agriculture news in Marathi, normal and heavy rain in many places, Maharashtra | Agrowon

राज्यात अनेक ठिकाणी हलका ते जोरदार पाऊस
टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर वाढत आहे. मंगळवारी (ता. १४) सकाळी आठ वाजेपर्यंत कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, जळगाव, सातारा, कोल्हापूर, विदर्भातील वर्धा, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्हयातील काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. 

पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर वाढत आहे. मंगळवारी (ता. १४) सकाळी आठ वाजेपर्यंत कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, जळगाव, सातारा, कोल्हापूर, विदर्भातील वर्धा, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्हयातील काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. 

केरळ ते कर्नाटकाच्या दक्षिण भाग या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणखी सक्रिय होऊन दक्षिणेकडे सरकण्यास सुरवात झाली आहे. महाराष्ट्राची किनारपट्टीलगतचा अरबी समुद्रही खवळलेला राहणार आहे. त्यामुळे राज्यातील पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. कोकण घाटमाथ्यावर पावसाचा जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. येत्या शनिवार (ता. १८) पर्यंत कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडणार असून, अनेक भागात हवामान अंशत ढगाळ राहील. पुणे परिसरातही पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. 

कोकणात अनेक भागात पावसाने चांगला जोर धरला आहे. कोडगाव येथे ७४, लांजा येथे ७२, अंबवली येथे ७१ मिलिमीटर पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्वरनंतर आंबा येथे १०४, मुंठे १००, गवसे ८८, लाजमच ८७.७, हेरे ८५, चंदगड ८३, लोणावळा ७९ मिलिमीटर पाऊस पडला. तसेच शिरगाव, दावडी, ताम्हिणी , कोयना, लोणावळा, शिरोटा, अंबोणे, डुंगरवाडी, वळवण, भिवपुरी, खोपोली, ठाकूरवाडी, वाणगाव, कोयना, खंद या घाटमाथ्यावरही पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढण्यास सुरवात झाली आहे.

मराठवाड्यातील नांदेड जिल्‍ह्यातील मांडळी येथे ४१ मिलिमीटर पाऊस पडला. विदर्भातील बल्लारपूर येथे १०० मिलीमीटर पाऊस पडला. तर घुगस ५२.२, राजूरा ५४.९ मिलीमीटर पाऊस पडला असून उर्वरित अनेक भागात हलक्या सरी कोसळल्या.

मंगळवारी (ता.१४) सकाळी आठ वाजेपर्यत झालेला पाऊस ः स्राेत ः कृषी विभाग

कोकण विभाग ः ठाणे २०, धसइ ४२, देहरी ३६, गोरेगाव २८, पोयनड २२, चौक २०, वौशी २२, कसू २७, कामरली २५, महाड २४, बिरवडी २९, करंजवडी २८, नाटे २८, खारवली २५, तुडली २६, माणगाव ४०, इंदापूर ४०, गोरेगाव ४२, लोनेरे ३६, निझामपूर ४०, चानेरा २४, पोलादपूर २९, कोंडवी ३०, तला ३२, मेंढा ३२, चिपळूण ३२, खेरडी २२, मरगतम्हाणे ३५, रामपूर ३०, वाहल २८, सावरडे २४, असुरडे २६, कलकावणे ४५, शिरगांव ४८, दापोली ३३, बुरवंडी ४०, दाभोल ५५, अंजरला २३, वाकवली ४६, पालगड ३५, वेलवी ४७, खेड ४०, शिरशी ४२, अंबवली ७१, कुलवंडी ३५, भारने ४८, दाभील ५२, धामनंद ४७, अबलोली ४०,
मंडणगड ४८, म्हाप्रल ४२, देव्हरे ५३, खेडशी ३६, कोटवडे २८, पाली ४७,कडवी २५, अंगवली २५, कोडगाव ७४, देवली २०, देवरुख ३५, तुलसानी ७६, माभले २८, तेरहे ३४, राजापुर ३३, कोंडीया २२, ओनी २४, पाचल ४१, लांजा ७२, भांबेड ३५, पुनस ५७, सातवली ६३, विलवडे ४५, शिरगाव २५, पाटगाव २९,
मालवण २५, श्रावण ३६, बांडा ४७, वेंगुर्ला ३७, कनकवली ३३, फोंडा २६.६, सांगवे ६३, नांदगाव ८६, तालेरे २५, वागडे ३१, कुडाळ ४०, कडवल २९, कसाल ३२, वलवल २६, मानगाव ५०, पिंगुली ३६, येडगाव २५, भुइबावडा २२, तालवट २८, भेडशी ४८.

