agriculture news in marathi, Nonfaith motion passed against Chairman, Jalgaon APMC, maharashtra | Agrowon

सभापतींचा राजीनामा; तरीही ‘अविश्वास’ मंजूर
टीम अॅग्रोवन
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

जळगाव : अविश्‍वास प्रस्तावावर शुक्रवारी (ता. ३) सकाळी कामकाज सुरू होण्यापूर्वी तासभर आधी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश आनंदा नारखेडे यांनी आपला राजीनामा जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सादर केला. अर्थातच अविश्‍वास प्रस्तावाच्या बाजूने १४ संचालक व विरोधात फक्त तीन संचालक असल्याने अविश्‍वास प्रस्ताव मंजूर होऊन सभापतिपदावरून पायउतार होण्याची नामुष्की टाळण्यासाठी सभापती नारखेडे यांनी हा राजीनामा दिला. परंतु, संचालकांनी आपण अविश्‍वास प्रस्तावासंबंधी मतदान प्रक्रिया पार पाडण्यास ठाम असल्याचे सांगून मतदान घ्यायला लावले.

जळगाव : अविश्‍वास प्रस्तावावर शुक्रवारी (ता. ३) सकाळी कामकाज सुरू होण्यापूर्वी तासभर आधी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश आनंदा नारखेडे यांनी आपला राजीनामा जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सादर केला. अर्थातच अविश्‍वास प्रस्तावाच्या बाजूने १४ संचालक व विरोधात फक्त तीन संचालक असल्याने अविश्‍वास प्रस्ताव मंजूर होऊन सभापतिपदावरून पायउतार होण्याची नामुष्की टाळण्यासाठी सभापती नारखेडे यांनी हा राजीनामा दिला. परंतु, संचालकांनी आपण अविश्‍वास प्रस्तावासंबंधी मतदान प्रक्रिया पार पाडण्यास ठाम असल्याचे सांगून मतदान घ्यायला लावले. त्यात १४ विरुद्ध २, असे मतदान झाले आणि सभापती नारखेडेंविरुद्धचा प्रस्ताव मंजूर झाला. 

बाजार समितीमध्ये सेना -भाजप - कॉंग्रेसने एकत्र निवडणूक लढवून सत्ता मिळविली होती. त्यात सभापतीपद एक-एक वर्षासाठी पाच संचालक भूषवतील, असा निर्णय झाला होता. पण सभापती प्रकाश नारखेडे यांनी दोन वर्षे राजीनामा दिला नाही, म्हणून १४ संचालकांचा गट एकत्र आला आणि त्यांनी नारखेडे यांच्याविरुद्ध अविश्‍वास प्रस्ताव मागील महिन्यात दाखल केला होता. त्यासंबंधी शुक्रवारी सकाळी बाजार समितीत जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांच्या उपस्थितीत कामकाज सुरू झाले. 

नारखेडे यांचा राजीनामा 
सभापती नारखेडे यांनी कामकाज सुरू होण्यापूर्वी आपला राजीनामा जिल्हा उपनिबंधकांकडे दिला. त्यावर जिल्हा उपनिबंधक यांनी संचालकांना अविश्‍वास प्रस्तावावर मतदान प्रक्रिया पूर्ण करायची की सभापती नारखेडे यांचा राजीनामा मंजूर करायचा, असे संचालकांना विचारले. त्यावर संचालकांनी ही राजीनामा स्वीकारण्याची व देण्याची वेळ नाही, आता अविश्‍वास प्रस्तावर मतदान घ्यावे, अशी मागणी जिल्हा उपनिबंधकांकडे केली आणि मतदान झाले. 

१४ विरुद्ध २ आणि एक अनुपस्थित
मतदान प्रक्रिया पार पडली. त्यात अविश्‍वास प्रस्तावाच्या बाजूने १४ संचालकांनी हात उंचावून मतदान केले. प्रभाकर गोटू सोनवणे हे संचालक अनुपस्थित राहिले तर प्रस्तावाच्या विरोधात फक्त स्वतः सभापती नारखेडे आणि प्रभाकर गोबजी पवार हे संचालक राहीले. १४ विरुद्ध २ असे मतदान झाल्याने सभापती नारखेडे यांना शेवटी पायउतार व्हावे लागले. तासभर कामकाज चालले. इतिवृत्त लिहिण्यात आले. त्याचे वाचन अधिकाऱ्यांनी केले. 

