बिगर बासमती तांदळाच्या निर्यात दरात वाढ

बिगर बासमती तांदळाच्या निर्यात दरात वाढ
बिगर बासमती तांदळाच्या निर्यात दरात वाढ

नवी दिल्ली ः भारतातून जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यानच्या कालावधीत निर्यात झालेल्या बिगर बासमती (२५ टक्के तुकडा) तांदळाच्या किमतीत ८ टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. या कालावधीत प्रतिटन ३६१ डॉलर दराने तांदळाची निर्यात झाली आहे, अशी माहिती अन्न आणि कृषी संघटनेने (एफएओ) अहवालातून दिली आहे. गेल्या वर्षी जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान निर्यात झालेल्या तांदळाला सरासरी प्रतिटन ३३४ डॉलर दर मिळाला होता. त्यात यंदा वाढ झाली आहे. मात्र नोव्हेंबरमध्ये भारतातून निर्यात झालेल्या तांदळाचा दर थायलंडमधून निर्यात झालेल्या तांदळापेक्षा कमी होता. नोव्हेंबरमध्ये भारतातून निर्यात झालेल्या बिगर बासमती तांदळाला प्रतिटन ३६६ डॉलर एवढा दर मिळाला. तर याच महिन्यात थायलंडमधून निर्यात झालेल्या तांदळाचा दर प्रतिटन ३८८ डॉलर होता, असेही एफएओने नमूद केले आहे. जानेवारी- नोव्हेंबर दरम्यान भाताचे उत्पादन घेणाऱ्या प्रमुख देशांमध्ये तांदळाचे दर वाढले. जागतिक स्तरावर तांदळाची खरेदी वाढल्याने तसेच जागतिक बाजारातील चलनातील चढ- उतारामुळे तांदळाच्या दराला बळकटी मिळाली असल्याचे दिसून आले. जागतिक बाजारपेठेत तांदूळ दरात अठरा टक्‍क्‍यांनी वाढ आंतरराष्ट्रीय बाजारात खरेदी वाढल्याने गेल्या नोव्हेंबर महिन्यात तांदळाच्या दरात १८ टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. नोव्हेंबर २०१६ मध्ये तांदळाचे दरात मोठी घसरण झाली होती. मात्र गेल्या वर्षभरात तांदळाच्या दराने उसळी घेतली आहे, असे एफएओने जाहीर केलेल्या तांदूळ दर निर्देशांत अहवालात म्हटले आहे. नोव्हेंबरमधील बिगर बासमती निर्यात तांदळाचा दर (प्रतिटन- डॉलर)

भारत ३६६
पाकिस्तान ३४३
थायलंड ३८३
व्हिएतनाम ३६३

स्रोत ः एफएओ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com