agriculture news in marathi, nobody take guarantee of farm goods, latur | Agrowon

शेतमालाची ‘हमी’ घेईना कोणी
हरी तुगावकर
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

लातूर : सोयाबीन, मूग, उडीद आदी शेतमाल हमी भावाप्रमाणेच खरेदी करावा, असे आदेश शासनाने दिले आहेत. पण सध्या अडत बाजारात शेतमालाचे भाव पडलेले आहेत. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत अडत बाजारात सोमवारी (ता. ३०) झेंडा फिरवण्यात आला. पण सौदाच निघाला नाही. जिल्ह्यातील अकरा बाजार समित्यांची अशीच परिस्थिती आहे. शासनाची खरेदी केंद्र नावालाच सुरू झाली आहेत. पण त्याचा उपयोग होत नाही. शेतमालाची ‘हमी’ घेईना ‘कोणी’ अशी परिस्थिती निर्माण झाली असून, एक लाख क्विंटलपेक्षा जास्त शेतमाल पडून राहिला. यात सोयाबीन मोठ्या प्रमाणात आहे.

लातूर : सोयाबीन, मूग, उडीद आदी शेतमाल हमी भावाप्रमाणेच खरेदी करावा, असे आदेश शासनाने दिले आहेत. पण सध्या अडत बाजारात शेतमालाचे भाव पडलेले आहेत. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत अडत बाजारात सोमवारी (ता. ३०) झेंडा फिरवण्यात आला. पण सौदाच निघाला नाही. जिल्ह्यातील अकरा बाजार समित्यांची अशीच परिस्थिती आहे. शासनाची खरेदी केंद्र नावालाच सुरू झाली आहेत. पण त्याचा उपयोग होत नाही. शेतमालाची ‘हमी’ घेईना ‘कोणी’ अशी परिस्थिती निर्माण झाली असून, एक लाख क्विंटलपेक्षा जास्त शेतमाल पडून राहिला. यात सोयाबीन मोठ्या प्रमाणात आहे.

सोयाबीन, मूग, उडदाची हमी भावानेच खरेदी करावी अन्यथा कारवाई करण्याचा इशारा जिल्हा उपनिबंधकांनी एका पत्राद्वारे जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांना दिला आहे. या समित्यांनी त्याची अंमलबजावणी सुरू करताच सोमवारी शेतमालाचा सौदाच निघाला नाही. बाजारच बंद राहिला. एक लाख क्विंटलपेक्षा जास्त शेतमाल पडून राहिला आहे. त्याचा मोठा परिणाम लातूर बाजार समितीवर झाला आहे. येथील अडत बाजारात रोज तीस हजार क्विंटलपेक्षा जास्त आवक सोयाबीनची आहे. सध्याच्या वातावरणामुळे सोयाबीनमध्ये आर्द्रताही जास्त आहे. त्यामुळे सोयाबीनला सध्या सरासरी दोन हजार पाचशे ते दोन हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटलला भाव आहे.

मूग व उडदाची आवक कमी आहे. पण त्यालाही हमी भावापेक्षा कमी भावच मिळत आहे. पण शासनाने हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी होऊ देऊ नये, असे आदेश दिल्याने बाजार समितीत शेतमालाचा सौदाच निघाला नाही. व्यापाऱयांचा एक प्रकारे अघोषित बंदच राहिला. याचा परिणाम एकाच दिवशी एकट्या लातूर बाजार समितीच्या आवारात ५० हजार क्विंटल तर इतर बाजार समित्यांत ५० हजार क्विंटल असा एकूण एक लाख क्विंटलपेक्षा जास्त शेतमाल पडून राहिला आहे. यातून दहा कोटींपेक्षा अधिकचे व्यवहार ठप्प राहिले आहेत.

शासनाच्या वतीने लातूर व उदगीर येथे हमी भावाप्रमाणे आॅनलाईन खरेदी केंद्र सुरु केली आहेत. त्यात अनेक अडचणीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यापर्यंत एक क्विंटलही खरेदी या केंद्रावर झालेली नाही. त्यात बाजार बंद पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाची हमी ना शासन घेईना ना व्यापारी घेईना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

फरकाची रक्कमच द्यावी
या वर्षी सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. एकट्या लातूर बाजार समितीत दरवर्षी आक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांत किमान पाच लाख क्विंटल सोयाबीनची खरेदी-विक्री होते. शासनाच्या खरेदी केंद्रावर ऐवढ्या मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे खरेदी करणे अशक्य आहे. त्यामुळे शासनाने बाजार भाव व हमी भावातील फरकाची रक्कम देऊनच शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे.

इतर अॅग्रो विशेष
आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
मुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...
अकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...
कर्नाटक आगमनानंतर, मॉन्सूनच्या...पुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...
सांगली जिल्ह्यात बेदाणा उत्पादनात वाढ,...सांगली ः बेदाणा निर्मितीसाठी प्रतिकूल वातावरण...
तिसऱ्या दिवशीही समुद्राला उधाणसिंधुदुर्ग : वायुवादळामुळे समुद्राला आलेले...
खरीप हंगामासाठी भेंडीची नवी जातचिपळूण ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
कोकणात बरसणार पूर्वमोसमीच्या सरीपुणे : ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात...
दुष्काळ सांगतो ‘जपून वापरा पाणी’हवामानाच्या नुकत्याच व्यक्‍त झालेल्या अंदाजानुसार...
‘असर’दार शिक्षणासाठी...कृषी पदवीधर आता माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीसाठी...
मॉन्सूनची दक्षिण कर्नाटकपर्यंत चालपुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...
गुजरातवरील ‘वायू' संकट तूर्त टळलेअहमदाबाद/ नवी दिल्ली : गुजरात किनाऱ्याच्या दिशेने...
मोगरा शेतीतून दरवळला यशाचा सुगंध...ॲग्रोवनमध्ये मोगरा शेतीची यशकथा वाचून कवठेमहांकाळ...
‘राजवाडी पॅटर्न’द्वारे शंभर एकर जमीन...पावसाळ्यात भरपूर पाऊस, उन्हाळ्यात पाण्याचे...
छत्रपती शाहू महाराज यांनी...कागल, जि. कोल्हापूर ः महाराष्ट्रात राजर्षी शाहू...
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज पुणे ः अरबी समुद्रात धुमाकूळ घालणाऱ्या वायू...
'पशुसंवर्धन'मध्ये अखेर नव्याने बदल्यानागपूर ः विश्‍वासात न घेताच बदल्या केल्याचा ठपका...