agriculture news in marathi, no survey of cotton farmer who harvest it due to bollworm attack | Agrowon

कपाशी काढणाऱ्यांच्या ‘सर्व्हे’चे काय?
टीम अॅग्रोवन
सोमवार, 18 डिसेंबर 2017

अकोला : गुलाबी बोंडअळीमुळे कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अाहे. याचा गेल्या तीन दिवसांपासून यंत्रणांकडून संयुक्त पंचनामा केला जात अाहे. या सर्वेक्षणासाठी आज(सोमवार, ता. १८)पर्यंत डेडलाइन देण्यात अाली अाहे. मात्र ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वीच कपाशीचे पीक उपटून टाकले त्यांच्या पीक नुकसानीचा सर्व्हे केला जात नसल्याने असे असंख्य शेतकरी अडचणीत आले आहेत.

अकोला : गुलाबी बोंडअळीमुळे कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अाहे. याचा गेल्या तीन दिवसांपासून यंत्रणांकडून संयुक्त पंचनामा केला जात अाहे. या सर्वेक्षणासाठी आज(सोमवार, ता. १८)पर्यंत डेडलाइन देण्यात अाली अाहे. मात्र ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वीच कपाशीचे पीक उपटून टाकले त्यांच्या पीक नुकसानीचा सर्व्हे केला जात नसल्याने असे असंख्य शेतकरी अडचणीत आले आहेत.

पंचनामा करणारी पथके सध्या उभ्या असलेल्या कपाशीच्या क्षेत्रात जाऊन छायाचित्र घेत अाहेत. पंचनामा करणाऱ्या यंत्रणांकडे कपाशी उपटलेल्या शेतकऱ्यांबाबत कुठलेही ठोस निर्देश किंवा सूचना नसल्याची माहिती समोर अाली अाहे. त्यामुळे या हंगामात ज्यांनी कपाशीची लागवड केली व सातबाऱ्यावर नोंद अाहे अशा शेतकऱ्यांचा समावेश करण्याची मागणी समोर अाली अाहे.

शासनाने सर्वेक्षण करताना कृषी सहायक, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील, सरपंच यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्याच्या सूचना दिल्यानंतर तीन दिवसांपासून यंत्रणा शेतशिवारात दिसून येत अाहे. यावेळी ही पथके बांधावर जाऊन छायाचित्रांसह माहिती घेत अाहेत. मात्र अनेक शेतकऱ्यांनी पिकाचे नुकसान पाहता दुसरे पीक घेण्यासाठी कपाशी उपटली. अाता त्या जागी गहू, हरभऱ्याची लागवड केली अाहे. अशा शेतकऱ्यांचे सध्या सर्व्हे केले जात नसल्याचे समोर अाले अाहे.

कृषी, महसूल, पंचायत विभागाच्या कर्मचाऱ्यांना सोमवारपर्यंत हा सर्व्हे पूर्ण करायचा अाहे. त्यातही एका दिवसात जास्तीत जास्त ५० शेतकऱ्यांच्या बांधावर ही पथके पोचत अाहेत. कपाशीचे लाखो हेक्टर क्षेत्र बोंडअळीने बाधित झालेले असून प्रत्येक शेतात नुकसानीची पातळी ३३ टक्क्यांवर असल्याचे दिसून येत अाहे. एकूणच संपूर्ण कपाशीचे पीक बोंडअळी व किडीने पोखरले असून सर्वेक्षण करणारी यंत्रणासुद्धा ही वास्तविकता पाहून हादरली अाहे. त्यामुळेच सध्या उभ्या असलेल्या पिकाची दखल घेतानाच उपटून टाकलेल्या कपाशी पीक क्षेत्राची नोंद घेण्याची मागणी केली जात अाहे. तलाठ्यांनी अाॅगस्टमध्ये पीक पेऱ्याच्या नोंदी केलेल्या असून त्याचा अाधार यावेळी घेण्याची गरज व्यक्त केली जाऊ लागली अाहे.

डेडलाइन पाळणे अशक्यच
संयुक्त पंचनामा करताना कृषी विभागाचा फिल्डवरील कर्मचारी असलेला कृषी सहायक महत्त्वाचा घटक अाहे. परंतु प्रत्येक जिल्ह्यात कृषी सहायकाकडे किमान अाठ ते दहा गावांचा कारभार असून हजारो हेक्टर क्षेत्र अाहे. तर एवढ्याच गावात तीन ते चार तलाठी व तेवढेच ग्रामसेवक असतात. अशावेळी एकट्या कृषी सहायकाची सर्व ठिकाणी हजेरी लागणे अशक्य झालेले अाहे. शिवाय काही ठिकाणी कृषी सहायकालाच पथकप्रमुख बनविण्यात अालेले अाहे. येत्या सोमवारपर्यंत कृषी विभागाच्या नमुन्यात माहिती सादर करण्याची मुदत असून ती डेडलाइन पाळण्यासाठी अाता नवनवीन युक्त्या समोर येऊ लागल्या अाहेत. एकाच जागेवर बसून माहिती भरण्याचे प्रकारही सुरू झाले अाहेत.

इतर अॅग्रो विशेष
कांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरणसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला...
‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूसजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने...
देशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये...पुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी...
स्थानिकीकरणातही मका टिकवून आहे काही मूळ...जंगली मका प्रजातीपासून स्थानिकीकरण होण्याच्या...
कर्नाटकसाठीची ऊसतोडणी मंदावलीकोल्हापूर: दक्षिण महाराष्ट्रात उसाची रक्कम...
उजनी धरणातील पाणी प्रदूषितच :...सोलापूर  : उजनी धरणामुळे सोलापूर, पुणे आणि...
बाजारात डाळिंबाचे दर दबावातसांगली ः देशात डाळिंबाच्या उत्पादनात अंदाजे २० ते...
अवैध एचटीबीटी बियाणे एसआयटीला मुदतवाढमुंबई: परवानगी नसलेले तणनाशकाला सहनशील जनूक...
विदर्भात पाऊस; मध्य महाराष्ट्राला...पुणे : बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘पेथाई’...
समृद्धी महामार्ग : साडेतीनशे कोटींच्या...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम...
साखर संघाची दोन हजार कोटींच्या पॅकेजची...पुणे: राज्यातील साखर कारखाने आर्थिक अडचणीतून...
कॅल्शिअम, लोहाचा उत्तम स्त्रोत ः नाचणीआहारच्या दृष्टीने नाचणी एक अत्यंत महत्त्वाचे...
पिकातील लोह, जस्त, बोरॉन कमतरतेवरील...लोह (Fe) कार्ये ः हरितद्रव्ये निर्मितीचे (...
‘रेसिड्यू फ्री’ शेतमालासाठी उभारली थेट...सध्या रासायनिक अवशेषमुक्त (‘रेसिड्यू फ्री’) किंवा...
पूर्व विदर्भासह नागपूरपर्यंत रिमझिम...नागपूर : आंध्रप्रदेशात चक्रीवादळ दाखल झाल्याचा...
दुष्काळीशी सामना करण्यासाठी...पंढरपूर, जि. सोलापूर :  राज्यात यंदा...
पेथाई चक्रीवादळ आंध्रच्या किनारपट्टीला... किनारपट्टीय भागात जनजीवन विस्कळीत जमीन खचून...
उसाला पूरक शर्कराकंदसाखरेचा वाढलेला उत्पादन खर्च, वाढलेले उत्पादन,...
राजकीय अन् आर्थिक उत्पाताची नांदीअखेर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल ...
कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी...छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये...