीच पाहिजे, अशी भूमिका सरकारने घेतली आहे.  

यंदाच्या हंगामात (२०१७-१८) देशात विक्रमी २९५ लाख टन साखर उत्पादन झाल्यामुळे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदीचा कल यामुळे साखरेच्या दरात मोठी पडझड झाली. त्यामुळे केंद्र सरकारने साखर आयातीवरील शुल्क दुप्पट करून ते १०० टक्के केले आणि साखरेवरील २० टक्के निर्यातशुल्क काढून टाकले. तसेच, सरकारने नुकताच प्रत्येक साखर कारखान्याला सक्तीचा कोटा ठरवून देत एकूण २० लाख टन साखर निर्यातीचा मार्ग मोकळा केला.

``काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारने ऊस उत्पादकांना त्यांनी कारखान्याला घातलेल्या उसापोटी थेट अनुदान दिले होते. तशा प्रकारचे अनुदान लगेचच देण्याचा सध्या तरी विचार नाही. आम्ही नुकत्याच ज्या दोन योजना जाहीर केल्या आहेत, त्यामुळे कारखान्यांना अतिरिक्त साखर निर्यात करणे शक्य होईल व स्थानिक बाजारपेठेत दरात सुधारणा होईल,`` असे अन्न मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर कोसळल्यामुळे सध्या साखरेला उठाव नाही. त्यामुळे साखर कारखाने अडचणीत सापडले असून शेतकऱ्यांच्या उसाच्या पेमेंटचे सुमारे १५ हजार कोटी रुपये थकले आहेत. हे थकलेले पैसे देण्यासाठी कारखान्यांना केंद्र सरकार काही मदत करणार का, या प्रश्नावर या अधिकाऱ्याने हात वर केले. ``देशातील अतिरिक्त साखर निर्यातीच्या माध्यमातून बाहेर पाठवणे, हाच सध्या करता येण्याजोगा उपाय आहे आणि त्यासाठी सरकारने नुकत्याच दोन योजना जाहीर केल्या आहेत,`` असे सांगून त्याने एक प्रकारे सरकार या व्यतिरिक्त आणखी कोणतीही मदत करण्याच्या मनःस्थितीत नसल्याचेच स्पष्ट केले. 

``प्रत्येक कारखान्याने त्याला ठरवून दिलेल्या कोट्याइतकी साखर निर्यात केली तर २० लाख टन साखर निर्यात करण्याचे उद्दीष्ट गाठता येईल. मग देशांतर्गत बाजारपेठेत साखरेच्या किमती सुधारणा होईल. कारखान्यांना साखर निर्यातीतून जो तोटा होईल, तो नंतर देशांतर्गत बाजारपेठेत दर वाढल्यामुळे भरून निघेल,`` असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. सध्याच्या स्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारातील दरपातळी पाहिली असता कारखान्यांना साखर निर्यातीत प्रतिकिलो पाच ते सात रुपयांचा तोटा होणार आहे.

इतर अॅग्रोमनी
भारतीय कापसाची सर्वाधिक आयात...जळगाव : भारतीय कापसाचा (गाठी) मोठा खरेदीदार...
राष्ट्रीय धोरणात हवे मक्याला स्थानदेशातील एकूण मक्याच्या खपामध्ये पोल्ट्री...
आंबा निर्यातीला सुरवातपुणे  ः महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या वाशी...
पंजाबात गव्हाची ३५ लाख टन खरेदीचंडिगड : पंजाब राज्यात बुधवार (ता.१८) पर्यंत ३४....
रब्बी मका, हळदीच्या भावात वाढया वर्षी सर्वसाधारण पाऊस पडेल असा अंदाज भारतीय...
शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत करणेच अधिक...शेतीवरील संकटाला तोंड देण्यासाठी भावांतर योजना...
अमेरिका-चीन व्यापार युद्धाचा भारतावर...अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ...
सोयाबीन, हरभरा, तुरीत मंदीचे ढग कायमसोयाबीन, हरभरा आणि तूर या तिन्ही पिकांमध्ये सध्या...
साखर उद्योगाला दिलासा नाहीसाखरेचे भाव गडगडल्यामुळे निर्माण झालेल्या ...
उन्हाळी 'कॅश क्रॉप'कडून अपेक्षामा गच्या वर्षातील दुसऱ्या सहामाहीत (जून ते...
कापसाच्या किमतीत वाढीची शक्यतागेल्या सप्ताहात किमतींचा आलेख काहीसा घसरता होता....
पिवळा वाटाणा आयातीकडे व्यापाऱ्यांचा कलनवी दिल्ली ः देशात कडधान्यांचे भाव पडल्यानंतर...
साखर उद्योगासाठी सरकारने १४० कोटींची...भवानीनगर, जि. पुणे : आजमितीस साखर प्रतिक्विंटल...
मका वगळता सर्व पिकांच्या फ्युचर्स भावात...गेल्या सप्ताहात सोयाबीन व हरभरा पिकाच्या भावात...
शेतीमाल दर संरक्षणासाठी शासनाच्या तीन...शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतीमालास योग्य भाव मिळावा...
दैनंदिन खर्चाची तजवीज, दरवर्षी बचत अन्...कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोची (ता. हातकणंगले)...
`मार्केट डेव्हलपमेंट`साठी एकत्रित...द्राक्षाचा चालू वर्षाचा हंगाम जवळ जवळ संपला आहे....
अक्षयतृतीयेनंतर डाळिंबात नरमाईडा ळिंबासाठी २०१७ हे वर्ष सर्वाधिक तोट्याचे होते...
कापूस, साखरेच्या भावात वाढीचा अंदाज गेल्या सप्ताहात मका, हळद वगळता सर्वांचे भाव घसरले...
मक्याच्या फ्युचर्स भावात घटया सप्ताहात मका व हळद वगळता सर्वांचे भाव घसरले...