agriculture news in marathi, non-cooperation Movement from 1st March in state, Maharashtra | Agrowon

एक मार्चपासून राज्यात ‘असहकार आंदोलन’
टीम अॅग्रोवन
बुधवार, 3 जानेवारी 2018

नाशिक : शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी ही फसवी असल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांना कर्जमाफी नव्हे, तर कर्जमुक्‍ती द्यावी, शेतमालाला हमीभाव द्यावा, यांसह विविध मागण्यांसाठी येत्या १६ तारखेला मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचा निर्णय शेतकरी सुकाणू समितीच्या बैठकीत घेण्यात आला. सरकारकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्यास येत्या १ मार्चपासून सरकारशी असहकार आंदोलन पुकारण्यात येईल. या आंदोलनामध्ये मंत्री आणि अधिकाऱ्यांना राज्यात फिरू न देण्याचा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

नाशिक : शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी ही फसवी असल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांना कर्जमाफी नव्हे, तर कर्जमुक्‍ती द्यावी, शेतमालाला हमीभाव द्यावा, यांसह विविध मागण्यांसाठी येत्या १६ तारखेला मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचा निर्णय शेतकरी सुकाणू समितीच्या बैठकीत घेण्यात आला. सरकारकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्यास येत्या १ मार्चपासून सरकारशी असहकार आंदोलन पुकारण्यात येईल. या आंदोलनामध्ये मंत्री आणि अधिकाऱ्यांना राज्यात फिरू न देण्याचा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

शेतकरी सुकाणू समितीची राज्यस्तरीय बैठक सोमवारी (ता. १) विश्रामगृहावर पार पडली. शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील आणि प्रतिभा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. राज्यातील सरकार हे शेतकरीविरोधी असून, राज्यात अराजकता माजली असल्याचा आरोप रघुनाथदादा पाटील यांनी केला.

‘‘एकीकडे शेतकरी आत्महत्या करत असताना आमदारांची पगारवाढ, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्यात सरकार दंंग आहे. आमच्या पैशांवरच ही मजा सुरू असल्याची टीका करतानाच शेतकऱ्यांच्या न्यायहक्‍कासाठी हे आंदोलन केले जाणार आहे,’’ असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

‘‘शेतमालाला हमीभावापेक्षा कमी किंमत दिली जात आहे. २४ तासांत शेतमालाचे पैसे देण्याचा आदेश असतानादेखील व्यापाऱ्यांकडून एक ते दीड महिना शेतकऱ्यांना पैसे मिळत नाही. अशा परिस्थितीत दबावातून कर्जवसुली, वीज थकबाकी केली जाते. ही बाब गंभीर असून, सरकारने ती तातडीने थांबवावी, अशी मागणी शिंदे यांनी केली.

राज्यात प्रत्यक्षात ८९ लाख शेतकरी असताना केवळ ६४ लाख शेतकऱ्यांचे अर्ज भरून घेण्यात आले. उर्वरित २६ लाख शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आले,’’ अशी टीका डॉ. अशोक ढवळे यांनी केली.

बैठकीला डॉ. अजित नवले, किशोर ढमाले, राजू देसले यांच्यासह २३ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. येत्या १६ तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तर १७ रोजी कृषी, सहकार, दुग्धविकास विभागाच्या सचिवांची भेट घेऊन मागण्यांकडे त्यांचे लक्ष वेधण्यात येईल. त्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्यास सरकारविरोधी १ मार्चपासून ‘कर कर्जा नही देंगे; बिजली का बिल नही देंगे!’ या मागणीसह असहकार आंदोलन केले जाईल. आंदोलनादरम्यान, मंत्री व अधिकाऱ्यांना राज्यात फिरू देणार नसल्याचाही इशारा शिंदे यांनी दिला. 
 

इतर ताज्या घडामोडी
कोबीवरील भुरी, घाण्या रोगनियंत्रणराज्यात गेल्या काही दिवसांत अवकाळी पाऊस व गारपीट...
अधिक उत्पादन, साखर उताऱ्यासाठी फुले १०,...ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिक उत्पादन देणाऱ्या...
स्थलांतरित गावांतही मिळणार रेशनचे...नगर : रोजगारासाठी गाव सोडलेल्या कुटुंबांना आता...
नाशिक विभाग ‘मनरेगा’ची मजुरी जमा...नाशिक  : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पेटून उठासेलू, जि. परभणी : कधी गारपीट, कधी अवकाळी पाऊस,...
बायफचा फ्रान्स सरकारकडून गौरव पुणे : पशुसंवर्धन, ग्रामविकास व शेती क्षेत्रात...
परभणी जिल्ह्यातील १४ हजार जनावरांना इअर...परभणी : पशुसंवर्धन विभागांतर्गत राबविण्यात येत...
जळगाव जिल्ह्यात हवामानाचा बाजरी उगवणीवर...जळगाव  ः जिल्ह्यात बाजरीची पेरणी काही...
कर्जमाफीच्या २१ लाख शेतकऱ्यांचे खाते '...यवतमाळ : कर्जमाफी अंतिम टप्प्यात आली आहे....
नगर जिल्ह्यात `नरेगा’च्या कामांवर...नगर : मजुरांना रोजगार मिळावा म्हणून राबवल्या...
वऱ्हाडात कांदा बिजोत्पादनाला गारपिटीचा...अकोला ः कांदा बिजोत्पादनाचे मोठे क्षेत्र असणाऱ्या...
हमीभाव : धूळफेकीचे चक्र पूर्ण सत्तेवर येण्यापूर्वी दिलेली आश्वासने सत्तेवर...
सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक थांबवावी :...दीडपट हमीभावाची सरकारची घोषणा ही शुद्ध बनवाबनवी...
उत्पादन खर्चाबद्दल खुलासा करावा : डॉ....केंद्र सरकारने आगामी खरिपात सर्व अघोषित पिकांसाठी...
मराठवाड्यातील लघू प्रकल्प आले २७ टक्‍क्...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८६४ लघू, मध्यम, मोठ्या...
गारपीटग्रस्त केळी बाग सुधारणेच्या...अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे  केळी पिकाचे कमी-...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १५...नांदेड : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन...
जळगाव जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात...जळगाव  : जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प यंदा सहा...
ब्रॉयलर्स बाजार दहा रुपयांनी उसळला,...ब्रॉयलर्सचा बाजार अपेक्षेप्रमाणे जोरदार उसळी...
पुण्यात कलिंगड, खरबुजाच्या आवकेत वाढपुणे : गुलटेकडी येथील बाजार समितीमध्ये...