मध्य महाराष्ट्र ः इगतपुरी २९, घोटी २०, धारगाव २५, वेळुंजे २०, तोरणमाळ २६, मालदाभाडी ३०, साकीरवाडी २०, शेंडी ४७, पौड २५, घोटावडे २९, मुठे १००, पिरंगूट २३, भोलावडे ४०, नसरापूर २०, आंबवडे २३, निगुडघर ३२, काले २८, कार्ला ३७, खडकाळा ३४, लोणावळा ७९, वेल्हा २७, पाणशेत २१, राजूर ५१,
आपटाळे २५, कुडे २२, सातारा २७, खेड २५, जावळी २४.१, बामणोली ४६.२, केळघर ३३.२, करहर २५.६, हेळवाक ८०, मरळी २७, मोरगिरी ३५, महाबळेश्‍वर ११७.२, तापोळा ६४.२, लामज ८७.७, कोकरुड ३०, शिराळा २१, मांगले २०, सागाव २०, चरण ४६, वाडी-रत्नागिरी २८, कळे ३७, बाजार ४४, कोतोली ३०, भेडसगाव ४१, बांबवडे ३७, करंजफेन ८७, सरूड २५, मलकापूर ३२, आंबा १०४, राधानगरी ८१, सरवडे ५१, कसबा २७, आवळी ३६, राशिवडे २६, कसबा ६६, गगनबावडा ५८, साळवण ६७, सांगरूळ २१, शिरोली-दुमाला ३५, बीड २८, सिद्धनेर्ली २४, कापशी ३५, खडकेवाडा २५, मुरगुड ३७, बिद्री ३२, महागाव २९, नेसरी २३, गारगोटी २२, पिंपळगाव ४१, कूर २१, कडेगाव ६०, कराडवाडी ७०, आजरा ५१, गवसे ८८, मडिलगे २२, चंदगड ८३, नारंगवाडी ४२, कोवाड २२, तुर्केवाडी ४९, हेरे ८५,

मराठवाडा ः नांदेड : मांडवी ४१.

विदर्भ ः येळबारा २१, मेटिखेडा ४८, सावळी २२, बरेगाव २०, वणी २६.५, राजूर ३०, भलार ३३, पुनवट २५, शिंदोळा २८, कायार २३, रिसा २६, शिरपूर २४, मारेगाव २७, मुकुटबन ३०, मथार्जून २१, शिबला २०, पांढरकवडा २०.२, करंजी २०, रुंजा ३२, शिरोली २३, साखरा २२, शिवणी ३९, घोटी ३०, पारवा ४०, कुर्ली ३२
देवळी ३२.६, दिघोरी २२.४, तितूर २०.४, गंगाझारी ३४, दासगाव २३, रावणवाडी ३४, कामठा २०, परसवाडा २१.२, गोरेगाव ३३.४, कुऱ्हाडी ४२.३, देवरी ३१, घुगस ५२.२, राजूरा ५४.९, बल्लारपूर १००, जेवती २०.६, पाटण २६.३, बामणी ३६.२, असर्ली ३०.६, जरावंडी २२.२.

 

इतर अॅग्रो विशेष
शेतीचे वास्तव यावे पुढेसंबंधित विभागाकडील उपलब्ध माहिती, आकडेवारी हाच...
कृषी निर्यात दुपटीसाठी ‘राष्ट्रीय धोरण’पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील...
मराठवाड्यात महारेशीम अभियानाला सुरवात औरंगाबाद ः रेशीम उद्योगातून शेतकऱ्यांचे जीवनमान...
जळगावमधील सर्वच तालुके दुष्काळीजळगाव : जिल्ह्यातील सर्व गावांची अंतिम पैसेवारी...
परभणीची खरिपाची अंतिम पैसेवारी ४४.६९...परभणी ः परभणी जिल्ह्याची खरीप हंगामाची अंतिम...
औरंगाबादमध्ये २७ डिसेंबरपासून ‘ॲग्रोवन’...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञान व...
एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांचे होणार...सोलापूर : यंदाच्या गाळप हंगामात संबंधित...
किमान तापमानात वाढ पुणे  : ‘पेथाई’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे...
विदर्भातील तीन जिल्हा बँकांचे विलीनीकरण...मुंबई: राज्यातल्या सामान्य शेतकऱ्यांच्या...
रब्बी कर्जवाटपाचे नियोजन कोलमडलेपुणे  : राज्यात यंदा दुष्काळ, कर्जवसुलीतील...
मराठवाड्यातील दुष्काळाची पैसेवारीने...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ८५३३...
औषधी जायफळाचे मूल्यवर्धनजायफळ सालीचे वजन ६० टक्के असते. जायफळ सालीमध्ये...
पीकविम्यासाठी राज्यात तक्रार समित्या...पुणे : पीकविमा देताना कंपन्यांकडून होणारी लूट होत...
अल्पभूधारक कुटुंबाच्या आयुष्यात...पारंपरिक पिकांना पूरक व्यवसायांची जोड दिली तर...
कलमे, रोपबांधणी कलेचे रोजगारात केले...औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्‍यातील रजापूर...
कांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरणसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला...
‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूसजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने...
देशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये...पुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी...
स्थानिकीकरणातही मका टिकवून आहे काही मूळ...जंगली मका प्रजातीपासून स्थानिकीकरण होण्याच्या...
कर्नाटकसाठीची ऊसतोडणी मंदावलीकोल्हापूर: दक्षिण महाराष्ट्रात उसाची रक्कम...