भारतातून निर्यात होणाऱ्या तांदळाचा दर वाढला
कोजेन्सिस वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017
नवी दिल्ली ः चांगल्या दर्जामुळे भारतीय बिगर बासमती तुकडा तांदळाला मागणी वाढली अाहे. यामुळे भारतातून निर्यात होणाऱ्या बिगर बासमती तांदळाच्या किमतीत जानेवारी ते सप्टेंबर दरम्यानच्या कालावधीत ७.२ टक्क्यांनी वाढ झाली अाहे, अशी माहिती अन्न अाणि कृषी संघटनेने (एफएओ) जाहीर केलेल्या मासिक अहवालातून दिली अाहे.
 
नवी दिल्ली ः चांगल्या दर्जामुळे भारतीय बिगर बासमती तुकडा तांदळाला मागणी वाढली अाहे. यामुळे भारतातून निर्यात होणाऱ्या बिगर बासमती तांदळाच्या किमतीत जानेवारी ते सप्टेंबर दरम्यानच्या कालावधीत ७.२ टक्क्यांनी वाढ झाली अाहे, अशी माहिती अन्न अाणि कृषी संघटनेने (एफएओ) जाहीर केलेल्या मासिक अहवालातून दिली अाहे.
 
भारतातून होणाऱ्या बिगर बासमती तुकडा तांदळाचा दर जानेवारी ते अाॅगस्ट दरम्यान सरासरी प्रतिटन ३६० डॉलर होता. त्यात सप्टेंबरमध्ये वाढ होऊन तो प्रतिटन ३७३ डाॅलरवर पोचला अाहे, असे ‘एफएओ’ने अहवालात नमूद केले अाहे. गेल्या वर्षी २०१६ मध्ये जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान तांदळाचा दर सरासरी प्रतिटन ३३५ डॉलर होता. त्यात यंदा वाढ झाली अाहे.
 
भारतातून निर्यात होणारा तांदूळ सहज उपलब्ध अाहे. तसेच बांगलादेशमधून मागणी वाढली अाहे. त्यामुळे तांदळाच्या दरात वाढ झाली अाहे. बांगलादेशमध्ये पुराने भात पिकाचे नुकसान झाले अाहे. त्यामुळे यंदा या देशात १.५ दशलक्ष टन भाताचे उत्पादन कमी झाले अाहे.
 
या पार्श्वभूमीवर भारतातून बांगलादेशमध्ये ५ लाख टन पारबाईल्ड तांदूळ निर्यात होणार अाहे. नाफेडमार्फत हा तांदूळ निर्यात केला जाणार अाहे. याअाधी भारतातून खासगी व्यापाऱ्यांनी दीड लाख टन तांदूळ बांगलादेशला निर्यात केला अाहे. अाता सरकारी एजन्सीमार्फत हा तांदूळ निर्यात होणार अाहे.
 
भारतीय बिगर बासमती तांदळाचा निर्यात दर (प्रतिटन- डॉलर)
  • सप्टेंबर २०१६...३२६
  • सप्टेंबर २०१७...३७३
 
 
टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
नागपुरात सोयाबीन प्रतिक्‍विंटल २७५०...नागपूर ः बाजारात सोयाबीनच्या दरात होणाऱ्या किरकोळ...
केवळ अमळनेरलाच कडधान्य खरेदी केंद्र सुरू जळगाव  ः जिल्ह्यात मंगळवारपर्यंत (ता. १७)...
परभणीत प्रतिक्विंटल टोमॅटो १२०० ते १८००...परभणी ः येथील कृषी उत्पन्न बाजार...
आयुर्वेदिक रेसिपींच्या आस्वादासाठी...पुणे ः आयुर्वेदात उल्लेख असलेल्या...
परभणी जिल्ह्यात कृषी विभागातील ३१ टक्के...परभणी ः परभणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी...
वाटाणा लागवड कधी करावी?वाटाणा लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगल्या...
नागपूर ३६.४ अंशांवरपुणे : राज्यातील काही भागांत कमाल तापमानात वाढ...
कोल्हापुरात भाजीपाल्याचे दर वधारलेकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
जळगावात उडदाची आवक घटलीजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवड्यात...
नाशिकला टोमॅटोची आवक निम्म्याने घटलीनाशिक : नाशिक जिल्ह्यात ऑक्‍टोबरच्या पहिल्या...
उत्पादकता घटल्याने फूल मार्केटमध्ये...नागपूर : परतीच्या पावसाचा फटका बसल्याने या वर्षी...
मंचर बाजार समितीत कटतीद्वारे लूटपुणे : पालेभाज्यांसाठी आणि विशेषतः काेथिंबीरीसाठी...
नांदेड विभागात ३३ कारखान्यांच्या...परभणी : नांदेड विभागातील ५ जिल्ह्यांतील ३३ साखर...
समृद्धी महामार्गाच्या विरोधाची धार...घोटी, जि. नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
तापमान पुन्हा वाढू लागलेपुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांशी...
कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पाटण, जि. सातारा ः कोयना धरण पाणलोट क्षेत्रात...
सांगलीत ज्वारीच्या कणसांना दाणेच आले... सांगली : कृषी विभागाने शेतकऱ्यांना वाटप...
केळीवरील करपा निर्मूलनासाठी अनुदान... जळगाव : केळी पिकावर सातत्याने करप्याचा...
परतीच्या पावसाने रब्बी पेरणीचा खोळंबा परभणी : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...
शिरूर तालुक्यातील पिकांचे पावसामुळे... रांजणगाव सांडस, जि. पुणे : शिरूर तालुक्यातील...