agriculture news in marathi, non electrified 111 villages work in progress assures energy minister | Agrowon

वीज न पोचलेल्या 111 गावांचे विद्युतीकरण प्रगतिपथावर : बावनकुळे
टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 डिसेंबर 2017

नागपूर  : राज्यात 2011 च्या जनगणनेनुसार 40 हजार 959 गावांचे विद्युतीकरण झाले असून, पुनर्वसन किंवा इतर कारणामुळे बाकी राहिलेल्या 111 गावांचे विद्युतीकरण प्रगतिपथावर आहे, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली.

नागपूर  : राज्यात 2011 च्या जनगणनेनुसार 40 हजार 959 गावांचे विद्युतीकरण झाले असून, पुनर्वसन किंवा इतर कारणामुळे बाकी राहिलेल्या 111 गावांचे विद्युतीकरण प्रगतिपथावर आहे, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली.

शशिकांत शिंदे, भास्कर जाधव, मनोहर भोईर सदस्यांसह विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आदींनी या संदर्भात मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते. मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, की गडचिरोली जिल्ह्यातील 66 तर नंदुरबार जिल्ह्यातील 34 गावांचे विद्युतीकरण बाकी आहे. नंदुरबार जिल्ह्यातील 34 पैकी 33 गावे ही सरदार सरोवर प्रकल्पामुळे बाधित झालेली आहेत. तसेच अतिदुर्गम, डोंगराळ भागातील 7 तर पालघर, यवतमाळ, पुणे व रायगड जिल्ह्यांतील प्रत्येकी 1 अशा 111 गावांचे विद्युतीकरण होणे बाकी आहे. यापैकी 54 गावांचे विद्युतीकरण हे महावितरण कंपनीमार्फत तर 57 गावांचे विद्युतीकरण हे महाऊर्जाद्वारे करण्याचे प्रस्तावित आहे.

ऑक्‍टोबर 2017 अखेर महावितरण कंपनीमार्फत 54 पैकी 14 गावांचे विद्युतीकरण करण्यात आले असून, महाऊर्जाद्वारे 57 पैकी 28 गावांचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. उर्वरित गावांच्या विद्युतीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे, अशी माहिती त्यांनी या वेळी दिली.

इतर ताज्या घडामोडी
राज्यातील चौदा मतदारसंघांत आज मतदानमुंबई   ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
स्थानिक घटकांपासून नावीन्यपूर्ण सौर...तीव्र थंडीच्या स्थितीमध्ये वापरण्यायोग्य सौर...
जळगावात हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी आज बंदजळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसाठी अजून...
रावेर, जळगावसाठी आज मतदानजळगाव : लोकसभा निवडणुकीच्या जळगाव व रावेर...
वाळूउपशामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घटनाशिक : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ...
नांदेड जिल्ह्यात अडीच हजार कोटींचे...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील विविध बॅंकांना २०१९-...
राज्याचे एक थेंबही पाणी गुजरातला देऊ...नाशिक  : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी...
धर्मराजाचा कडाही यंदा आटलामाजलगाव, जि. बीड : माजलगाव धरणालगतच असलेला...
लक्षवेधी माढ्यासाठी आज मतदानसोलापूर  : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः जिल्ह्यात मुक्ताईनगर व रावेरात दर्जेदार...
नगरमध्ये प्रशासन गुंतले निवडणुकीत,...नगर  : दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी चारा...
पुणे विभागात तेरा हजार हेक्टरवर चारा...पुणे : पाणीटंचाईमुळे चाऱ्याची चांगलीच टंचाई...
पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...पुणे  ः कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील...
नगर लोकसभा मतदारसंघात आज मतदाननगर : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवारी) २०३०...
यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख टन खतांची मागणीयवतमाळ  : येत्या खरीप हंगामासाठी कृषी...
यवतमाळ जिल्ह्यात होणार ६६४ विहिरींचे...यवतमाळ  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस गंभीर होत...
कळमणा बाजारात तुरीच्या दरात सुधारणानागपूर ः कळमणा बाजार समितीत तुरीची आवक...
अमरावतीतील दहा हजारांवर शेतकऱ्यांचे... अमरावती  ः निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकरी...
शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या...जळगाव   ः लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक...
शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधील ...नाशिक  : कृषी अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी...