कास पठारावरील पुष्पप्रजातींवर संशोधनासाठी परवानगी नाही

कास पठार
कास पठार

सातारा : कास पठारावरील पुष्पप्रजातींवर संशोधनासाठी वनविभागामार्फत कोणालाही परवानगी देण्यात आली नाही. तसेच, अद्याप कोणीही संशोधनासाठी वनविभागाकडे परवानगी मागितली नाही. तसेच, भविष्यातही परवानगी देण्याचा प्रस्ताव नसल्याचे उपवनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी सांगितले. कास पठार हे जागतिक वारसास्थळ म्हणून युनेस्कोने जुलै २०१२ मध्ये घोषित केले आहे. कास पठारावर एकूण ८५० पेक्षा जास्त प्रजातींच्या वनस्पती आढळतात. यामध्ये प्रादेशिक व अतिदुर्मीळ वनस्पतींचा समावेश आहे. रेड डाटा बुकमधील ६२४ प्रजातींपैकी ३९ प्रजाती कास पठारावर आढळतात. कास पठारावर दरवर्षी जुलै ते ऑक्‍टोबर या महिन्यांमध्ये दर १५ ते २० दिवसांनी विविध रंगीबेरंगी पुष्प प्रजातींचा जीवनक्रम बदलत असतो. त्यातील प्रदेशनिष्ठ व अतिदुर्मीळ वनस्पती या कास पठारावरील एक ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतरित करून पठारावरच पुनर्लागवड केल्या तरीही स्थापित होत नाहीत. त्यामुळे कास पठारावरील पुष्पप्रजातींवर संशोधनासाठी वनविभागामार्फत कोणालाही परवानगी देण्यात आली नाही किंवा संशोधनासाठी कुणीही वनविभागाकडे परवानगी मागितली नाही, तसेच भविष्यातही परवानगी देण्याचा प्रस्ताव नाही. फक्त वनस्पतींचा आहे त्या जागेवर अभ्यास करण्यासाठी मर्यादित स्वरूपात अभ्यासकांना परवानगी देण्यात येते. वनस्पतींची फुले वा इतर अवयव तोडणे, उपटणे किंवा इतरत्र स्थलांतरित करणे यासाठी वनविभाकडून परवानगी देण्यात येत नाही. असे गैरप्रकार केल्यास वनविभागाकडून उपद्रव शुल्क आकारले जात असल्याचे श्री. अंजनकर यांनी सांगितले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com