agriculture news in marathi, Non FAQ urud purchase issue under inquirey | Agrowon

‘नॉन एफएक्यू’ उडीद खरेदी प्रकरणाची चौकशी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

चौकशीसाठी अधिकारी दाखल
    अकोला : नाफेडच्या खरेदी केद्रांवर ‘नॉन एफएक्यू’ दर्जाचा उडीद खरेदी झाल्याने त्याचा शासनाला लाखोंचा फटका बसला अाहे. या संदर्भात अकोट बाजार समितीचे माजी सभापती गजानन पुंडकर यांनी शासनाकडे तक्रार केली अाहे. शासनाचे अधिकारी चौकशीसाठी अकोल्यात दाखल झाले अाहेत. ‘नॉन एफएक्यू’ दर्जाचा सुमारे चारशे क्विंटलपेक्षा अधिक उडिद खरेदी करणाऱ्यांविरुद्ध जबाबदारी निश्चित केली जाणार असल्याचे सांगितले जात अाहे.

चौकशीसाठी अधिकारी दाखल
    अकोला : नाफेडच्या खरेदी केद्रांवर ‘नॉन एफएक्यू’ दर्जाचा उडीद खरेदी झाल्याने त्याचा शासनाला लाखोंचा फटका बसला अाहे. या संदर्भात अकोट बाजार समितीचे माजी सभापती गजानन पुंडकर यांनी शासनाकडे तक्रार केली अाहे. शासनाचे अधिकारी चौकशीसाठी अकोल्यात दाखल झाले अाहेत. ‘नॉन एफएक्यू’ दर्जाचा सुमारे चारशे क्विंटलपेक्षा अधिक उडिद खरेदी करणाऱ्यांविरुद्ध जबाबदारी निश्चित केली जाणार असल्याचे सांगितले जात अाहे.

‘ॲग्रोवन’ने या संदर्भात वृत्त दिले होते. नाफेडने उडीद खरेदी सुरू केल्यानंतर अकोट येथील खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा उडीद एफएक्यू दर्जाचा नसल्याने परत करण्यात अाला होता. मात्र हा उडीद व्यापाऱ्यांनी कमी दराने खरेदी केला. त्यानंतर शेतकऱ्यांच्या सातबारावर नाफेडला विकल्या गेल्याचा आरोप आहे. श्री. पुंडकर यांनी केलेल्या तक्रारीत निकृष्ठ दर्जाचा २९०० क्विंटल मूग, उडीद अकोला वेअर हाउसवरून परत अाल्यानंतरही मुंबई येथील अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून पुन्हा प्रोसेसिंग करून जमा करण्यात अाला. अकोट येथे शासनाकडून नाफेडची मूग, उडीद, सोयाबीन खरेदी हमीभावाने झाली. मूग, उडीद खरेदीची ३० डिसेंबर ही अंतिम तारीख होती. 

शासनाने त्याला २० जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली. यादरम्यान अकोट येथील खरेदी केंद्रावर मोठा घोळ झाला अाहे. या केंद्रावरून पाठवलेला २९०० क्विंटल माल अकोला येथील वेअर हाउसवरून दर्जा योग्य नसल्याच्या कारणाने परत पाठवला होता. परत आलेला हा माल बरेच दिवस पडून होता, परंतु नंतर त्याची विल्हेवाट लावण्यात अाली. नॉन एफएक्यू दर्जाच्या खरेदीमुळे नाफेड, महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनला सुमारे लाखाेंचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. याची चौकशी करण्यासाठी राज्य मार्केटिंग फेडरेशनचे वरिष्ठ अधिकारी दाखल झाले अाहेत.

इतर ताज्या घडामोडी
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...