कैलास चौधरी प्रभारी, २१ दिवसांनंतर निवड 
सभापती नारखेडे यांना पायउतार व्हावे लागल्याने बाजार 
समितीत प्रभारी सभापतींची नियुक्ती झाली असून, उपसभापती कैलास छगन चौधरी यांच्याकडे जिल्हा उपनिबंधक यांनी हा प्रभार सोपविला आहे. आता २१ दिवसांनंतर नवीन सभापतींची निवड प्रक्रिया जाहीर होईल. 

लक्ष्मण पाटील असतील नवे सभापती
१४ संचालक हे माजी मंत्री सुरेश जैन यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले असून, त्यांनी जैन यांच्या निवासस्थानी मध्यंतरी झालेल्या बैठकीत नवीन सभापतिपदी लक्ष्मण पाटील यांची नियुक्ती करण्याचे निश्‍चित केले आहे. अर्थातच नवे सभापती लक्ष्मण पाटील असतील. तर उपसभापतिपदी भाजपचे संचालक मनोहर पाटील यांना संधी मिळणार असल्याची माहिती आहे. 

इतर बातम्या
चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये...चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये प्रति...
राहुल गडपाले ‘सकाळ’चे चीफ कन्टेंट क्‍...पुणे : सकाळ माध्यम समूहाच्या संपादक संचालकपदी...
अमरावती विभागात शुल्क गोळा करूनही...अमरावती : शिपाई आणि रोपमळा मदतनीस पदाकरिता...
पूर्णधान्य आहाराचा आरोग्यासाठी होतो...आरोग्यासाठी साध्या धान्यांच्या तुलनेमध्ये...
सत्तावीस कारखान्यांकडून १ कोटी २१ लाख... नगर  ः नगर, नाशिक जिल्ह्यांत सुरू असलेल्या...
जात प्रमाणपत्र पडताळणीतील बनवेगिरी कायमपुणे : बोगस जात प्रमाणपत्रे शोधण्यासाठी नियुक्त...
पुणे जिल्ह्यातील १०० मंडळांमध्ये... पुणे  ः हवामान अंदाजाबाबत अचूक माहिती...
लाचखोर तालुका कृषी अधिकारी 'लाचलुचपत'...अकोला : जलसंधारणाच्या केलेल्या कामांची देयके...
परभणी जिल्ह्यातील चार लघू तलाव कोरडे परभणी ः पाणीसाठा संपुष्टात आल्यामुळे...
स्वखर्चाने शेततळे करणाऱ्यांना मिळेना...औरंगाबाद : शेतीला पाण्याची सोय व्हावी म्हणून...
कोल्हापुरात गुळाचे पाडव्यानिमित्त सौदे कोल्हापूर : येथील बाजार समितीत पाडव्यानिमित्त...
साखरेप्रमाणे कापसासाठी धाेरण ठरवावे :...पुणे : साखरेप्रमाणेच कापसासाठी दरावर लक्ष कें....
राज्यात आज अन्नत्याग आंदोलनमाळकोळी, नांदेड ः आजवर आत्महत्या केलेल्या...
तुरळक पावसाचा अंदाज; तापमान वाढणारपुणे : राज्यात सोमवारी (ता. १९) मध्य महाराष्ट्र,...
जगभरात अवशेषमुक्त मालालाच मागणीपुणे : निर्यातीत युरोपीय देशांप्रमाणे अन्य...
कृषी योजनांचा निधी खर्च करण्यात अपयशपुणे : कृषी विभागाच्या विविध योजनांचा निधी...
शेतकरी आत्महत्यांचे सरकारला काहीच वाटत...राळेगणसिद्धी, जि. नगर : ‘‘लोकपाल आणि लोकायुक्त...
सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी :...नवी दिल्ली  : २०१९ मध्ये सत्तेत आल्यास...
'ईव्हीएम'ऐवजी आता मतपत्रिकांचा वापर...नवी दिल्ली : आगामी निवडणुकांमध्ये इलेक्‍...
राज-पवार भेटीने चर्चेला उधाणमुंबई : दिल्ली येथे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...