agriculture news in marathi, non permitted HT cotton seed packets found in Drain | Agrowon

नाल्यात बीटी बियाणे फेकल्याप्रकरणी पोलिस तक्रार
टीम अॅग्रोवन
सोमवार, 29 जानेवारी 2018

मुदतबाह्य ४३ पाकिटे कृषी विभागाकडून जप्त
यवतमाळ : एचटी बियाण्यांची अवैधरीत्या मोठ्या क्षेत्रावर लागवड झालेल्या यवतमाळ जिल्ह्यात एका कंपनीच्या बियाण्यांची पाकिटे नाल्यात बेवारस आढळून आली. ४३ मुदतबाह्य बियाणे पाकिटे नाल्यात आढळून आल्यानंतर खळबळ उडाली. या प्रकरणी कृषी विभागाने पोलिस तक्रार दिली असून, संबंधित कंपनीलादेखील आठ दिवसांत खुलासा करण्याचे निर्देश आहेत. 

मुदतबाह्य ४३ पाकिटे कृषी विभागाकडून जप्त
यवतमाळ : एचटी बियाण्यांची अवैधरीत्या मोठ्या क्षेत्रावर लागवड झालेल्या यवतमाळ जिल्ह्यात एका कंपनीच्या बियाण्यांची पाकिटे नाल्यात बेवारस आढळून आली. ४३ मुदतबाह्य बियाणे पाकिटे नाल्यात आढळून आल्यानंतर खळबळ उडाली. या प्रकरणी कृषी विभागाने पोलिस तक्रार दिली असून, संबंधित कंपनीलादेखील आठ दिवसांत खुलासा करण्याचे निर्देश आहेत. 

यवतमाळ शहरालगत वाहणाऱ्या एका नाल्यात बीटी बियाण्यांची पाकिटे फेकून देण्यात आली होती. या पाकिटावर बियाणे कालबाह्य होण्याचा कालावधी २०१६ असा नमूद होता. जिल्ह्यात यापूर्वी एचटी बियाण्यांची जीईसी परवानगी नसताना लागवड झाल्याचे समोर आले होते. एचटी बियाण्यांचा अवैध साठा जिल्ह्यात पोचला कसा, या प्रश्‍नाचा उलगडा अद्यापही यंत्रणांना करता आला नाही.  चौसळा नाल्यात दुर्गा गोल्ड सुपर ५ (बीजी-२) या वाणाची ४३ पाकिटे मिळाली. सुपर सीडस, सिकंदराबाद, वितरक ॲग्रीगोल्ड फूड अँड फार्म प्रोडक्‍ट असा त्यावर उल्लेख असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

या प्रकरणी जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी कैलास वानखडे यांनी लोहारा पोलिस ठाण्यात कंपनीविरोधात तक्रार दिली. त्यात या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी असे म्हटले आहे. कंपनी प्रशासनाला रीतसर पत्र देत त्यांनाही आठ दिवसांच्या आत बियाणे का आणि कोणी फेकले याचा खुलासा करावा, असे म्हटले आहे. यवतमाळ शहरानजीक नाल्यात ४३ बीटी बियाण्यांची पाकिटे मिळाली होती. या प्रकरणी पोलिस तक्रार करण्यात आली असून, कंपनीलादेखील खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती अमरावती विभागीय गुण नियंत्रण अधिकारी डॉ. पंकज चेडे यांनी दिली.
 

इतर ताज्या घडामोडी
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...